मला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे

काल  सकाळची ९ वाजता ची लोकल नेहमी प्रमाणे उशिरा पुणे स्टेशनला पोहचली. झाले तिथेच दहा वाजले. कंपनीत लवकर पोहचाव या उदेश्याने मी रिक्षेने जायचे ठरविले. प्लेटफोर्म क्रमांक ६ वर लोकल आल्याने मला ल मेरेडियन च्या बाजूने जाणे सोपे होते. बाहेर एका रिक्षा वाल्याला विचारले “कोरेगाव पार्क चलणार का?”. तो हो म्हणाला, आणि मी बसणार तेवढ्यात म्हणाला “फिफ्टी रुपिझ होगा”. त्याने पहिल्यांदी ‘हो’ असे उत्तर दिले. नंतर हिंदी डायरेक्ट . काय करणार पूणेकरांची खोड.

त्याने असे म्हटल्यावर माझे डोकाच सरकल. त्याला म्हणालो “मीटर प्रमाणे घ्या” . साहेब काहीच म्हणाले नाही. मग काय करणार, पुढच्या रिक्षेकडे गेलो. दोन युपि भय्ये कोणत्यातरी विषयावरून आपापसात भांडत होते.  मी त्यातल्या एकाला विचारल “कोरेगाव पार्क चलणार का?”  . अस म्हटल्यावर एकाने माझ्याकडे बघून “हो” असे उत्तर दिले. तरी देखिल त्याच्या रिक्षेत बसाव की नको असा मनात प्रश्न पडला. बसलो एकदाचा. मीटर सुरु करून रिक्षा निघाली. वाडिया कॉलेज च्या पुढच्या चौकात त्याने उजव्या हाताला जन्य एवजी सरळ निघाला. त्याला मी हटकून, उजवीकडे जाण्यास सांगितले. रिक्षा उजवीकडे वल्ली. आता मात्र मला त्याचा खुपच राग आला होता. एक तर भैय्या, त्यातून मला फसवतो. रिक्षा ताजच्या जवळ आल्या वर त्याने प्रांजल आवाजात “माझ्या लक्षात आले नाही. मी चुकलो” अस म्हणाला. ते पण स्पष्ट मराठीत. मला काही क्षण काही समजलच नाही.

शुद्ध मराठीत त्याने माफ़ी मागितली. एका भैय्याने !. माझ्या कंपनीत भैय्या नसले म्हणुन काय झाल काही परप्रांतीय आहेत. एक सोडून बाकी सगळे किमान एक वर्ष ते ८ वर्षे इथे पूणे येथे रहातात. त्यांच्या घराची परिस्थिती उत्तम. मोठ मोठ्या पदावर काम करणार्यांना मराठी भाषा येत नाही. आणि त्याना ती येत नाही म्हणुन ते मराठीचा तिरस्कार करतात. बर, ते सोडाच काही मराठी त्याना राग येऊ नये म्हणुन मराठीचा तिरस्कार करतात. हा सर्व चित्रपट झरकण डोळ्यासमोरून गेला. जात असताना त्या भैय्याने “कुठे थांबवू ?” असे देखिल विचारले. पण ज्यवेली उतरून मी कंपनीत येत होतो त्यावेळी खरच मनात आनद लहरी उसळत होत्या. मला त्याच्या विषयी अभिमान वाटत होता. तो भैय्या असून देखिल.

Advertisements

2 thoughts on “मला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे

  1. great, mi mumbait asto, mala hi ithe khup bhaiyye bhetale je shuddh maratit boltat n service changli dhartat, ya ulat punyatle marathi Autowale mhanje dokyala tapp asto nussta…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s