राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी

ही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही? कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे.  मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही. Continue reading

Advertisements

ए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक

पुण्यात ए टी म्  चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म्  मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्सेप्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची. Continue reading

इडियट

इडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो  ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो. Continue reading

ती

कशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. Continue reading

नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल

आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय  गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल. Continue reading

मला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे

काल  सकाळची ९ वाजता ची लोकल नेहमी प्रमाणे उशिरा पुणे स्टेशनला पोहचली. झाले तिथेच दहा वाजले. कंपनीत लवकर पोहचाव या उदेश्याने मी रिक्षेने जायचे ठरविले. प्लेटफोर्म क्रमांक ६ वर लोकल आल्याने मला ल मेरेडियन च्या बाजूने जाणे सोपे होते. बाहेर एका रिक्षा वाल्याला विचारले “कोरेगाव पार्क चलणार का?”. तो हो म्हणाला, आणि मी बसणार तेवढ्यात म्हणाला “फिफ्टी रुपिझ होगा”. त्याने पहिल्यांदी ‘हो’ असे उत्तर दिले. नंतर हिंदी डायरेक्ट . काय करणार पूणेकरांची खोड. Continue reading

लोकलमधील आसने

चकित झालात? अहो मी खर तेच बोलतो आहे. लोकलचा प्रवास म्हणाला की त्याबरोबर अनेक गोष्टी आल्याच. या आसनाचा शोध(साक्षात्कार), होण्यासाठी कोणत्याही तपाचा किंवा क्लास, किंवा कोणत्या बुवाची गरज नाही. आता हेच बघा, लोकलची वाट पाहत तुम्ही उभे रहता. कधी गाडीच्या दिशेने, तर कधी सिग्नल्च्या दिशेने बघता ही क्रिया अनेक वेळा होते. आत ही आसनाची पूर्व तयारी. Continue reading