असे परप्रांतीय

माझ्या राशीला हे का लागले आहेत ते काही कळत नाही. आज सकाळी मी माझ्या वरिष्ठाला (सिनिअर) ला एका कामासाठी एक साधा फोन्ट मागितला. तर साहेबांनी तो दिला नाही. मला काही त्याचे फारसे वाटले नाही. पण शंका आली. मागच्या शनिवारी मी ज्या फायनान्स कंपनी मार्फत लोन घेतले होते. त्या कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला होता. कारण असे कि, ज्यावेळी मी ते लोन घेतले त्याच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी इसीयस झालेले नव्हते. म्हणून मी ज्याचाकडून लोन घेतले त्याला हप्त्याची रोख रक्कम दिली आणि हप्ता भरण्यास सांगितले. नंतर इसीयस झाल्यावर पुन्हा पैसे गेले. हि बाब त्या लोनवाल्याला सांगितल्यावर तो मला रिफंड करावे लागेल. आणि त्याला एक महिना लागेल असे म्हटला होता.

नंतर त्याने एका महिन्यांनी अर्धीच रक्कम दिली आणि म्हणाला कि अजून तुमच रिफंड झालेलं नाही. पण तुम्ही मला पैसे दिले होते. म्हणून जो पर्यंत रिफंड होत नाही तो पर्यंत हे पैसे ठेवा. रिफंड झाल्यावर मी त्यातून वजा करून घेइल. त्यानंतर दोन महिन्यांनी त्याला पुन्हा विचारले तर तो म्हणाला अजूनही झालेलं नाही. झाल कि मी तुम्हाला फोन करून कळवतो. या महिन्याच्या सुरवातीला पुन्हा फोन केला. पण तो म्हटला कि अजूनही झालेलं नाही. म्हणून मी मागच्या शनिवारी त्यांच्या कस्टमर केअर ला फोन केला आणि अजून रिफंड का झाल नाही याची तक्रार दाखल केली. आज दुपारी त्या फायनान्स कंपनीच्या हेड चा फोन आला त्याने मला सगळी माहिती विचारली कि कोणी पैसे घेतले? कधी घेतले ? झाल त्याच्या फोन नंतर लगेचच त्या लोन्वाल्याचा फोन कि तुम्ही पुन्हा कस्टमर केअर ला फोन लावून असे सांगा कि मला पैसे मिळाले.

मी त्याला म्हटले कि अस का सांगू तर तो बोलला मी तुम्हाला पुढच्या महिन्याच्या सुरवातीला पैसे वापस करतो. पण तुम्ही हे सांगा. मग मला शंका आली. कि अस का? त्या नंतर त्याचे ५-६ वेळा फोन येवून गेले. नंतर मी त्याच्या हेड्लाच फोन करून विचारलं कि नेमक काय झाल आहे तर तो म्हटला कि, त्याने ते पैसे कंपनीत भरले नाहीत. ऐकून धक्काच बसला. त्याला विचारलं कि माझे तर पैसे परत मिळतील ना? तर तो बोलला कि पैसे कंपनीने घेतलेले नाहीत त्यामुळे कंपनी रिटर्न करण्याचा प्रश्न येत नाही. पण माझ्या कंपनीचे क्रेडीट खराब होवू नये म्हणून मी त्याच्या पगारातून कापून ते पैसे तुम्हाला देयील पण त्याला ह्याची शिक्षा भोगावीच लागेल. त्याने कंपनीचा नियम तोडला आहे. त्याला कामावरून काढून टाकले जाईल. तुमचा निर्णय काय आहे. तुम्ही जर ती तक्रार मागे घेतली तर तो वाचेल. आणि मी एक कंपनीतील जबाबदार व्यक्ती असल्याने घडलेली सगळी घटना जशीच्या तशी इमेल ने मुख्य कार्यालयात पाठवावी लागेल. त्यात मी काही करू शकत नाही. आज या दोन गोष्टी घडल्या. एक तर सकाळी सकाळी माझा सिनियर मला तो फोन्ट द्यायला तयार नव्हता. त्याचे कारण असे जर त्याने तो दिला तर मला त्याची माझ्या कामाची गरज संपेल. पण ज्यावेळी काही नवीन गोष्ट शिकायची वेळ असतो त्यावेळी मात्र तो हात धुवून मागे लागतो. ज्या कामाला ५०- ६० हजार लागतील ते कामे फुकट शिकून घेतो. आणि ज्यावेळी मला त्याची गरज भासते त्यावेळी मात्र टाळाटाळ. आणि हा दुसरा लोनवाला. दोघेही वेगळे पण एक गोष्टीचे मात्र दोघांना लागू. कि दोघेही फ्रोड आहेत. आणि मुख्य गोष्ट अशी कि ते दोघेही परप्रांतीय आहे. आता मला असले अनुभव नाही असे नाही. पण असे अनुभव मला पराप्रांतीयान कडूनच मिळाले. अस नेहमी का होत? माझा मागच्या कंपनीतील एक सिनियर ने मला एक फडतूस कोड कसा वापरायचा हे सांगत नव्हता. तो देखील परप्रांतीय. जावू द्या परप्रांतीय असेच असतात. जर तुमचा कोणी परप्रांतीय दोस्त असेल तर त्याच्याशी दोस्ती ठेवायला हरकत नाही. पण दोस्तीच ठेवा. बाकीच्या तुमच्या कामाच्या विषयी अथवा आर्थिक बाबी मध्ये व्यवहार न केलेला बरा.

Advertisements

One thought on “असे परप्रांतीय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s