फोन रिंग बोले तो घंटा सिन्घ

मी कधी रेडियो एकत नाही. पण काल असाच सहजच लावला तर एका स्टेशन वरती ‘फोन रिंग बोले तो घंटा सिन्घ’ नावाचा एक कार्यक्रम लागला होता. फोन ची रिंग वाजते. तिकडून कोणी तरी मुलगी फोन उचलते. मग हा घंटा सिन्घ तीला म्हणतो की मला ४ रूम बुक करायच्या आहेत. (यावरून त्याने कोणत्या तरी होटल मधे फोन केला आहे असे आपण समजुन घ्यायचे). मग ती विचारती की तुम्हाला रूम बुक कधी करायच्या आहेत?. तर मग हा म्हणतो की, मला बुक नको रूम हव्या आहेत.

मग ती थोडी गोंधळली. मग ती म्हणाली, की मी रूम च बुक करते आहे. तुम्हाला कोणती रूम हवी आहे. स्वीट की साधी?. मग हे घंटा सिन्घ पुन्हा म्हणाले, की मला माहिती आहे की तुम्ही स्वीट आहे. पण मला रूम हवी आहे. मग ती म्हणाली की मी रूम बद्दल विचारते आहे. तर तो घंटा सिन्घ पुन्हा म्हणाला की मला एक बेडरूम, एक टॉयलेट रूम, एक बाथरूम, असे म्हणत असताना ती मुलगी वैतागुन फोन कट करते. एकून खरच त्या घंटा सिन्घची काना खाली घंटा वाजवाविशी वाटली. कसले पांचट विनोद करतो आणि ते पण लाइव्ह. असले कार्यक्रम खर तर बंद करायला हवेत. कोणाला पण फ़ोन करून त्याला नाहक त्रास द्यायचा. आणि काही तरी उलट सुलट बोलूं आपली करमणुक करून घ्यायची. तो घंटा सिन्घ म्हणजे निर्लार्ज्यतेचा कळस्  आहे.

Advertisements

One thought on “फोन रिंग बोले तो घंटा सिन्घ

  1. एफ. एम. रेडिओ वर (मराठी वाहिन्या अपवाद) खरच धांगड धिंगा घातला जातो. श्रोत्यांचा मुखभंग केला जातो. ही आपली संस्कृती नाही. याला पायबंद घातला पाहीजे. अनेकांची नाहक टिंगल टवाळी केली जाते. सनी देवोलने खाशी जिरवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s