ऑस्करचा झाला धोबी पछाड़

मध्यंतरी एक मराठी चित्रपट ‘एक डाव धोबी पछाड़’ आला होता. अशोक सराफ, त्याच्या बद्दल काय बोलावे? मराठी अभिनेत्यांचा राजा. चित्रपट हिट झाला.  मी तो पहिला आहे. तुम्हीही बघितला असेल. मस्त चित्रपट. काल सहजच टाइमपास करावा म्हणुन टीवी पाहत बसलो. बिंधास मुव्ही वर एक खुप जुना चित्रपट लागला होता. चित्रपटाचे नाव होते ऑस्कर. बघतो तर काय यात देखील कथा आणि धोबी पछाड़ ची कथा सारखीच. त्यातला नायक देखील एक मोठा गुंड असतो. त्याला एक मुलगी असते. असो चित्रपट तर तुम्ही धोबी पछाड़ बघितला आहे ना. अगदी जसच्या तस.

फरक फक्त इथे नायकाची नायिका नायकावर नाराज असते. आणि तो तिच्या साठी चांगला होण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे नायक आपल्या वडिलांच्या मृत्यु समयी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल होण्याचा प्रयत्न करतो.बाकी काय तर नायिकाच्या पहिल्या भेटीतच नायिका पटते. बाकी कथा दोघांची सारखीच. बघत असताना इंग्लिश धोबी पछाड़ पाहतो असेच वाटत होते. तुम्हाला जर खात्री करून घ्यायची असेल तर असे युट्युब मधे टाकुन बघू शकता. आता पर्यंत आपण हिंदी चित्रपट कथा चोरातात अस ऐकल आणि बघितल होत. पण मराठी सारखे उत्तम दर्जाचे चित्रपट पण आता कथा चोरी करू लागले आहेत. हे बघून काही काळ दुःख झाले. बाकी तस म्हटल तर चित्रपट आणि कथा याला काही तोड़ नाही. पण कथा चोरीची आहे.

Advertisements

8 thoughts on “ऑस्करचा झाला धोबी पछाड़

 1. चोरीच जाऊ दया ओ. पण मराठी आवृती छान होती.मजा आली चित्रपट पाहताना.

 2. असा मामला आहे तर…असो चित्रपट छान आहे.
  तुमच पोस्ट वाचून मलाही एका चित्रपटाची आठवण झाली माझ्या ब्लोगवर लिहतो आता त्याबद्दल …

 3. >>> अरे व्वा, तर तुम्ही देखील तो सिल्व्हरस्टर स्टॅलनचा ऑस्कर बिंदास मुविज वर बघितला वाटतं, मी पण तुमच्याप्रमाणेच आश्चर्यचकित झालो होतो हे बघुन की मराठी पिच्चरपण आजकाल हॉलिवुड कॉपी मारतायेत म्हणून, ओरिजिनल ऑस्करमध्ये ऑस्कर हा स्टॅलनचा ड्रायवर असतो, तर धोबीपछाडमध्ये कारकुन!
  >>> हे नको व्हायला हवे होते….
  >>> पण स्टॅलनचा ऑस्कर धोबीपछाडपेक्‍शा कितीतरी बेस्ट अन कॉमेडी होता!
  >>> तसेच सिल्व्हरस्टर स्टॅलनचे रॅम्बोचे सर्व भागदेखील बघावेत!
  >>> माझ्या संकेतस्थळांना भेट द्या:
  १) http://www.vishaltelangre.tk
  २) http://www.kalatnakalat.co.cc
  ३) http://www.vistel.tk

 4. दे धक्का = लिटील मिस सनशाईन
  डोंबीवली फास्ट = फॉलिंग डाऊन

  आणि अजुनही असतील…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s