मुलीच बलवान

आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० सेकंड थांबते. १ मिनिट झाला लोकल निघेच ना. मी सिग्नल कड़े बघितल तिथे काही लाल दिवा नव्हता. काय झाल म्हणुन मी उतरून पाहतो तर काय त्या बाई साहेब मागाहून येत होत्या. आणि आमचा मोटारमन तिला बघत होता. बाई साहेब लोकल मधे पाउल टाकताच लोकलचा हार्न वाजला. जणू काही सलामीच दिली. लोकल निघाली.

वा, काय ताकद आहे तिची. अख्खी लोकल थांबते म्हणजे काय. माझ्या मागे उभे राहिलेले गेट वीर म्हणाले की “आयटम बघितला की लोकल थांबते, मुलगा असता तर?”.त्याच्या मागच्याने त्यात हो मिसळला. खरच, जर त्या मुली एवजी मुलगा असता तर काय तो मोटार मन असाच थांबला असता?. कोणीही सांगेल ‘नाही’. मागील महिन्यात कोरेगाव पार्क मधे ताज होटल समोर एक मुलीची स्कूटी स्लीप झाली. खरचटल पण नसेल. पण ताबड़तोप ५-१० जण जमा झाले. एकाने तिला हात धरून बाजूला बसवले. एकाने स्कूटी उचलली. आणि रस्त्याच्या कडेला लावली. बाकीचे कुठ लागल का म्हणुन विचारत होते. त्याच ठिकाणी आधी एक जण असाच स्लीप झाला होता. त्यावेळी हसले हे लेकाचे. एक पण आला नाही. बिच्चारा.

असे अनुभव खर सांगायच तर, खुप आधीपासुनाच आले होते. कंपनीत कधी मी आदल्या दिवशी “उद्या मला जरा काम आहे, तर मी उद्या हाफ डे घेतला तर चालेल का?” अस बॉसला विचार की तो मला रागावायाचा की, तू आठवडा भर आधी ईमेल करायला काय झाल होत?. पण आमच्या कंपनीतल्या एखादिनी जरी त्याच दिवशी सकाळी विचारल की बॉस हसून ओके म्हणतो. अस का? दररोज संध्याकाळी आमच्या कंपनीतला माझा मित्र त्याच्या मित्राच्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी सोडव्ण्यासाठी जातो. क्या बात है? एका मुलीला ड्राप करण्याचे काम ते पण नियमित आणि अखंडित. लो़कल मधे तर विचारूच नका. कोणी डब्यात आली की उठुन जागा दिली जाते. कंपनीत येताना मी बाकीच्या ओफ्फिसेस मधे काम करणार्या मुलीना त्यांचे नवरे (काहींचे भावी) नियमित पणे येताना मी बघतो.

मध्यंतरी मी मेटाकैफे वर एक विडियो बघितला, शीर्षक होते “Who is Powerful?” त्यात पोहन्याच्या तलावत एका मुलीचे आणि मुलाचे भांडान होते. तो मुलगा तीला चांगलाच तिला मारतो. केस ओढतो आणि त्याच वेळेस विडियो थांबतो आणि वाक्य यते ‘What next?’ आणि त्यानंतर विडियो पुन्हा चालू होतो. मग त्यात असे दाखवले आहे की त्या मुलाला बाकीचे मुले मारत आहेत. आणि मुलगी कडेला उभा राहून मजा पाहते आहे. तात्पर्य हेच की मुलीच बलवान आहेत. बघा ना करीनाने शाहिदला सोडले, ऐश साठी सलमान वेडा झाला. मुंबई ची एक महापौर आहे. कोंग्रेस पक्ष अध्यक्ष एक महिलाच आहे. ते तर सोडा भारताची राष्ट्रपति ही देखील एक महिलाच आहे.

Advertisements

2 thoughts on “मुलीच बलवान

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s