राष्ट्रपति बाई काय म्हणाल्या?

आज सह्याद्री वाहिनी वर राष्ट्रपति बाई चे भाषांतर केलेले स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला केलेले भाषण ऐकायला भेटले. खर तर ते सगळ भाषण मी जसच्या तस ‘हेमंतमत‘ मधे टाकल आहे. आपल्या देशाच्या पहिल्या नागरिक काय म्हणाल्या याचा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. ताई म्हणाल्या ‘देशात हवामान सध्याला चांगले नसल्याने आणि स्वाइन फ्लू ची साथ आली असल्याने नागरिकांनी सरकारला मदत करायला हवी.’ ‘प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये प्रत्येकाने शिस्तिचे पालन करायला हवे, हीच देशाची संपत्ति आहे.’ ‘देश विकसित होतो आहे. सरकारच्या धोराणाने आपण केलेल्या सतत परिश्रमाने आपला देश जागतिक स्तरावर आपले स्थान निशित करू शकला आहे.’

‘इतिहास अस सांगतो की आपल्या देश समृद्ध आणि बलशाली राष्ट्र आहे’ ‘आपली अर्थव्यवस्था चे संचालन होण्यासाठी विशाल अंतर्गत बाजारपेठ ही ताकद आहे. आपली स्थित ताकदीवर आपण ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष केन्द्रित केले आहे. ते सातत्याने असने जरुरीचे आहे’ ‘सरकारचे प्रमुख कार्यक्रम स्वास्थ्य आणि शिक्षण हे आहे. सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी रोजगार आवश्यक आहे.’ ‘चांगल्या सेवेसाठी शासनात सुधारणा आवश्यक आहे. त्याने लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील. ‘ ‘शासन नागरिकांच्या गरजेनुरूप होने आवश्यक आहे. कारण ही एक सामाजिक सेवा आहे.’ ‘जे कोणी मागे राहिलेले आहे त्याना मुख्य प्रवाहत आणून त्याना संधी द्यायला हवी’ ‘देशाच्या ५०% असलेल्या महिलांचे प्रश्न यासाठी चालवाले जाणारे उपक्रम सशक्तिकरण आवश्यक आहे ‘ ‘शांततामय अस्तित्व ही आपली संस्कृति आहे. निर्दोष लोकांची हत्या करणारे दहशदवादी कुठल्याच धर्माचे नाहीत ‘ ‘आपण धरमनिर्पेक्षता, समानता आणि सम्मान याचा अंगीकार केल्याने सांप्रदायिक सद्भाव आवश्यक आहे.’ बापरे किती बोलल्या!!!

आता या देशाच्या पहिल्या नागरिक किती नागारिकतेचे पालन करतात हे सांगतो. यांचे १००० खोल्यांचे घर म्हणजे राष्ट्रपति भवन याचे विजेचे बिल अजुनही भरलेले नाही. ते काही लक्ष कोटि रुपयांमधे आहे. या म्हणतात की शिस्तीने पालन करा. तर याचे देखील शिस्तीने फ़ोन चे बिल कोण भरणार? बर ते सोडा. १२ अप्रैल ते १६ अप्रैल २००८ ला ब्राझिल, १६-२० अप्रैल मेक्सिको २००८, २०-२५ अप्रैल चिले २००८, ५-८ नवम्बर २००८ ला भूटान, २४- २८ नवम्बर वियतनाम, २९ नवम्बर ते १ दिसम्बर २००८ इंडोनेशिया, २०-२३ अप्रैल २००९ स्पेन, २३ अप्रैल ते २७ अप्रैल २००९ ह्या पोलैंड ला. आणि काय फलित झाल ह्या वर्ल्ड टूर च?. सोडा ते झालेल कशाला काढता?. दहशतवाद हा त्याना धोका वाटतो. त्या म्हणतात की निष्पाप लोकाना मारानारे दहशदवादी हे कोणत्याच धर्माचे नसतात. मग कसाब आणि अफझल ला फाशी का झाली नाही आजुन?. बर अफजल ची फाइल तर तुमच्याच कड़े आहे बाई. शांततामय ही आपली संस्कृति आहे हे मान्य. परंतु वेळ आल्यावर शस्त्र देखील न घेणे याला आमच्या भाषेत ‘६ नम्बरी म्हणतात’. सोडा ह्या पोपटपंची वर काय बोलायाचे?

Advertisements

3 thoughts on “राष्ट्रपति बाई काय म्हणाल्या?

  1. एकदम बरोबर बोललास मित्रा. माझ्या खूप अपेक्षा होत्या अफजल गुरू च्या फाशिबद्दल कलाम आणि आपल्या (?) मराठी पहिल्या नागरिकाकडून. पण सगळे मुसळ केरात. त्या मराठी आहेत हे बघून अजुन लाज वाटते मला. खर तर माहितीच्छया अधिकाराखाली त्यानी विजेचे बिल का नाही भरले ते मागवून बघितले पाहिजे. बघतो एकडे अमेरिकेत बसून ऑनलाइन काही करता येते का ते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s