वर्चुअल हेअर कट
काल मला माझ्या कंपनीतील माझ्या एका सहकारीने एक ‘वर्चुअल हेअर कट’ नावाचे एक ध्वनिफीत ऐकवली. मी तिला विचारलं हे काय आहे? तर त्यावर ती म्हणाली एकूण तर बघ. तिचा एमपीथ्री प्लेअर घेतला आणि सुरु केली ती ध्वनिफीत. वा, त्यात कोणी तरी इंग्लिश मध्ये बोलत होते कि, तुम्हाला ‘वर्चुअल हेअर कट करायची का?’ नंतर तो कोण तरी स्त्री ला आवाज देतो. आणि मग ती येते. त्या पुढे मग काही विचारू नका. असे वाटते कि जणू काही ती आपलीच केस कापती आहे. तोच आभास होतो. ‘वर्चुअल हेअर कट‘ यावर क्लिक करा.
जर तुमच्या कडे हेडफोन असतील तर ऐकण्याची मजा काही येईल इतक नक्की. आज सकाळी मी माझ्या लोकल मधील एका मित्राला ते ऐकवलं तर तो म्हणाला कि, काय रे माझे केस कापली ना, त्याला म्हटलं कस वाटल तर तो बोलला अस वाटत होते कि मी केशकर्तनालयात आहे. बाकी बोलूच. तुम्हाला कस वाटत ते बघा ‘वर्चुअल हेअर कट‘

