गैरसमज

आज संध्याकाळची ५:३० ची शिवाजीनगरहून लोणावळा लोकल पकडली. लोकल चिंचवडला आली. लोकल चिंचवडहून ज्यावेळी निघाली त्यावेळी माझ्या पुढच्या डब्यातील एका गेट वीराने एका मुलीचा स्क्राफ ओढला. ती फारच लोकलच्या जवळ असल्याने त्याचा सहज हात पोहचला होता. गाडीने वेग घेतला. तिचा स्कार्फ बरोबर तिची ओढणीसुद्धा ओढली गेली. ते बघून माझ खर तर काही संबंध नव्हता. पण तरीदेखील तिळपापड झाला. दोन सेकंदासाठी त्या गेट बहाद्दराला शिवी द्यावी अस मनात आल. माझ्या डब्यातील एक जण म्हणाला आजकाल मुल फार मुलींची छेड काढत असतात. खर तर अशी मुलींची छेडाछेडी मी मुंबईला असताना देखील कधी बघितली नव्हती. पुण्यात मुलींना शिट्ट्या मारतात हे बघितलं होत. पण अस अंगावर हात टाकण, पहील्यांदीच बघितलं. मी तो कोण आहे हे बघायचा प्रयत्न करीत होतो. पण तो कोण हे दिसतच नव्हत. माझ्या डब्यातील थंड प्रतिक्रिया बघून माझा खूपच त्रागा होत होता. विचार केला कि पुढच्या स्टेशनाला त्याला गाठायचं.

अस भांडाभांडी प्रकार मी कधीच केलेला नाही. पण ह्यावेळी मात्र पित्त खवळल होत. त्यात माझा सकाळपासून सर्दीमुळे घसा बसलेला होता. त्यामुळे माझ्या आवाजात कोमलता नावाचा प्रकारच राहिला नव्हता. चिंचवड स्टेशन लोकल निघताना त्या मुलीकडे बघितले त्यावेळी ती मुलगी आमच्याकडे अगदी अगतिकपणे बघत होती. तिचा चेहरा आठवला कि आणखीनच राग वाढत होता. पुढच स्टेशन कधी येत अस झाल होत. माझ्या समोर एखाद्या मुलीची छेड काढली जाते. आणि मी बघत राहिलो. अशा विचाराने मला माझीच लाज वाटत होती. पण काय करू, हे सगळ इतक पटकन झाल कि मी नुसता बघत राहण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. शाळेत असताना मी मारामाऱ्या करायचो पण त्यावेळी देखील ज्याला मारायचे असेल तो आपणाला काय करू शकतो याचा विचार करून मी मारायचे का पळून जायचे हे ठरवायचो. मी प्रयत्न करत हो कि तो दिसावा. पण पुढच्या डब्यात बरेच गेट वीर होते. नेमक कोण हेच समजत नव्हत. लोकल आकुर्डीला आली. थांबल्या थांबल्या मी धावत जावून पुढच्या डब्याच्या गेट समोर उभा राहून डब्यात मध्ये असलेल्या एकाला विचारले “कोण हिरो आहे तो?” अस म्हटल्या म्हटल्या एक एस वाय – टी वाय चा असेल, असा एक हिरो (मुलगा) माझ्याकडे बघायला लागला. मी समजलो कि हाच तो. मी काही पुढ म्हणायच्या आत तो म्हटला “मला वाटल होत तो माझा मित्र आहे. म्हणून मी स्कार्फ ओढला “. त्याला बहुतेक त्याला माझा मित्र एवजी मैत्रीण अस म्हणायचं होत. त्याच्या बोलण्यातला थरकाप मला त्याच्या पाठीवर हात ठेवून देखील जाणवला.

मी त्याच्या पाठीवर हात का ठेवला हे त्याला समजले बहुतेक. पण तो ज्या पद्धतीने म्हटला त्यावरून मला तो काही खोट बोलतो अस काही वाटल नाही. नाही तर माझा पुढचा उपाय होताच. त्याला पोलिसांकडे द्यायला फार वेळ लागला नसता. बर त्याने जर चुकून हिंदीचा वापर केला असता तरी देखील मी त्याला दाखवला असता. कारण हे असले उद्योग हे बाहेरचे करतात, ह्याचे अनेक छपरी प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे म्हणून म्हणतो. पण त्याच्या बोलण्यावरून त्याचा झालेला गैरसमज आणि त्यातून त्याला वाटत असलेली भीती दिसत होती. लोकलने होर्न दिला. मी त्याच्या खांद्यावर दाब देत त्याला म्हटलं कि परत अस करू नको. तो बाकी जाम गरबडलेला होता. अस कधी कधी होत. गैरसमजेतुन अनेक गोष्टी घडतात.

Advertisements

5 thoughts on “गैरसमज

  1. खरंय, होतात गैरसमज कधी – कधी. मात्र त्या व्यक्तिला जाब विचारुन खरं-खोटं विचारण्याचा – विचार – आवाजही यावा / ऐकावा लागतो. तुम्ही दाखवलेल्या माणुसकीचा ही आदर वाटला. ही माणुसकी अशीच जपा!

  2. कौतुक वाटले तुमचे कारण आजकाल स्वताचा संबंध नसताना कुणीही कुणाला मदत करत नाही.
    असे मला तरी वाटते.तुम्ही तर आगेत उडी टाकली होती कारण जर का तो पक्का गुंडा असता ना तर
    तो तुमच्यावर पण उलटू शकला असता व काहीही संबध नसताना तुमचे हात उगाचच पोळ्ले असते.
    पण परिणामाची पर्वा न करणार्‍या तुमचे कौतुक आहे व आनंद आहे की माणुसकीचा झरा अजूनही वाहता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s