ती

कशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो.

ही २००७ ची घटना. काका खुपच चांगला. त्याने माझी रहाण्याची, खाण्याची अशा महत्वाच्या सोयी केल्या. पूणे म्हणजे काय बोलावे. म्हणतात ना ‘पूणे तिथे काय उणे’. अगदी बरोबर आहे. माझे चुलत भाऊ बहिण त्यावेळी तीसरी चौथिला. छोटे असल्याने माझ्या सोबत दंगा मस्ती सोडून दूसरा काही उद्योग नाही. मी दिवस नोकरीच्या शोधत फिरयाचो आणि संध्याकाळी, या बच्चे कंपनी बरोबर दंगामस्ती. आईची माया खुपच कमी लाभली त्या दोघांना. शेजारीच एक मुलगी रहायची. ती शाळेत शिक्षिका. आणि घरी आल्यावर यांचा अभ्यास घ्यायची.आमची कंपनी तिच्यावर तेवढेच प्रेम करायचे जेवढे माझ्यावर करायचे. मी दिवसभर बाहेर असल्याने तिच्याशी काही संबंधाच येत नसायचा.  पहिल्यांदी ज्यावेळी मी तिला पाहिले त्यावेळी  तिचा गहू वर्ण, कमनीय छाती, चेहर्यावर लहान लहान फोड़ (जवानित सगळ्यानाच असे येतात). नाजुक कंबर. अशी  काय ती तिची काया. क्लास मधे असताना फटका टाइप च्या मुलींशी दोस्ती. या कारणाने तिला बघून मला काही वाटेल याची अपेक्षा न ठेवालीच तर बरे.

एका बोपोडिच्या इ-लीर्निंग च्या कंपनीत मला माझी पहिली नोकरी मिळाली. पगार अपेक्षेच्या मानाने खुपच कमी. पण एका महिन्यानंतर त्यानी मला एका मल्टीनेशनल कंपनीत या कंपनी तर्फे पाठवले. पगार पण अडीच पटीने वाढला. त्यावेळी तिचे आई वडिल तिच्या लग्नाचे बघत होते. माझे वडिल ज्योतिषी.  मग कधी कोणाची तर कधी कोणाची अशी पत्रिका. मग वडिल पुण्यात आले की तिचे आई वडिल तिची पत्रिका दाखवायचे. मी नविन असल्यामुळे मी काही कोणाशी फार काही बोलायचो नाही. मग काही दिवसानी मी माझा घराचा संगणक पुण्यात आणला. कधी कधी सुटीच्या दिवशी मी संगणक काही तरी कामा निमित्ताने संगणक चालू ठेउन तसाच झोपी जायचो. जेवण झाल्यावर खर तर मी झोपत नसयचो पण, दुपारचे उन आणि गार वारा, मग काय झोप तर हमखास लागायची. मी घरी असल्यावर ती तिचा क्लास तिच्याच घरी घ्यायची. कधी कधी तिच्या घरी तिच्या वडिलांचे मित्र मंडळी यायचे. मग मात्र त्यावेळी ती तिचा क्लास आमच्या घरी घ्यायची. मग कधी असा संगणक चालू आणि मी झोपलेलो बघितले की ती बंद करण्याचा प्रयत्न करायची. पण मी बघेन या भीतीने संगणक पासून फार दूर रहायची. अस कधी बघितले की खुप हसू यायचे. ती मला घाबरते की काय अस वाटायचे. कधी कधी माझ्या बॉस असे काही इंग्लिश शब्द सांगायचा की, मला काही समजायचे नाही. मग मी माझ्या लहान बहिणी मार्फ़त तिला त्याचे अर्थ विचारायाचो.

मग ती कधी, तिला नाही तर कधी स्वत: येउन त्याचा अर्थ सांगायची. पण कधीही नाही संगीताला अस नाही. तिचा तो गोड स्वभाव. तीच ते हास्य बघून. माझे मन विचलित होऊ लागले. कंपनीत, बस किंवा लोकल कोणी मुलगी बघितली की याच बाई साहेब दिसायच्या. एकदा मी बाहेरच्या खोलीत झोपलो होतो. अचानक मला जाग आली आणि डोळे उघडून बघतो तर काय एक अप्सरा माझ्या समोर उभी. डोळे चोळत बघतो तर काय या बाई साहेब. खर सांगू तर मी माझ्या स्वप्नातली सुंदरी पहायचो तशी, अगदी तशी. त्या दिवशी तिचे रूप बघितले आणि मी खरच वेडा झालो. मला नेहमी अशी मुलगी हवी होती की जी माझ्यावर प्रेम करेल, जीला १००० मैत्रिणी आणि २००० मित्र नसतील. जो कोणी असेल तो मीच. जी फक्त माझी असेल. पण काय करणार तिला कस सांगू . मग तिचा विषय डोक्यातून जावा म्हणुन मी तिच्याशी निष्कारण काही तरी उलट बोलायचो. पण ती मात्र सर्व राग विसरून पुन्हा माझ्याशी अगदी प्रेमाने बोलायची. खर तर तिचे वागने बघून मला समजले की मुली फक्त मुलाना ‘USE & THROUGH’ पुरते पाहत नाही. पण काय करणार. न माझ्याकडे तिला संभालान्याची ताकद ना माझे काही बैंक बैलेंस. तिला सांगायची तर इछा खुप पण तिच्या बरोबर लग्न झाल्यावर मी तिला कुठे ठेवणार. आणि ती पण माझावर का प्रेम करेल?. मग सगला विचार करून मी ठरवले की, तिला डोक्यातून काढायचे तर एकाच मार्ग. इथून निघून जायचे. मग काय मी माझ्या आई वडिलांची संमतीने मी मुंबई गाठली. पण सगळ व्यर्थ. तिचा काही विषय सुटेना. मग ठरवले की जास्त पगाराची नोकरी शोधायची, निदान दोघाना पुरेल एवढे तरी. आणि तिला मनातले सगळे सांगुन टाकायचे. ७-८ महिन्या नंतर मी पुन्हा एका पुण्यात नोकरी शोधली. आणि आलो येताना सगळ ठरवल. काय आणि कस म्हणायच. पण सगळ व्यर्थ आल्यावर तिचे ते रूप पाहिले आणि थक्कच झालो.

आधी प्रमाणे तिच्याकडे वेळ, प्रेमाची भावना अस काहीच उरल नव्हत. कायम ती तिच्या मोबाइल वर. जे समजयाच ते मी समजलो. पण हे मुर्ख मन मानेल तर शपथ. मग मी सगल्या चाली वापरल्या. त्या काकू म्हणजे तिची आई, तिची छोटी बहिण, भाऊ, वडिल अशा सगाल्याना खुप खुश ठेवायचा प्रयत्न  केला पण, सगळ व्यर्थ. तिला कोणी तरी दुसराच आवडला. आणि मला काल समजले की तिने त्याच्या बरोबर आई वडिलांचा विरोध पत्करून त्याच्याशी लग्न केल. असो, आज कंपनीत काही मन लागले नाही. अजुन देखील डोक दुखत आहे. काय चालले हेच नेमक कळत नाही आहे. सगळ ठरवून मी केल. तिला अड़चण नको म्हणुन घर घेतल. असो, जाऊ द्या ती गेली. काल दुःख, सुख आणि आर्श्चय एका वेळी झाल्यावर कसे वाटते याचा अनुभव आला. पण मन मुर्ख ते मुर्खच.

Advertisements

5 thoughts on “ती

  1. अरेरे… असं व्हायला नको होतं…

    बाय द वे, खुप छान लिहितोस तू… मराठी थोडं अशुद्ध आहे पण कदाचित तू खेडयातला मुलगा असावास त्यामुळे असेल तसं… शुद्ध मराठीत लिहिण्याचा प्रयत्न कर… आम्हा वाचकांना वाचायला अजून चांगलं वाटेल….

  2. कधी सांगितल च नाही तू तुझ्या या अपूर्णा प्रेम प्रकरणा बद्दल.
    तस मी काही लव गुरू नाहीए पण आपल्या हिंदी पिक्चर्स मध्ये अस नेहमी म्हणतात की प्रेमात उशीर करू नये.
    असो. तुला पुन्हा प्रेम झाले तर त्यात तू यशस्वी होवो अशी देवा चरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s