लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?

काल रात्री लोकल चुकल्याने बसने आलो. त्यात नेहमीप्रमाणे एक प्रेमी युगल होते. नाही तरी पुण्यात असले प्रेमी युगलांची संख्या कुठे कमी आहे म्हणा. संध्याकाळी घरी आलो. आमच्या शेजारी एक नवीन जोडप आल आहे राहायला. त्यांना एक गोड बाळ पण आहे. आज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. नक्की काय होत आहे हे बघायसाठी मी बाहेर डोकावून बघितलं तर मारहाणीचा आणि कोणाचा तरी रडायचं आवाज येत होता. त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला असल्याने नक्की काय होत हे मला कळल नाही. पण एवढं नक्की त्या जोडप्यात वादावादी चालू होती. सकाळी लोकल मध्ये एकाने सांगितलं की त्यांच्या येथील एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याने बोलताना त्याची जुनी लफडी तिच्या बायकोला सांगितली. त्याच्या बायकोला वाटले की हा मोकळ्या मनाचा आहे म्हणून तिने देखील तीच जुन प्रेम प्रकरण त्याला सांगितलं. झाल ह्याने तिला घराबाहेरच काढल.

बाकी एकदा लोकलमध्ये एक जण खूप फोनवर तावातावाने बोलत होता. त्याच्या आणि तीच्या बायकोच फारच वाजल होत बहुतेक. आज बहुतेक या विषयावर मला विचार व्हावा असाच काही घडल. लोकलमधील एक माझा मित्र मला म्हटला तुझ लग्न झालेलं नाही, बर आहे. मी ‘का?’ अस विचारल्यावर तो म्हटला तू हव तिकडे हव तेव्हा आणि हव्या त्या गोष्टी करू शकतोस. मी त्याला म्हटलं ‘तू नाही करू शकत?’ तो म्हटला करू शकतो पण एकटा नाही. आणि जर एकटा कुठे गेलो तर घरात वाद होतात. मग तिला समजावण अवघड होऊन बसतं. माझा दुसरा मित्र म्हटला त्याला त्याच्या करता लव्ह मैरेज फायद्याच. झाल इथच विषय वाढायला सुरवात झाली. दुसरा मित्र पुढे बोलू लागला की, लव्ह मैरेज झाल असेल तर दोघांना एकमेकांचे स्वभाव आणि दोष माहिती असतात. त्याला म्हणालो की आमच्या कंपनीत एक सोडून बाकीचे सगळ्यांची लव्ह मैरेज झालेली आहेत. पहिल्याला आमच बोलण पटलं नसाव, तो म्हटला की मग ती (बायको) आपल्याला अरे तुरे करते. भांडणात सुद्धा माघार घेत नाही.

त्याच म्हणण मी हो हो करून टाळत होतो पण तो काही शांत व्हायला तयार नव्हता. मला पुढे तो म्हणाला की आपल्याला लग्नाआधी सगळ्याच मुली सुंदर वाटत असतात. मी त्याला बरोबर आहे अस म्हटलं. पण लग्न झाल्यावर पस्तावा होतो. जर ती आपल्याच जातीतील असेल तर काही वाटत नाही. पण नसेल तर खानापानापासून ते चालीरीतीत फरक पडतो. मग वाद व्हायला सुरवात होते. म्हणून जर आई वडिलांनी पाहिलेली आणि पसंत केलेली अधिक योग्य असते. कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त समज आणि अक्कल असते. आणि लव्ह मैरेज जास्त काळ टिकत नाहीत. मी त्याला त्याच बोलण मधेच तोडून म्हणालो की तुझ अरेंज मैरेज झाल आहे म्हणून तू अस बोलतो आहेस ना? तो म्हटला नाही अस नाही आमच्या कॉलेजात (हा जिथे नोकरी करितो तिथे) एक प्रोफेसर आहेत. त्यांनी नेपाळी मुलाशी लग्न केलेलं आहे. नुकताच झाल आहे त्याचं लग्न. पण अनेक वेळा मी त्या नाराज असताना बघितलेलं आहे. आता त्याचं घरी दोघांच खटकत असेल म्हणून या नाराज राहत असतील. हे एकूण माझा दुसरा मित्र म्हटला पण आजकाल लव्ह मैरेजच जास्ती होतात. आमच्या समोरच्या इमारतीत तर सगळी अशी लव्ह मैरेजची कपल्स आहेत. तू म्हणतो तो ती गोष्ट खरी आहे की वाद होतात, लग्न मोडतात देखील. पण दोघांपैकी एक जण जर शांत असेल तर टिकतात. कारण दोन्ही बाजूनी ताणाल तर तुटणारच ना. मी बाकी या गप्पात शांत होतो. नुसती मान डोलवत होतो. मला त्यांनी विचारलं तुला काय वाटत? मी नुसता त्यांच्याकडे बघून हसलो. मनात अस आल की ह्यांना म्हणाव माझ एका मुलीवर लव्ह झाल पण तिने दुसऱ्या मुलाशी मैरेज केल त्याला मी काय करू. त्यांनी विचारलं का हसतो तर त्यांना म्हणालो माझ अजून काही लग्न झालेलं नाही त्यामुळे मला यातील काही माहिती नाही की कोणत योग्य आणि कोणत नाही.

मला त्यातील पहिला मित्र म्हटला तू काय करशील लव्ह की अरेंज मैरेज? मी म्हणालो बहुतेक माझ आता आधी मैरेज होईल आणि मग लव्ह. अस म्हटल्यावर दोघेही हसायला लागले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जेवढे लग्न झालेले बघितले, अगदी माझ्या मित्रांपासून ते आजी आजोबा लोकांपर्यंत. त्यातलं कोणी अस फार सुखी झाल अस नाही. उलट चिंताच वाढल्या आहेत. बाकी माझा असा काही सपोर्ट किंवा विरोध नाही लव्ह मैरेजला. हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. आणि प्रत्येकाची परिस्थिती आणि विचार यावर तो किंवा ती ठरवते काय करायचं ते. लव्ह की अरेंज मैरेज.

Advertisements

18 thoughts on “लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?

 1. सुखदुखाच्या आपल्या कल्पना कधीकधी इतक्या सामान्य असतात की संसाराच्या विस्तारलेल्या पटावर त्या दिसतच नाहीत.

 2. Bhandane tar Hotach Astat Mag Love Marriage aso Kinvha Arrenge Marrige Aso
  Farak Fakt Itkach Ki Love Marraige madhe Lavkar Bhandane Chalu Hotata Karan Premacha kaal tar tyani lagnachya aadhich ghalvlela asto
  Arrenge marrige madhe premacha kaal doghehi navin aslyamule thode divad chalu rahto nantar tehi love pramane bhandu lagtat.
  Tikavayla Donhi Paddhat kathin Kinvha sopya mhanta yetil
  Karan Lagnachya Donhihi Paddhatit Ekane tari Samjun Ghene Mahatvache Aste.

 3. love marrige kivha arrenge marrige kel tari ek mekana samjun ghen khup garjech ast ani ekmenacha vishwasachi garaj aste tarach lagn jivan tiku shakt……………………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s