Skip to content

उखाणे

नोव्हेंबर 9, 2009

आज संध्याकाळी माझ्या एका जीवालग मित्राला ‘तू आजकाल भेटत का नाहीस?’ अस विचारल्यावर तो खोचकपणे ‘मी आजकाल सिंहगड, सारस बागेत जास्तवेळ असतो म्हणून’ उत्तर दिले. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मी घर विकत घेतल्यावर तो ‘लग्न कधी करतो आहेस?’ अस विचारायला सुरवात केली. सुरवातीला हसून टाळले. पण तो कधीही कुठेही भेटला की हाच प्रश्न. मग शेवटी त्याचा माझ्या लग्नाचा विषय बंद करण्यासाठी मी त्याला नेटवरून एका मुलीचा फोटो दाखवला आणि त्याला म्हटलं की ‘ह्या मुलीशी माझ लग्न ठरलं आहे’. आता ती मुलगी कुठल्याही चित्रपटातील किंवा मालिकेतील नटी नसल्याने त्याला माझी थाप पचली. मग कधीही माझ्याशी लग्नाचा विषय काढला की मी तिचा विषय काढायचो.

मागील महिन्यात त्याने माझ्या लग्नाचा विषय बंद केला. आणि आज त्याला विचारल्यावर मलाही त्याच पद्धतीने उत्तरे द्यायला लागला. त्याला मी विचारलं की मुलगी कोण आहे. तर साहेब म्हणाले ‘नाव कस घेऊ?’. मग पुढे खूपच आढेवेढे घ्यायला लागला. त्याला म्हटले ‘तोंडाने घे, नाही तर उखाणा घे’. पण तो काही नाव घेईना. शेवटी काय कराव म्हणून मी नेटवरून एक भन्नाट साईट शोधली. मराठी उखाण्यांची. मग काय सुरु

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
**चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

तरीही काही नाव सांगेना मग

चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
**राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

मग तर तो जाम वैतागला. निघूनच गेला. असो, पण उखाणे बाकी जोमदार होते. त्यातील अजून काही मजेदार उखाणे वाचले.

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

पाव शेर रवा पाव शेर खवा
** चे नाव घेते हजार रुपये थेवा.

भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
**च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

असो शेवटी मित्र परत आला पण त्याने काही परत तो विषय काढला नाही. आता या नोंदीचा शेवट देखील उखाण्यानेच करतो. नाही तर तुम्ही देखील माझ्या लग्नाचा विषय सुरु कराल.

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

अरे विसरलोच, साईटचे नाव आहे उखाणे.को.इन

24 प्रतिक्रिया leave one →
  1. नोव्हेंबर 9, 2009 11:16 pm

    हा हा मस्त जिरवली मित्राची. काही काही लोकांना खूप खाज असते. मग ती खाज अशीच उतरवावी लागते.
    बाकी उखाणे मस्त होते. लग्ना आधीची तयारी वाटतं???? अर्रर्र अरे हे काय मी देखील प्रश्न विचारायला लागलो…

  2. नोव्हेंबर 10, 2009 8:23 सकाळी

    hehe aata pahaalyla paahije hi site :)

  3. मनोहर permalink
    नोव्हेंबर 10, 2009 4:44 pm

    उखाणा कपाबर कप सात, त्यावर ठेवली बशी, माझी बायको….. सोडून सगळ्यांच्या बायका म्हशी असा आहे.

  4. फेब्रुवारी 10, 2010 7:07 pm

    छान !करमणुक झाली. आभारी आहे.३४ वर्षापुर्वीची आठवन झाली.हल्ली मुल्म/ली उखाणे घेतातच कुठ?

  5. मार्च 7, 2010 11:37 सकाळी

    मराठीत वेडा म्हणतात तर इंग्रजीत सायको,
    ******रावांच नाव घेते ***** रावांची बायको !

    जमला का???????????

  6. pradnya muthal permalink
    मे 14, 2010 3:25 pm

    ukhae khupch changle aahe.

  7. ujwal permalink
    मे 29, 2010 4:32 pm

    khup masta ukhane ahet. pan new generation sathi kahi nave ukhane sanga na pls!

  8. ravindra katkade permalink
    जुलै 5, 2010 7:19 pm

    नेट भेट होता होता गळा भेट झाली
    ***च नाव घेताना disconnect कशी काय झाली

  9. नोव्हेंबर 15, 2010 8:15 pm

    चांदीच्या ताटात मुठभर गहू
    लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

  10. Anagha Chorghade permalink
    फेब्रुवारी 4, 2011 3:21 pm

    ukhae khupch changle aahe. mala munj (Thread ceremony) ukhana kalwa pls

  11. JAISHREE permalink
    फेब्रुवारी 23, 2011 8:33 pm

    Vishnu Narayana sarkha aamcha joda
    he aahe whisky mee yancha soda

    nice charolya collection i added one more

  12. RAJANI CHAVAN permalink
    एप्रिल 3, 2011 10:58 सकाळी

    Kharch ukhane khupch aavade ho mala

  13. sumeet permalink
    एप्रिल 5, 2011 3:24 pm

    ukhanyamadhye khup jokes ahet

  14. pravin permalink
    एप्रिल 17, 2011 4:28 pm

    oh ! very nice .

  15. swati deepali permalink
    मे 6, 2011 4:25 pm

    ukhane kharach khup chhan aahet.
    nagpanchmichya sanala kela sakhar bhaat
    ….naav ghete me……….naat.

  16. nilesh permalink
    मे 14, 2011 1:58 pm

    datta chya mandirat karat hoto arti
    datta chya mandirat karat hoto arti ti geli varti aani me rahilo khalti………….

  17. जून 4, 2011 4:41 pm

    khupach chhan .

  18. nilima permalink
    जून 11, 2011 2:23 pm

    very nice line but is true

  19. जुलै 21, 2011 4:20 pm

    Very Very Good

  20. Ajay Wadkar permalink
    जुलै 23, 2011 2:01 pm

    handya var hande saat hande tichyavar thavli parat tarun mula mulino ja 9 chya aat gharat

  21. Shubham permalink
    फेब्रुवारी 10, 2012 7:28 pm

    Yes

  22. Shubham permalink
    फेब्रुवारी 10, 2012 7:30 pm

    hehe aata pahaalyla paahije hi site

  23. sunil permalink
    मार्च 18, 2012 9:32 सकाळी

    Ukhane khup chagale aahet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers