वीज आणि काम

शाळेत असताना आम्हाला नेहमी परीक्षेत एक प्रश्न असायचा की ‘माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या ?’ आणि असा प्रश्न आला की आम्ही हमखास ‘अन्न, पाणी आणि निवारा’ अस डोळेझाकून उत्तर लिहून गुण मिळवायचो. पण आज सकाळपासून ज्या ज्या घटना घडल्या त्यापासून मी माणसाच्या अजूनही काही गरजा असतात, या निर्णायाप्रत आलेलो आहे.

काळ रात्रभर आमच्या इथे वीज नव्हती. त्यातून मी माझा मोबाइल चार्जिंग केलेले नसल्यामुळे सकाळी मोबाइल लो बॅटरी दाखवत होता. त्यात आज माझी पाहत सकाळी 7:20 ला झाली. सगळा आटापिटा करून घरातून 8:10 घरातून निघालो. लोकल 8:21 असल्याने धावपळ झाली. तास माझ घर आणि रेलवे स्टेशन यात 15 मिनिटांचे पाय अंतर आहे. उशीर झाल्याने मी रिक्षातून जाणायचा बेत आखला. पण म्हणतात ना ‘नशीबच गानडू तर काय करील पांडू ‘. नेमक्या त्या वेळेस एक स्कार्फ घातलेल्या ताई (माझी नाही) माझ्या पुढ येऊन रिक्षात बसून गेल्या. दुसर्‍या रिक्षा वाल्याला विचारल तर त्याची पीन खराब! (रिक्षा ची हो). आता काय करव म्हणून पटापटा चालत, कधी कधी पळत. स्टेशन वर पोहचलो तर लोकल बाई निघून गेलेल्या. म्हटल बस पकडावी. तर तिने देखील धावण्याची शर्यद लावली. मग काय करणार. 9:03 च्या लोकलने पुणे स्टेशन ला आलो. कशीबशी रिक्षा पकडून कंपनीत येऊन पोहचलो.

तीत येऊन बघतो, तर कामाचा हिमालय झालेला. त्यात आमच्या बॉस ला कधी कधी मीटिंग ची लहर येते. मग आम्ही तरी काय करणार. बसलो. आणि(नाही कसे म्हणणार) त्याचे ह.भ.प प्रवचन एकले. त्यात सकाळ पासून वीज नाही. बॅकप फार फार तर 3 तास चालेल एवढाच. वीज नाही. त्यामुळे एसी, पंखा सगळाच बंद. त्यात माझा मोबाइल शेवटच्या घटका मोजू लागला. ह्या सगळ्या घटना घडत असताना अस वाटत होत की जर वीज नाही तर कस होणार?. माझ काम संगणकावर, वीज नाही तर काम कस मी करणार. आणि मोबाइल जर बंद पडला तर… विचार करून मन अगदी सुन्न झाले. हा विचार कधीच केला नव्हता. आता जीवनावश्यक गोष्टी मधे एकाची अजुन एक भर पडली आहे. ती म्हणजे वीज.

Advertisements

2 thoughts on “वीज आणि काम

  1. ह्हाह्हाह्हा!
    मूलभूत गरज वीज तर आहेच पण मोबाईलही थोडाफार!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s