पीएमपीएल म्हणजे जलद आणि उद्धट सेवा

आज कंपनीतून निघायला उशीर झाला. माझ्या मित्राने मला बोपोडी पर्यंत त्याच्या दुचाकीवर सोडले. बोपोडीच्या बस स्थानकावरून (स्थानक वगैरे काही नाही. पण जिथे बस थांबतात त्यालाच इथे स्थानक म्हणतात) निगडीची बस पकडली. बसायला जागा नव्हतीच. मग मी पार पुढे, बस चालकाच्या मागे असणाऱ्या जाळीला धरून उभा राहिलो. नेहमी प्रमाणे वाहक म्हणजे कंडक्टर काही लवकर तिकीट मागायला आला नाही. ड्रायव्हर पण काही विचारू नका. धूम ३ चा वगैरे कोणी विचार करत असेल तर त्याचा विचार नक्की व्हावा. काय घाई म्हणावी त्याची, वा अगदी समोरील गाड्या एका मागून एक मागे जात होत्या. अस वाटत होत कि संगणकावर कुठला तरी रेसिंग चा खेळ खेळत आहोत. दापोडी, फुगेवाडी कधी गेल कळलंच नाही. वल्लभनगरच्या थोडे पुढे असताना, एका स्कूटीवर दोन स्त्रिया चालल्या होत्या. आमची बस मागून आली. बस आणि ती स्कुटी यातलं अंतर फारच कमी होत. त्यात एका ठिकाणी त्या स्त्रीने ब्रेक मारला. झाल ह्या ड्रायव्हारने कशी बशी वेगात असलेली बस सावरली. पण शांत बसेल तो ड्रायव्हार कसला. त्याने बस तिच्या पुढे नेवून तिला शिव्यांची लाखोली वाहिली. Continue reading

Advertisements

बोलण आणि करणं

आज सकाळी नऊची लोकल हुकली. खर तर चूक माझीच होती. मी उठलो होतो, ७:४५ ला पण पुन्हा झोपलो. आणि मग जाग आली ८:२० ला. मागच्या दोन – तीन दिवसांपासून रोजच देवपूजा आणि अथर्वशीर्ष होताच नाही आहे. आणि माझा रोज रात्री झोपताना मी हाच विचार करतो कि उद्या सकाळी लवकर उठायचं. पण होताच नाही उठण. खरच आपण जे ठरवतो आणि करतो यात किती फरक पडत असतो. याचा असा कधी मी विचारच केला नव्हता. माझी आई नेहमी म्हणत असते कि ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’. आंपण जे बोलतो आणि ठरवतो यावर आपण चालव असा आईचा दंडक. वडील कोणतीही गोष्ट आधी बोलत नाहीत करून दाखवतात. आणि उरलो मी जो फ़क़्त ठरवतो करत नाही अस नाही पण ते कधी कधी. Continue reading

कुठे आहे राज ठाकरे?

आज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे?’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा?’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे?’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत?, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का?’ मग कुठे काही म्हणतात. Continue reading

आता म्हणाले खोट बोला

आज दुपारी परत त्या लोनवाल्याचा फोन. म्हणाला कि पैसे मी माझ्या हेडकडे दिले आहेत. तुम्ही आज येवून घेवून जा. मला एकूण आश्चर्यच झाले. काल परवा पर्यंत, ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात देतो म्हणणारा आज अगदी पैसे घेवून जा म्हणतोय. मी त्याला ठीक आहे अस म्हणालो. नंतर संध्याकाळी त्याच्या हेडला फोन केला तर तो मला म्हणाला कि तुमचे पैसे माझ्याकडे त्याने दिलेले आहेत. तुम्ही कधीही येवून घेवून जावू शकता. वाटल तर मी तुमच्या घरी येवून पैसे देतो. पण तुम्ही मला एक वायदा करा कि कस्टमर केअर कडून जर फोन आला तर त्यांना सांगा कि ‘मला त्याचवेळी पैसे त्या लोनवाल्याने घरी येवून दिले होते. पण त्यावेळी मी घरी नसल्याने त्याने ते पैसे माझ्या घरच्यांकडे दिले. मला हे माहित नव्हते. घरी फोन करून विचारल्यावर मला समजले’. नाही तर त्याची नोकरी जाईल. मी तसा मुख्यालयात मेल केला आहे. कि तुम्हाला माहित नसल्याने अस घडल. हे सगळ ऐकून काय बोलाव हेच कळल नाही. Continue reading

असे परप्रांतीय

माझ्या राशीला हे का लागले आहेत ते काही कळत नाही. आज सकाळी मी माझ्या वरिष्ठाला (सिनिअर) ला एका कामासाठी एक साधा फोन्ट मागितला. तर साहेबांनी तो दिला नाही. मला काही त्याचे फारसे वाटले नाही. पण शंका आली. मागच्या शनिवारी मी ज्या फायनान्स कंपनी मार्फत लोन घेतले होते. त्या कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला होता. कारण असे कि, ज्यावेळी मी ते लोन घेतले त्याच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी इसीयस झालेले नव्हते. म्हणून मी ज्याचाकडून लोन घेतले त्याला हप्त्याची रोख रक्कम दिली आणि हप्ता भरण्यास सांगितले. नंतर इसीयस झाल्यावर पुन्हा पैसे गेले. हि बाब त्या लोनवाल्याला सांगितल्यावर तो मला रिफंड करावे लागेल. आणि त्याला एक महिना लागेल असे म्हटला होता. Continue reading

गणेश उत्सव आणि प्रदूषण

दरवर्षी गणेश उत्सवात वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या विषयावरून भर भरून लेख येतात. कोण कुठली पर्यावरणवादी नावाची जमात जणू काही गणपती येतो म्हणजे सगळ विश्वात जणू हाहाकार माजतो अस काहीस मत मांडतात. न्यूजच्यानल वाले कोणाला तरी पकडून आणतात. आणि तो मग जणू काही तरी वाईट घडत आहे, अस काहीस भासवतो. आजही तेच चालू होते रटाळ. काय कराव हे जणू त्यांनाच माहित आणि आम्ही जणू आत्ताच जन्माला आलो आहोत. हि गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी मी नवीनच संगणकाचा कोर्ससाठी नगरला जात होतो. माझे काही मित्र वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांच्या आग्रहास्तव मी ‘पत्रकारिता’ नावाच्या एका सहा महिन्याच्या कोर्स ला सहभागी झालो. Continue reading

गणपतीची वर्गणी

ज सकाळी सकाळी समोरच्या इमारतीतील छोटी छोटी मुले गणपतीची वर्गणी मागायला आली होती. नंतर संध्याकाळी आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची मुले वर्गणी मागायला आली. दोघांनाही वर्गणी दिली. वर्गणी आणि माझे फार जुने नाते आहे. मराठी शाळेत शिकत असताना नेहमी वर्षातून एकदा सैनिकी फंड साठी एक रुपयाचे ते स्टीकर घ्यायचो. आणि इतरांप्रमाणे ते मी माझ्या कंपास पेटीला लावायचो. माध्यमिक शाळेत असताना वर्गात देखील आम्ही गणपती बसवायचो. त्यावेळी देखील आम्ही वर्गणी गोळा करायचो. Continue reading