संजय दत्त खलनायक की मुन्नाभाई?

आज दस का दम नावाचा एक कार्यक्रम माझ्या पहाण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. आज या कार्यक्रमात संजय दत्त आणि जैकी श्रोफला आमंत्रित करण्यात आले होते. मी काही हा कार्यक्रम नेहमी पाहतो असे नाही. पण आज सुटी असल्याने सहजच पहिला. कार्यक्रम चालू असताना संजय दत्तने काही वाक्य त्याच्या जीवना विषयी बोलली. “मैंने बन्दूक रखी थी, तो क्या हुआ? अपने घरवालो की इफाजत के लिए रखी थी| तो क्या गुनाह है?” “मुन्नाभाई बनानेका”. मग तो त्याच्या एका जुन्या चित्रपटातील ‘खलनायक’ या गाण्यावर नाचाला. त्याचे बोलणे एकून त्याच्या विषयीचा जो काही थोडा फार आदर होता तो पण संपला.

त्याच्या जीवनाचा प्रवास असाच झाला आहे. सुरवातीला त्याच्यावर बंदूके (रायाफली) ठेवण्याचा आरोप होता. नंतर अतिरेक्याँशी संबंध. आणि त्याच्या दुर्दैवाने ते आरोप सिद्ध झाले. आणि राजे काही काळ जेलाची हवा खाउन आले. नशीब बलवत्तर की बाळ ठाकरेंच्या कृपेने बाहेर आले. एका मग एक धडाकेबाज चित्रपट देवून अमिताब नंतर त्याचे नाव घेतले जावू लागले. पण उज्वल निकम यांनी शर्थिने त्याला पुन्हा जेल मधे पाठवले. १४ वर्षानंतर पुन्हा जेल मधे जावे लागले. पूणे येथील येरवडा कारागृहात आणल्या नंतर बाहेर आमचे पुणेकर बंधुनी “मुन्नाभाई जिन्दबादच्या घोषणा दिल्या”.

आता खरच तो मुन्नाभाई आहे का नाही हे सगळे जाणतात. पण त्यानंतर कसा बसा बाहेर आल्यावर त्याने राजनितित पावुल टाकले. बर, पक्ष तरी चांगला असावा ना, हे गेले त्या गोंधाल्या अमरसिंहच्या कळपात. बर, तिथ जावून पण अमरसिंहचीच री ओढली. चुक झाली तर ती मान्य करायला हवी. चुक झाली तर ती सुधारली जावू शकते पण चुक झाली हे माहिती असून देखील मी चुक केलीच नाही असे बोलणे म्हणजे चुकत आणखिन भर आहे. मुन्नाभाई मधे मुन्नाभाई स्वत ने केलेल्या चूका मान्य करून माफ़ी मागतो. चुकची शिक्षा देखील भोगतो. पण हा मुन्नाभाई आपल्या खरया जीवनात चूका मान्यच करायला तयार नाही. बन्दूक ठेवली ती कोणती होती, कुठल्या आतंकावाद्याने फ़ोन केला होता. कुठल्या कार्यक्रमाला हे साहेब गेले होते. हे सर्वद्न्यत आहे. तरी देखील माझ काही चुकलच नाही अस बोलणे कितपत योग्य आहे. मग संजय दत्त आपल्या आयुष्यात खलनायक की मुन्नाभाई हे ठरवणे फारसे अवघड नाही असे मला वाटते.

Advertisements

One thought on “संजय दत्त खलनायक की मुन्नाभाई?

  1. त्याच्या जामिनावर बहुतेक तो मारायला टेकल्यावरच विचार होईल असे दिसतय. जवळपास गेल वर्षभर तो जेल च्या बाहेर आहे आणि सिनेमात काम करायला परदेशातही जात आहे. कधी पळून परदेशात स्थायिक झाला की मग कसली शिक्षा आन् कसल काय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s