अकलेचे कांदे

काल रात्री आमच्या इमारतीतील वरच्या मजल्या वरील एक व्यक्ती आला. मला म्हटला कि माझ्या संगणकाचा फोर्मेट मारायचा आहे. मी विचारलं का? तर तो बोलला, माझ्या संगणकातील मेक्याफी अंटी व्हायरस काढायचा आहे म्हणून. त्याला मी म्हणालो मग अनइंस्टाल करायचा मग. त्यासाठी फोर्मेट मारण्याची काय गरज?. तो म्हणाला नाही. फोर्मेट करावा लागेल अस माझा मित्र म्हणाला. त्याला म्हटला मला सुटीच्या दिवशी माझ्याकडे तुझा संगणक घेऊन ये. मग मी तो काढून दुसर एखादा टाकू. तो म्हटला ठीक आहे. बर हा जो व्यक्ती होता ना हा इंजिनियर आहे. आणि त्याच्या हाताखाली पन्नास जण काम करतात. आणि हा बोलतो कि सोफ्टवेअर काढण्यासाठी पीसी फोर्मेट करायचं.

आमच्या गावातील माझा शेजारी एमएससीआयटी मध्ये आमच्या गावात प्रथम आला होता. हौशी खातर घरी संगणक खरेदी केला. माझ्या कडे एक दोन दिवसांनी आला. आणि मला एक डीव्हीडी दाखवून म्हटला कि, हि आमच्या पीसीत चालत नाही. तुझ्या इथे बघ चालते का? मी माझ्या संगणकात टाकली. डीव्हीडी व्यवस्थित चालत होती. त्याने बघितलं आणि म्हटला कि मग माझ्या इथे एकदा येतोस का, आपण बघू कि का चालत नाही. त्याचा पीसी बघितल्यावर त्याला म्हटलं कि तुझा सीडी रायटर आहे. त्यात हि डीव्हीडी कशी चालणार? डीव्हीडी चालण्यासाठी डीव्हीडी रायटर किंवा डीव्हीडी रोम असायला हवा. किंवा निदान कोम्बो तरी असायला हवा. आता त्याला एवढ सांगून देखील तो पुन्हा म्हटला तुझ्या पीसीत कस चालली. मी म्हटलं कि माझ्या पीसीत कोम्बो आहे. तरी त्याला काही समजेच ना मला पुन्हा म्हटला कि दिसायला तुझ आणि माझ सारखाच आहे. मग का दिसत नाही? आता त्याला एवढ समजावून सांगितलं पण त्याच्या काही डोक्यात बसतच नव्हत. त्याला पुढ परत समजावण्याचा प्रयत्न केला, पण सगळ निरर्थक. मला म्हटला म्हणजे मला माझ्या हार्डवेअर वाल्याने फसवलं. त्याच्या हार्ड वेअर वाल्याने दिलेल्या लिस्ट मध्ये देखील सीडी रायटर लिहील होत. त्याला काही सांगण्यात अर्थ नाही म्हणून मी घरी निघून आलो.

एकदा लोणावळा स्टेशनमध्ये मी मुंबईला प्रगती एक्सप्रेसने जाण्यासाठी उभा राहिलो होतो. वेळेच्या खूपच आधी येऊन मी बसलो होतो. स्टेशनमध्ये डेक्कन क़्विन आली. टीसी महाशय तिकीट चेक करण्यासाठी आले. मी फालाटवर एका बाकावर बसलो होतो. महाशयांनी मला तिकीट विचारले. मी तिकीट दाखवले. मला म्हटला की तू डेक्कन क़्विन ने आलास का? मी नाही म्हटल्यावर माझ्यावर चिडायला लागला. मला म्हटला की तू डेक्कन क़्विनेच उतरला. आता पावती फाड. त्याला मी गोडीत म्हणालो की साहेब, मी काही डेक्कन क़्विन ने आलो नाही. आणि तुम्ही बघितलं का मला डेक्कन क़्विन ने येताना? मग तो अजूनच चिडचिड करायला लागला. मला त्याच्या केबिन मध्ये घेऊन गेला. मला म्हटलं की तू कुठला? काय करतो? कशाला मुंबईला चालला? तरी देखील मी त्याला दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नीट दिली. तरी साहेब एकालाच तयार नाही तिकीट फाड म्हणायला लागला. शेवटी मग त्याला अरे तुरे केल्यावर मग निमुटपणे जाऊ दिले. साहेब म्हटलं हीच चुकी केली. कंपनीत तर काही विचारू नका. असले असले नमुने आहेत ना. पीसीत काही मेसेज आला की हे घाबरतात. जाऊ द्या काय बोलायचे या अकलेच्या कांद्यांबद्दल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s