वीज आणि काम

शाळेत असताना आम्हाला नेहमी परीक्षेत एक प्रश्न असायचा की ‘माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या ?’ आणि असा प्रश्न आला की आम्ही हमखास ‘अन्न, पाणी आणि निवारा’ अस डोळेझाकून उत्तर लिहून गुण मिळवायचो. पण आज सकाळपासून ज्या ज्या घटना घडल्या त्यापासून मी माणसाच्या अजूनही काही गरजा असतात, या निर्णायाप्रत आलेलो आहे. Continue reading

Advertisements

खर्चाच गणित

मागच्या दोन महिन्यापासून खर्च अगदी कळस गाठ तोय. ‘ कमाई चाराणे खर्च रुपया ‘ अशातली ही गत झाली आहे. त्यात आपल्या देशात मनमोहनचे राज्य. म्हणजे विचार करायला वावच नाही. Continue reading

मागील वर्षात काय कमावले?

सर्वसाधारण पणे माणसाचे जीवनाचा कार्यकाळ हा 60 वर्षांचा असतो. त्यात आपण 20 वर्ष झोपेत घालवतो. म्हणजे एक तृतीयांश वेळ. मी दररोज 2 ते 2.5 तास प्रवासात घालतो. याचा अर्थ सर्वसाधारण पणे आपण 5 वर्ष प्रवासात घालवतो. कंपनीत मी दररोज 8 तास काम करतो. म्हणजे मी 20 वर्ष कंपनीत घालवतो.

म्हणजे याचा अर्थ मी आयुष्यातील 45 वर्ष असेच घालवणार. उरलेले 15 वर्ष हेच काय ते माझे जीवन. यात मी शालेय आणि शैक्षणिक या गोष्टीत पडणार नाही. म्हणजे आता काय जे काही मी कमावणार ते या 15 वर्षातला असेल. मग त्यात माझी कमाई म्हणजे मित्र, आणि माझे असलेले घरातील नातेवाईक. Continue reading

नमस्कार :)

माझ्या या नावाचा ब्लॉग सुरू करताना मला खरच खूप आनंद होत आहे. माझी मते मी यात मी मांडेल. माझे अनुभव मी यात तुमच्याशी हितगुज करेन. या आधी देखील मी काही ब्लॉग बनवले होते. पण आता मी माझ्या नावाने करायचे ठरवले आहे. असो, हा माझा पहिला वाहिला ब्लॉग.

मला अस नेहमी वाटत आलाय की आपण नेहमी काही तरी कराव आणि ते सातत्याने टिकवाव. म्हणजे कोणी मित्र करावा, त्याच्याशी मैत्री कायम राहावी. कोणते काम करावे, ते देखील सातत्याने व्हावे. आणि आनंदाची गोष्ट अशी की मी यात बर्‍याच अंशी सफल झालो आहे.

असो, पुन्हा भेट होईलच!

या पुढे विरोध नाही

जवळपास एक वर्ष, जी लोक मला एक व्यक्ती म्हणून आणि एक सहकारी म्हणून आवडत नव्हती. त्याच्या बद्दलचा खूप राग कमी झाला. ते केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेममुळेच. आपल जर खरच कोणावर प्रेम असेल ना तर आपण त्या साठी काहीही करायला तयार असतो. मग आपली भाषा , प्रांत, हे काही आडवे येत नाही. कारण त्यात फक़त प्रेम असते, स्वार्थ नाही. Continue reading