Skip to content

रक्षा बंधनाचा धोका…

ऑगस्ट 4, 2009

रक्षा बंधनाच्या दिवशी माझी नेहमी महाविद्यालयाला बुट्टी. घरी सांगायचो की आज सुटी आहे. खर तर मला कोणीच मैत्रिण नव्हती तरी देखील मला भीती वाटायची. की कोणी आणून राखी बांधली तर काय?. मला ही भीती शाळेत असल्या पासून निर्माण झाली. शाळेत मुली मुलाना राखी बांधयाच्या. मग असा काय नियम नव्हता पण राखी बांधली की १० रुपये द्यावे लागायचे. आई ने कधी एक रूपया दिला नाही. मग दहा रुपये सोडाच. नंतर नंतर या मुली देखील हुशार झाल्या. एक एक रुपयाच्या ५-१० राख्या घेउन यायच्या. आणि किमान १००/- घेउन जायच्या. बर राखी नको म्हटल की, त्या मनाला वाटेल तो अर्थ काढायच्या. किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला राखी बांधली नाही तरी देखील असाच काही अर्थ इतर लावायचे.

महाविद्यालयात असताना कोणीच त्या दिवशी महाविद्यालयात जात नसायचे. संगणकाचा कोर्स करत असताना माझ्या एका मैत्रिणीला काही मुले त्रास द्यायचे. त्यांच्या बंदोबस्त करायला हाच उपाय मी तीला सांगितला होता. बिचारे! परत तिच्याकडे मन वर करून पण बघायची हिम्मत झाली नाही त्यापैकी कुणाची. पण  मी लहान असताना अस नव्हत, मला सक्खी बहिण नाही. रक्षा बंधनाच्या दिवशी आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या लहान भावाला) आईच राखी बांधायची. वडिल आम्हाला ५-५ रुपये द्यायचे आणि आम्ही राखी बांधून घेतल्यावर आईला द्यायचो. पण मन समाधानी व्ह्यायाचे नाही. मग आम्ही दोघेही आमच्या मित्राना बांधलेल्या राख्याकडे पाहत बसायचो. मग कधी तो नाही तर मी त्याला म्हणायचो, की तू माझा भाऊ एवजी बहिण असता तर किती चांगल झाल असत. मग तो हेच वाक्य मला सांगायचा. मग याच विषयावरून आम्ही दोघे तो दिवस दंगा मस्तीत घालावयाचो. खर तर त्याला आणि मला  खुप दुःख होत असायचे पण काय करणार?. पण हे सगळ लहान असतानाच. आता मित्राच्या बहिणी राख्या बांधतात.

आजच कंपनीत या विषयावर गप्पा मारत असताना एक म्हणाला माझी बहिण सध्याला इथे नाही. आणि हसला. अस का हसला अस विचारल त्यावर तो म्हणाला की माझा या महिन्याचा पगार वाचला. माझ्या एका मैत्रिणीने खुप महागडा मोबाइल आणला, तीला विचार कुठून आणला. तर ती म्हणाली मोठ्या भावाने रक्षाबंधन गिफ्ट दिल. एकुणच धक्का बसला. दहा हजाराच गिफ्ट. बिचारा तो अस म्हटल्यावर ती म्हणाली तोच म्हणाला तुला जे आवडेल ते घे. पण या बाबतीत मी खुपच लकी आहे. माझ्या सगळ्या बहिणी खुपच साध्या भोळ्या आहेत. ५०० दिले तरी वर्षभर आनंदात असतात. एकुणच या रक्षाबंधन म्हणजे घरात आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी धोका जरा जास्तच असतो.

No comments yet

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers