Skip to content

क्षमा असावी.. महाराज

नोव्हेंबर 18, 2011

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा.

तुमच्या इतिहासाने कोणत्या मराठ्याच्या अंगातल रक्त सळसळणार नाही? छाती पहाडी आणि मनगटात हत्तीच बळ येणार नाही? महाराज वर्तमान असा आहे की, तुमच्या इतिहासात जातीची भिंग लावून लई मोठ्ठी शोधमोहीम चालू झालीय. मग काय, हा अमक्या जातीचा. काढा ह्याला बाहेर. इतिहासातून त्याची पाळमूळ तोडा. आधी सरकार करायचं. महाराज आमचा वर्तमान अंधारात चाललाय. रस्त्याचे प्रश्न सोडा पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडते आहे. आमचे हुशार अर्थतज्ञ प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाची अवस्था एखाद्या रुग्णालयात अंथरुणाला खिळलेल्या सत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्याची केलीय. बर, इतकी महागाई केलीय की. आमचं चिडणं देखील बंद होवून गेलंय. भाववाढ म्हणजे सरकारच खेळण झाल् आहे. कधी हे सरकार जातंय अस करून सोडलं याने.

पण इकड मात्र, आपले मावळे मंडळी. एकमेकांच्या जातीचा उद्धार करण्यातच मश्गुल. महाराज, यात भविष्य आहे का? तुम्ही स्वराज्य निर्माण केल. त्याच सर्वस्वी श्रेय फक्त तुम्हाला आहे. मग मी महाराजांच्या जातीचा. म्हंजी महाराज फकस्त माजे. अस बोलण्याला काय अर्थ आहे? आणि इतिहासात फकस्त माझ्याच जातीचे लोकांनी महाराजांना साथ दिली. उरलेली सगळी मंडळी जन्माला आलेलीच नव्हती. नंतर इतिहासात टाकली.

महाराज, खरंच यावर बोलायला देखील लाज वाटते. तिकडे शेतकरी शेतमालासाठी आंदोलन करत आहेत. अनेकांनी जगण्याला कंटाळून आत्महत्या केली. आता हे सुद्धा जातीच्या चष्म्यातून पहायचं म्हटलं तर अनेक सावज सापडतील. पण आपले मावळे काय जातीचा चष्मा सोडायला तयार नाहीत. बर राजे, सगळे असेच. हा त्याच्या जातीला आणि तो ह्याच्या जातीला नाव ठेवणार. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. देशात काय चाललंय. प्रत्येक प्रश्न किती गंभीर होत चाललंय. पण ते गेल् चुलीत. माजी जात आन फकस्त माझेच महाराज. महाराज, नाव तुमचे घेणार. आणि रात्री दारूत बुडणार. सकाळ झाली की, कालच्याच विषयावर. माझी जात म्हणजे लय भारी. आणि महाराज काय झाल् की, माफी मागयालाच हवी. बर ह्यांच्यात काय अस पहावं, तर फक्त ‘जात’. महाराज ह्यांच्या जातीच भूत डोक्यातून काढा. तसदी बद्दल क्षमा मागतो. जय भवानी| जय शिवाजी||

7 प्रतिक्रिया leave one →
  1. नोव्हेंबर 18, 2011 9:11 सकाळी

    :( …shokantikach aahe hi…

  2. सौ गीतांजली शेलार permalink
    नोव्हेंबर 18, 2011 9:39 सकाळी

    महाराजही अस्वस्थ होतील हे पाहिल्यावर ! असंच राज्य आज चालू आहे !

  3. नोव्हेंबर 18, 2011 10:47 सकाळी

    शिवाजी महाराजांनी जातपात , धर्म न पाहता केवळ गुणवत्ता व चारित्र्य हा निकष लावून सैन्य व स्वराज्याची उभारणी केली हे सध्याच्या टोळभैरव राज्यकर्त्यांनी विसरू नये .

  4. अभिषेक permalink
    नोव्हेंबर 18, 2011 10:54 सकाळी

    महाराजांनी वर नेल… आता हे उरफाटे खाली खेचत आहेत…
    आम्हाला फक्त उस्फुर्त इतिहास कळतो, त्याच्या डीटेल्स मध्ये इंटरेस्ट नाही. त्यामूळ कोणाच जे काही असेल, आमच मात्र जय भवानी| जय शिवाजी||

  5. नोव्हेंबर 22, 2011 11:18 सकाळी

    क्षमा आहेच…
    दया क्षमा आणि शांती, तेथे देवांची वसति. हा वसति सुसंस्कृत आहे हे विसरू नका श्री रामा तू मला मधिल भावबंधनातला आहे

  6. Prafull Thorve permalink
    डिसेंबर 10, 2011 11:56 सकाळी

    महाराजांनी कधीच जात-धर्म असा भेदभाव केला नाही, आणि सर्व जाती-धर्मातल्या माणसांना घेऊन “हिंदवी स्वराज्याची” स्थापना केली.
    आणि हाच इतीहास आपले राज्यकर्ते विसरले आहेत.
    “जो आपला इतिहास विसरतो, तो कधीच पुन्हा इतिहास घडवु शकत नाही.”
    - प्रफुल्ल थोरवे.

  7. onkar permalink
    मे 20, 2012 7:06 pm

    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो….

    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो….

    राजे असा कंटाळा करून चालणार नाही
    माझ्याशिवाय तुमच्याशी
    खरे कुणीच बोलणार नाही
    ’गाईड’होण्याची संधीही
    मी कशाला हुकवतो?
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

    सुरूवात शिवनेरीपासून?
    की,रायगडापासून करायची?
    उलटी की सुलटी?
    कोणती मळवाट धरायची?
    असे कोड्यामध्ये पडू नका,
    कुणालाच उपदेश नको,
    “आपापसात लढू नका”
    तेव्हाही पटले नाही,
    आत्ताही पटणार नाही.
    मरतील पण सवयीपासून
    मागे कुणी हटणार नाही.
    म्हातारीच्या मरणाने
    काळ बघा कसा सोकावतो?
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

    शिवबा घडवायचा असेल तर
    त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
    शहाजीच्या मनामध्ये
    ही आस ठसली पाहिजे.
    पण आजकाल हे सारे
    घडताना दिसत नाही
    तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
    पण पचनी पडताना दिसत नाही.
    पोकळ मराठी बाणा तर
    बघा स्वत:लच फ़सवतो
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    ते बघा नवे देशमुख,
    ते बघा नवे देशपांडे,
    वतनदारीसाठी टपलेले आहेत
    त्यांच्या आतली काळी माणसं
    खादीमध्ये लपलेले आहेत.
    पराक्रमाला तोड नाही
    कर्तुत्वाला जोड नाही
    महाराष्ट्राच्या भल्याची
    स्वार्थापुढे ओढ नाही
    म्हणूनच तर सह्याद्री
    आपला माथा झुकवतो
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
    तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
    पिसाळांचा सूर्याजी तर
    इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
    “आधी लगीन कोंढाण्याचे”
    म्हणण्याची
    आज तानाजीत हिंमत नाही
    बापजाद्यांच्या पराक्रमांची
    आज रायबाला किंमत नाही.
    इतिहास राहिला नाही
    जो तो सोईप्रमाणे
    आज इतिहासाला वाकवतो.
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    आपलेच आपल्याला लुटायला
    लागले
    परक्यांची आवश्यकता नाही
    परक्यांनीच लुटले पाहिजे
    हा काही त्यांचाच मक्ता नाही.
    डोळे मिटलेल्या मांजरीचे
    सारे नखरे कळत आहेत
    मनातल्या मनात शायिस्तेखानाची
    बोटे अजून वळवळ्त आहेत.
    आपलाच गनिमी कावा
    बघा आपल्यालाच कसा चकवतो?
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    तो बघ प्रतापगड सांगतोय,
    इथेच पराक्रम घडला होता.
    अफ़जुल्याचा कोथळा
    बाहेर पायथ्याशी पडला होता.
    अजूनही अफ़जुल्या
    तो पराक्रम सांगतो आहे.
    आम्ही आमची अक्कल
    उगीच वेशीला टांगतो आहे.
    मेलेल्यांशी वैर धरून
    कुणी अफ़वा इथे पिकवतो
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    तो बघा ज्याचा प्रदेश,
    तिथेच त्याचा किल्ला आहे.
    इष्टप्रधान मंडळाचा
    फ़ायदेशिर सल्ला आहे.
    ज्याचा त्याचा झेंडा आहे
    ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
    सुखी माणूस तोच,
    ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
    डोक्यावरून पाणी चाललेय
    जो तो आपल्यापुरते चुकवतो
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    शिवा काशिद,मुरारबाजी,
    नेताजी,हिरोजी आणि मदारी
    आता भेटाण्याची आशा नाही.
    जीवाला जीव देण्याची,
    मावळ्यांना आता नशा नाही.
    खूप झाल्या सेना,
    खूप झाले सेनापती,
    सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
    वाईट वाटण्याचे कारण नाही,
    आजच्या राजकारणाची
    हीच धाटणी आहे.
    निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
    पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    पुरंदरच्या तहाची परंपरा
    आजकाल जोरात पाळली जाते.
    परस्परांचा फ़ायदा असेल तर
    राजकीय लढाईही टाळली जाते.
    राजकीय मांडवली झाली की,
    पाच वर्षापुरते तरी भागते.
    राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
    वाघाचे काळीज लागते.
    दुसर्याच्या जळत्या घरासामोर
    आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    राजे,यांना शहाणे समजू नका,
    हे तर चक्क बावळे आहेत.
    तुम्हाला केलेय देव त्यांनी,
    तुमची इथे देवळे आहेत.
    लाज वाटते म्हणून सांगतो,
    आम्ही पदरचे रेटत नाही.
    तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
    आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
    खरा इतिहास राहिला बाजूला,
    ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    शेतकर्यांची अवस्था अशी की,
    जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
    बारा महिने तेरा त्रिकाळ
    त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
    राजे,चूकुनही बघू नका
    त्यांची अवस्था कशी आहे?
    विषासाठी पैसा नसेल तर
    घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
    व्याजाने व्याज वाढत जाते
    तरीही विचारतात,
    हप्ता का थकवतो ?
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    सरकार म्हणाले शिका,
    पोरं इथले शिकले आहेत.
    शिक्षणाची दुकाने तर
    वढ्या-वघळीला टाकले आहेत.
    सिंहगडाखालचा पराक्रम तर
    खरोखरच बघण्यासारखा होता.
    रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
    उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
    येतील तसे दिवस
    आपला महाराष्ट्र धकवतो.
    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

    जसे राजकारणाचे,
    तसे साहित्याचेही झाले आहे.
    सहकाराला स्वाहाकाराचे
    बकासुरी रूप आले आहे.
    आया-बहिणींच्या इज्ज्तीची
    समस्या तर जटील आहे.
    नाक्या-नाक्यावर उभा
    जणू रांझ्याचा पाटील आहे.
    लोकशाहीचा पाईक मी,
    तुमच्या राजेशाहीसमोर
    माझा माथा टेकवतो.
    राजे, चला
    मी तुम्हाला
    तु तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers