भाषण का प्रवचन?

१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो.

त्यावेळी वडील सांगायचे कि आता जर बघून भाषण केलेस तर पुढे जावून भाषण करायला अवघड जाईल. लोक काय म्हणतील, कि भाषण वाचून दाखवले. भाषण हे वाचून दाखवत नसतात. ते काय पुराण पोथी आहे काय? पण आपले पंतप्रधान वाचूनच दाखवतात. सोनियाजी पण तेच करतात. वाजपेयी कधी वाचून तर कधी न वाचताच. शरद पवारांचा विषय तर सोडूनच द्या. त्यांना बोलता कुठ येत? बोलायला गेले तर जबडा दुखायला लागतो. आपले भूतपूर्व राष्ट्रपती कलामजी सुद्धा वाचूनच दाखवायचे. आता भाषण आणि निवेदन यात काय फरक आहे हेच समजेनासं झाला आहे. निवेदन किंवा एखादी घोषणा, निर्णय वाचून दाखवत असतात. भाषण म्हणजे तुम्ही तुमचे मत व्यक्त करायचे. मग ते मत कसे पटवून द्यायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण भाषण संवादात्मक असायला हवे. आणि भाषा सोपी असायला हवी. कि ज्याच्या मुळे समोरील श्रोता ताबडतोप अर्थ लावू शकेल.

पण १४ ऑगस्टला राष्ट्रपती बाई हे भले लंबे चौडे भाषण वाचून दाखवले. आता त्यांच्या मनातील किती? हा पण एक प्रश्न आहे. पण ते काय बोलल्या हे नेमके कोणाला कळले त्याला मी तर म्हणतो पुरस्कारच द्यायला हवा. अस वाटल, कि ‘हे करा आणि हे करू नका’ अशी नियमावलीच होती. सोडा तो विषय. विवेकानंदांनी अमेरिकेतील धर्मसभेच्या वेळी एक कागदाचा छोटासा चिटोरा घेवून उभे राहिले आणि त्यांनी जग जिंकलं. त्यामुळेच कि काय अमेरिकेतील सगळे राष्ट्रपती कोणत्याही प्रसंगी कागद बिगद जवळ ठेवत नाही. अस वाटत कि ते मनातून बोलत आहे. भाषणात कधी रुक्ष पणा जाणवत नाही. पण त्या उलट भारतात. एक दोन नेते सोडले (त्यात बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि राज देखील. तस बघितलं तर विलासराव पण आहेत) तर बाकी वाचूनच दाखवतात. त्यांचे प्रवचन हि भारतीय जनता नाईलाजास्तव ऐकते. काय करणार, पर्याय नाही. इतर नेते हसण आणि हात दाखवण सोडून बाकी काही विशेष करत नाही. खर तर ह्या वाईट सवयीचे जनक आपले पहिले पंतप्रधानच आहेत. वाईट सवयी कोणत्या जर बघायचे असेल तर ते आपल्या भारतीय नेत्यांना बघावे. भाषण हा प्रकार केवळ शाळातच बाकी राहिला आहे. काही दिवसांनी तिथे देखील सोनिया आणि मनमोहन येतील यात शंका नाही.

Advertisements

3 thoughts on “भाषण का प्रवचन?

  1. tumache mhanane barobar aahe. raj thakare kadhich wachun dakhawat nahi. tyamule te jast aapale watatat bolatana. bhashan nit denyasathi aaju bajuchya paristhiticha nit abhyas karava lagato. hyana kuthe aahe wel ani kahi karayachi ichha asali tarach ek uttam bhashan deta yete. he faqt tyanchya PA ne lihun dilele jyat tyanche kahi mudde asatat te wachatat. khurchi important aahe baki kahi nahi.

    me roj tumacha blog wachato. chhan lihita mojake pan chhan. evadha wel kasa milato? nice articles.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s