Skip to content

जप

मार्च 18, 2010

ही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं बाजूला. ह्याचं आपल कमी कमी होत आहे. माझे आई वडील, दोघांचा देवावर खूप विश्वास. काय बोलणार. आणि माझा त्या दोघांवर विश्वास. म्हणून जप चालला आहे. आता अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही. तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे? देव जाणे.

वडीलांच अस म्हणण आहे की, जप केल्याने मानसिक ताकद वाढते. आईच म्हणण अस आहे की जपाने आपल पुण्य वाढत. असो, माझा काही याला विरोध नाही आहे. एखाद्या गोष्टीने दुसरा समाधानी होणार असेल तर करायला काय हरकत आहे? बर ह्यांना अस वाटत की मला लग्नासाठी येणाऱ्या अडचणी त्या जपाने नाहीशा होतील. माझा ना लग्नाला आणि ना जपाला विरोध. पण आई आजकाल इतका अतिरेक करते की काही विचारू नका. रोज दहा माळा करायला काय हरकत आहे अस म्हणते. आता एकतर कंपनीतून आल की फुटबॉल, तिथून आल की जेवण. बर ते झालं की तो जप. आणि दहा माळा करायला तासभर लागतो. आणि ते झालं की थोड्या वेळ संगणकावर बसायचं म्हटलं की झालं रात्रीचे दोन. आणि मग झोपायला तीन. आणि मग माझी पहाट होते सकाळी नऊ वाजता. कंपनीची वेळ आठ वाजता. आज आईला मला लग्नच नाही करायचे अस सांगून टाकल. पण काय फरक पडला नाही. वडिलांना देखील म्हणून बघितलं पण त्यांनी फारच मनावर घेतलं आहे माझ्या लग्नाच. सोडा तो विषय. मी बाकी मजेत आहे. काल थोडा माझा मूड हाप झाला होता. पण आता ठीक आहे. बाकी बोलूच.

3 प्रतिक्रिया leave one →
  1. मार्च 18, 2010 1:24 सकाळी

    chaan…
    avadala….lekh

  2. sharad permalink
    मार्च 18, 2010 5:04 pm

    tu kamit kami 51 wela jap kar diwasatun. mhanaje 51 x 108 wela. 1 mahinyat farak padel nakki.

  3. मार्च 18, 2010 5:28 pm

    मलाही आधी देव आहे की नाही असं वाटत होतं, पण त्यामागचं साईंटीफिक कारण समजल्यापासून ‘जप’ करणं हे आवश्कच असल्याची माझी ठाम खात्री झाली आहे. बाकी तो करणं जमत नाही, हा भाग वेगळा :-)

    “अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही” याबाबत तुमचं आणि आमचं शेम टू शेम :-) … पण… “तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे? देव जाणे.” नक्कीच काहितरी होईल… एकदा अगदी मनापासून दृढनिश्चयाने एकदा ट्राय करुन तर पहा.

    बाकी तुमचा ब्लॉग आणि लिहिण्याची पद्धत मनापासून आवडली… :-)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers