गणपती विसर्जन मिरवणूक का स्वतःची करमणूक?

काल रात्री आमच्या येथील विजेचा ट्रास्न्फार्मार जळाल्याने आज रात्रीपासून आज सकाळ पर्यंत वीज नव्हती. आता सकाळी मी झोपलो असल्याने काही मला जाणवले नाही. रात्री मी ट्रास्न्फार्मार जळल्याचा आवाज एकाला होता. आज अनंतचतुर्दशी असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे मी सकाळी उशिरापर्यंत झोपलो होतो. पण १०- १०:३० च्या आसपास मला मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजाने जाग आली. उठून पाहतो तर आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची निघण्याची तयारी बहुतेक चालू होती. आवाज एवढा मोठा की, शेजारच्याच्या कानात ओरडून सांगितले तरी एकू जाणार नाही एवढा. बर आज शेवटचा दिवस ना, म्हणून मी म्हटलं की एखादा दिवस वाजवलं तर काय बिघडतंय. म्हणून मी घरात येऊन पुन्हा झोपलो.

पण त्या गाण्यांच्या आवाजाने झोप येईना. मग काय करावे म्हणून मी घरातील दार आणि खिडक्या बंद केले. काही प्रमाणात आवाज कमी झाला. मग कसा तरी झोपलो. पण ते पण तासभर पुरतेच. तासाभरात त्यांचा आवाज दुप्पट झाला. मधेच वाटले की जावून त्यांना म्हणावे की गाणी बंद करा. पण नंतर विचार केला की शेवटच्या दिवशी कशाला त्यांच्या आनंदात विरजण. म्हणून दुसऱ्या खोलीत जावून बसलो. पण ते सगळे व्यर्थच. म्हटलं आता विसर्जन मिरवणूक निघेल. पण कशाचे काय. दुपारी दोननंतर त्यांनी आरती केली. सकाळी १०:३० पासून त्यांनी हिंदी चित्रपटातील गाणी लावली होती. बर त्या गाण्यांचा आणि गणेश उत्सवाचा काही संबंधपण नाही. आणि आवाज काही विचारू नका. संध्याकाळी त्यांची विसर्जन मिरवणूक सात वाजता निघाली. खर सांगू का या आधी माझ डोक गाण्यामुळे कधीच दुखलं नव्हत. पण आता माझी डोकेदुखी एवढी वाढली आहे. मला तर आता गाणी माझ्या मोबाईलवर ऐकण्याची सुद्धा वासना निघून गेली आहे. बर ह्यांची मिरवणूक पण साधीसुधी नाही. एक साउंडबॉक्ससाठी, एक जनरेटरसाठी, आणि एक गणेश मूर्तीसाठी अशा तीन मोठ्या ट्रकचा ताफा. आता ते मंडळ आहे आमच्या बिल्डरच, पण आता यापुढे या मंडळाला वर्गणी द्यावयाची नाही अस ठरवून टाकल. गणेश उत्सव म्हटलं की काही लोक नाक का मुरडतात ते का ते आज कळले. मला कधीच गणेश उत्सवाचा किंवा विसर्जन मिरवणुकीचा तिटकारा नाही. पण त्याच्या नावाखाली चित्रविचित्र गाणी लावायची ती पण एवढ्या मोठ्याने की दुसऱ्याची डोकी दुखायला लागली पाहिजे.

बर मला सांगा ‘लव्ह मी बेबी लव्ह मी’, ‘पंजाबी कुडी है कमाल’, ‘मै हु डॉन’ या अशा प्रकारच्या गाण्यांचा आणि गणेशाचा काय संबंध? बर आवाज कमी ठेवला तर स्वर्गात बसलेल्या देवांना आवाज एकू जात नाही आणि आवाज वाढवला की देवाला गाणे एकू जाते अस काही आहे का? मला तरी ही ह्या मंडळाची थेर बघून माझी वर्गणी पाण्यात गेली असच वाटल. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नावाखाली स्वतःची करमणूक करून घ्यायची, याचा प्रसाद देव कधीना कधी या मंडळीना देईलच. पण या गोंधळात आजचा दिवस माझा काही कारण नसताना वाया गेला. आणि त्यात हि डोकेदुखी. बघू आता सकाळपर्यंत डोकेदुखी थांबली तर चांगलेच म्हणायचे.

Advertisements

One thought on “गणपती विसर्जन मिरवणूक का स्वतःची करमणूक?

  1. >>बर मला सांगा ‘लव्ह मी बेबी लव्ह मी’, ‘पंजाबी कुडी है कमाल’, ‘मै हु डॉन’ या अशा प्रकारच्या गाण्यांचा आणि गणेशाचा काय संबंध?

    मित्रा, जमानाच असा आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s