पुण्यात नातेवाइकाकडे भोजनाचा योग आला तर

जर तुम्ही पुण्याला शिक्षणासाठी, नोकरीच्या शोधासाठी किंवा विशेष करून नातेवाइकाना भेटायला येण्याचा विचार करत असाल तर येण्या आधी काही गोष्टींचे ध्यान ठेवा. विशेषत हा अनुभव नातेवाइकांकडे येण्याची दाट शक्यता आहे.  शाळेत असताना मी नेहमी दिवाळीच्या सुटीत, आणि कधी कधी में महिन्याच्या सुटीत माझ्या पुण्यातील काकाकडे मी यायचो. त्यावेळी कधी काही समजले नाही. पण आता कळते. पूणेकरांची भाषा ही साखरेपेक्षा गोड. त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे स्वत:च्या पराभवाला आमंत्रण देणे असा असतो. पुण्याला खुप मोठा इतिहास आहे, या माधुर्यपूर्ण भाषेचा. मी लहान असताना आई सोबत नेहमी माझ्या पुण्यातील मावशीकडे जायचो. पहिला दिवस मजेत जायचा. मावशी, काका, दादा आणि ताई खुप लाड करायचे.  मग काय दुपारी मावशी आमरस, रात्री काका आइसक्रीम, दादा माझ्या सोबत दंगामस्ती करायचा.

रात्री जेवताना नेहमीच मावाशीचे  व्याकरण चालू व्हायचे. काही मागताना “दे’ अस म्हटल की ती म्हणायची “वाढ म्हणाव्”. हा नाही हो म्हणाव्. पण हे सगळ पाहिले दोन दिवस बर का. रात्रीचे जेवण चालू असताना मावशी मला नेहमी म्हणायची की रात्रीचे दोन घास कमी खावेत. शिक्षण झाल्यावर मी नोकरीच्या शोधत मी पूणे येथे आलो. माझी एक सूटकेस घेउन मी माझ्या काका कड़े उतरलो. जाताना वडिल मला म्हणाले की जायला दुपार होइल. काकाच्या घरी जाण्यापूर्वी बाहेर जेवण कर आणि मग जेवायला काकाकडे जा.  मला खरच काही कळल नाही. मी काकाकडे उतरलो. पोहचायला दुपारचे १ वाजले. ३:३० ला माझा इंटरव्यू होता. पोहचायाच्या नादात जेवण बाहेर करायचे राहुनच गेले. आल्या आल्या काकाने मला सरबत दिल, आणि म्हणाला की जेवण करुनच आला असशील ना. खर सांगू का या आधी हे वाक्य एकलेच नव्हते.

कोणी दुपारच्या वेळी आले की माझे आई वडिल त्याला डायरेक्ट चल जेवायला अस म्हणायचे. तो नाही म्हणायला लागला तर त्याला आग्रह करायचे. ते वाक्य ऐकल्यावर वडिल म्हणाले ते अस का म्हणाले होते याचा अर्थ कळला. मग काय बोलणार मी. मग तोच म्हणाला की नसेल जेवाला तर २ पोळ्या शिल्लक आहेत. पण भाजी संपलेली आहे. शेंगादंयाची चटणी आहे. मग मी त्याला सांगितल की माझ जेवण आताच झाल म्हणुन यायला उशीर झाला. आता त्याला कस सांगू की माझ जेवण २-३ पोळ्यात होत नाही. मग काय  रात्री काकाने जेवण म्हणुन तांदुळची खिचडी केली. झाल मग काय दुपारी आणि रात्री असा उपास झाला. दुसर्या दिवशी रात्री जेवणार ना अस विचारल. मग मी हो म्हणुन उत्तर दिल. जेवायला बसल्यावर पाहतो तर माणस गुणिले दोन इतक्या पोळ्या, भाजी आपला जेवणाचा दोन कप्पी डबा असतो ना. त्यातला एक कप्पा भरेल एवढी. आणि ती सर्वानी मिळून खायची. पाहुनच भूक गेली. बर आणि त्यातही आग्रह घे म्हणुन. मग काय पुढील ६-७ महीने उपासच उपास. मला वाटल की काकाकडे आहे म्हणजे काय इतर ठिकाणी असेल अस नाही. त्यानंतर मावशीकडे जाण्याचा योग आला. जेवानाला बसल्यावर सगळे एक एक पोळी खाऊन उठले. मग मी काय तसाच राक्षस सारखा एकटा खात बसणार, मलाही उठावे लागले. असाच अनुभव माझ्या ताईकड़े आला. कधी जेवताना मिसळ, कधी २-३ दिवस सलग एकच भाजी. कधी फिरायला जाऊँन  आल्यावर त्याना कोणाला भुकाच लागत नव्हत्या.

माझे मित्र इथे नोकरीच्या शोधत आल्यावर असेच अनुभव आल्यावर पुण्याची संस्कृति कळली. मुंबई वरुन परत आल्यावर मात्र मी दुपारी बाहेर रात्री काकाकडे असल्यास बाहेर जेवायचे आणि मग घरी येउन एका पोळीत उठायचे. असा क्रम चालू ठेवला. पुण्यातील लोकाचा एक साचा आहे. ते सकाळी उठल्यावर कपभर चहा त्यानंतर नाश्ता  बाहेर निघायचे असेल तर पुन्हा चहा, बाहेरून आले की चहा संध्याकाळी पुन्हा नाश्ता, त्यानंतर फिरायला जाणार  मग काही तरी खाणार, भेळ, कच्ची दाबेली नाही तर पानिपुरी. मग एवढ सगळ अबर चबर खाल्ल्या नंतर त्याना भूक कुठून लागणार? आणि खाल्ल तरी अस किती खाणार? या कारणाने आपली गोची होते. आपण काही कधी दर दोन तासानी काही खाणार नाही. डायरेक्ट जेवण. मग अस होणारच ना.

Advertisements

2 thoughts on “पुण्यात नातेवाइकाकडे भोजनाचा योग आला तर

  1. आमचे बाबाही फार वैतागतात अशा बोलण्याला….वागण्याला. भर दुपारी आलेल्या माणसाला, जेवूनच आला असाल ना? चहाच्या वेळी, आमचा नुकताच झालाय, तुम्हीही घरून घेऊनच आलात ना? ………….संध्याकाळी उगीच काहीतरी जीभ चाळवण्यापुरते खायचे की मग जेवायला चक्क सुट्टी. बापरे!!! कठीण आहे. त्यापेक्षा सरळ उठावे अन हॊटेलात जाऊन खाऊन यावे हे उत्तम. पोटापेक्षा मनाचे हाल जास्त होतात अशाने.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s