Skip to content

गोल

मार्च 3, 2011

गेले चार दिवसांपासून मी शाळेत जात आहे. म्हणजे चित्रकलेच्या क्लासला. जानेवारी महिन्यात मी फी भरलेली. पण मुहूर्त या महिन्यात लागला. माणसाच्या चेहऱ्याचे चित्र काढतांना लंबगोल आणि गोल हे बेसिक आहे. त्यावरच पूर्ण चेहरा अवलंबून असतो. पण, मी काढलेले लंबगोल जरा जास्तच ‘लंब’ होतो. अंडाकृती होतो. तर कधी ‘वर्तुळ’. काल एक चेहरा काढला. आता चेहऱ्याचे, डोळ्याचे, ओठांचे आणि कानाचे माप समजलेलं. चित्र काढल्यावर मात्र, आदिमानवाचा चेहरा तयार झाला. त्यानंतर काढलेला ‘गोल गप्पु’ झाला. यार, मी व्यंगचित्रकार होतो की काय याची शंका यायला लागली आहे. चित्रात आपोआप व्यंग निर्माण होते.

मनमोहन सिंगचे चित्र काढतांना पगडी जाम मोठी झाली. आणि प्रणव’दा’चा चष्मा. त्यानंतर एक चेहरा काढला तर नाक खूप मोठे झाले. बाकी शेडींग करतांना फार काही अडचण वाटत नाही. माझे पुण्य म्हणायचे माझी चित्र पाहून, मला चित्रकला शिकवणारी शिक्षिका हसत नाही. एकूणच आजकाल माझा दिनमान चित्रमय झाल आहे. एकतर माझ ‘डिझायनर’ म्हणून ही घुसखोरी आहे. मी वेब डिझायनर म्हणून चार वर्ष झाली. आता घुसखोर म्हणून राहायचे नाही अस ठरवलं आहे. त्यासाठी हा सगळा उद्योग. पण हा ‘गोल’ काय पुढे जाऊ देईना. गोल त्या शून्या प्रमाणे असायला हवा. माझा गोल म्हणजे वर्तुळ नाहीतर अंडे. आज गोल काढण्याचा सराव करीत आहे. असो, बाकी बोलूच.

No comments yet

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers