Skip to content

अर्धवट गोष्ट एका मंदिराची

सप्टेंबर 21, 2010

एक आटपाट नगरात एका नदीतीरी एक भव्य मंदिर होते. मंदिर होते एका मर्यादा पुरुषोत्तमचे. न्याय आणि सुराज्याचे दुसरे नाव. असा तो. तर लोकहो, बाबर नावाच्या एका परकीय शत्रूने त्या नगरीवर हल्ला करून ती जिंकली. त्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर देखील पाडले. तिथे त्याने स्वतःच्या नावाची एक मशीद उभारली. पण तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. शतकामागून शतके उलटली. पुढे जावून त्या देशावर ब्रिटीशांचे राज्य आले. तिथल्या लोकांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर उभारण्यासाठी ब्रिटिशांना विनंती, अर्ज करण्यात आले. पण ब्रिटीश सरकार मानेना.

शेवटी न्यायालयात हा विषय गेला. खर तर ज्या धर्माची ही मशीद होती. त्यांना देखील या मंदिराच्या उभारणीला विरोध नव्हता. तरीही हा विषय ‘वादग्रस्त’ म्हणून चिघळत ठेवला गेला. लोकांची सहनशक्ती संपत चाललेली होती. स्वातंत्र्यानंतर, चळवळ वाढत गेली. लोकांच्या मनातील पुरुषोत्तम तो ह्या गोष्टीचे कारण होता. त्याचा फायदा एका अतिशय छोट्या पक्षाने घेतला. मर्यादा पुरुषोत्तमचे पुन्हा मंदिर उभारू अशी घोषणा द्यायला सुरवात झाली. पाहता पाहता न भूतो न भविष्यती इतका मोठा पाठींबा त्यांना मिळाला. छोटा पक्ष आता बलाढ्य पक्ष बनला. इतका की, सत्ताधारी पक्ष देखील त्यांना टरकू लागला.

काही वर्षांनी त्या पक्षाने त्या मशिदीसमोर मंदिर संकल्पनेचा कार्यक्रम ठेवला. लाखोंच्या संख्येने लोक तिथे जमा झाले. आणि लोकांची सहनशक्ती संपली. जे मिळेल ते हाती घेऊन त्या मशीदीवर हल्लाबोल झाला. किमान सहा महिने लागतील अशा मशिदीला सहा तासात पाडण्यात आले. तरीही सरकार मंदिर बांधू देईना. मग लोकांनी ते सरकार बदलले. आणि त्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. पण त्या पक्षाने आपले वचन पाळले नाही. आणि न्यायालय देखील काही निर्णय देईना. सगळे पुरावे असून देखील न्याय मिळेना.

2 प्रतिक्रिया leave one →
  1. rahul permalink
    सप्टेंबर 21, 2010 3:39 pm

    mast

  2. सप्टेंबर 22, 2010 10:26 सकाळी

    भिजत घातलेले घोंगडे ……….. :(

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers