म्हणे आम्ही मुली

मी ज्या कंपनीत काम करतो तिथे माझ्या सोबत काही मुली(?) काम करतात. आता त्या म्हणतात कि आम्ही मुली आहोत. स्त्रिया आणि मुली यातला फरक काय? या प्रश्नाचे उत्तर देणे अगदी सोपे आहे. साधारणत आपल्या समाजात लग्न झाले कि मुलीला स्त्री मानतात. आता काहीना हे मान्य नसेल. आणि मला सुद्धा मान्य नाही. जी मुलगीला मुले झालेले आहेत, तिला तर आपण GIRL किंवा मुलगी कस मानायचं? हाच प्रश्न मला पडलेला आहे. माझ्या कंपनीत ह्या नियमाने एक दोन सापडतील. पण कंपनीतील उरलेल्या सगळ्या स्वत: ला मुली म्हणवून घेतात.

बर त्यांच्या एकूणच शरीर यष्टीवरून तर त्या मावश्या वाटतात. पण सोडा, प्रत्येकाला आपण तरुण आहोत असाच वाटत. कोणीही आपण आता आपल तारुण्य संपत आलेलं आहे किंवा आपण आता एक पुरुष किंवा स्त्री आहोत हे मानायलाच तयार नाही. निदान आमच्या कंपनीत तरी नाही. आधी एक सहकारिणी आमच्या कंपनीत काम करायच्या. त्यावेळी मी नवा होतो त्यामुळे जुने असलेल्यांना मी सर किंवा मैडम म्हणायचो. त्यावेळी मी त्या मैडमला मैडम म्हटलं कि राग यायचा. सुरवातीला मला काही कळल नाही कि ह्या रागावतात. नंतर ज्यावेळी कळल कि ह्या मैडम म्हटल्यामुळे रागावल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कंपनी सोडली होती. असो पण त्यांना बघून कोणीही तेच म्हटलं असत.

आज घरी येताना लोकल मध्ये एक मुलगी बघितली. खर तर तिच्या हातात एक सुंदरस बाळ होत. आणि बरोबर एक व्यक्ती. आणि हो तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील होत. यावरून मी समजलो. पण तिला एक मुल असून देखील ती महाविद्यालयीन तरुणी वाटत होती. आता ती लग्न होवून देखील एक महाविद्यालयीन तरुणी वाटत होती, त्याला मी काय करणार. आणि कंपनीतील सगळ्याच काकू आणि मावश्या वाटतात. तर ह्याला मी तर काय करणार? जस दिसतात त्यावरूनच आपण विचार करणार. बर पण हे मान्य कराव न तर ते नाही. स्वत ला मुली म्हणवून घेतात. ह्या काय मुली वाटणार ह्या तर दोन मुलींच्या आया वाटतात. नाही तरी हे फ्याड काही नवीन नाही. आणि प्रत्येकीला मी अजून लहान आहे. मी अजूनही तरुणी आहे. अस वाटतच. पण सत्य देखील मानायला हव. आज माझ वय जर २५ असेल तर मी आज तरुण आहे. काही वर्षांनी ज्यावेळी मी ४५ चा होईल त्यावेळी तुम्ही मला काका म्हणाले तर मी काय अस रागवायचं? कि मी अजूनही मुलगा किंवा तरुण आहे? वस्तुस्थिती मान्य करण यात काही चूक नाही. आणि आपण आता जवान राहिलेलो नाही. किंवा आपण आता वयाच्या अशा वळणावर आहे कि जिथे आपण एक स्त्री किंवा पुरुष संबोधले आहे, तिथे आपण आपला अस चुकीचा ग्रह करून घेणे कितपत योग्य आहे? पण हे ज्याच त्याला कळायला हव.

Advertisements

4 thoughts on “म्हणे आम्ही मुली

 1. आजच्या मुलीना मी दुरुनच कोपर्‍यापासुन नमस्कार करतो. यांच्या सारखे स्वार्थी जीव या पॄथ्वीतलावर शोधुनही सापडणार नाहीत. यांना आपण स्त्री असल्याचे फायदे हवे आहेत आणि पुरुषांची बरोबरीही करायचीय !!!
  आमचे कार्यालय अशाच मुलींनी (?) भरले आहे हे सांगायला खेद होतो.

 2. तुझे हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे , आज अनवधानाने तुझा लेख वाचण्यात आला, तुझ्या ऑफिस मधली एक सहकारी स्त्री म्हणून मी बोलू इच्छिते कि पहिली गोष्ट आम्ही कधीही ऑफिस मध्ये हा विषय काढला नाही कि आम्ही मुली आहोत स्त्रिया नाही आणि राहिली गोष्ट काकू किवा मावश्या दिसण्याची तर आम्ही आमच्या संसारात सुखी आहोत तुझ्या साल्याची आम्हाला गरज नाही. तुला बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत लिहण्यासाठी तरी असले लेख लिहून वेळ वाया न घालवता तू तोच वेळ आपले द्यान वाढवण्या करिता घालवावा असे मला वाटते. कंपनीतल्या मुली किवा स्त्रियांबद्दल तुला काय वाटते हे तेव्हडे महत्वाचे नाही जेव्हडे हे महत्वाचे आहे कि तूला त्यांच्यासोबत मिळून काम करता येते कि नाही.

 3. hemant tula ek sangu ha nisargacha niyamach ahe, tyala tuzya mazyasarakhe badalu shakat nahi, ani ha post lihun tu badalanyacha prayatna suddha kela nahis faqta tuzya manatale vichar mandales je majhyasarakhya kityek tarunana patanya sarakhe ahe. khar tar mala he asech kahi anubhava ahet.

  ani SNEHAL tumhala na ekach sangava vatat ki “nidankache ghar asave shejari” asa mhanun sudharana karanyapeksha ugach traga karun ghenyat kay artha nahi….

  Ani ho hemant ne kuthehi kunachyahi navacha ullekh kelela nahi ani sallahi dilela nahi he faqta tyane mandalele vichar ahet…..

  Me tumha doganahi olakhat nahi tarihi mat mandavas vatal mhanun . . ..

  Chuk bhul dene ghene maf asaave….

 4. Mala Hemantchya matan vishayee kahich mhanayache nahee pan ho Hemant kunachya cheharya var kinva shareeyashteevar avalambun tyaacha baddal mat vyakt karane chaangli goshta naahi………… tk cr

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s