काय करायचं या परप्रांतीयाचं?

दुधात भेसळ करणाऱ्या दोन आंध्र प्रदेशातील दोन तरुणांना काल पिंपरीत पोलिसांनी अटक केली. एक आहे बक्तुल रामचंद्र गिरी आणि दुसरा उमेश कृष्णा दांडे नामपल्ली. दोघेही खराळवाडी मधील साईकुंज इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहणारे. रोज सकाळी साडेचार वाजता एका डेअरी मधून दीडशे लिटर दुध खरेदी करून अजमेर मधील एका ग्राहकाला काही पिशव्या त्याच किमतीत विकत असत. काही पिशव्या एका बाजूने फोडून त्यामधून दुध काढून, तेवढेच पाणी पिशव्यात भरून त्या सील करत असत. पन्नास लिटर दुध मागे दहा लिटर अतिरिक्त दुध हे निर्माण करत असत. चिखली आणि मोरेवस्ती येथील हॉटेल, चहाच्या टपऱ्या या ठिकाणी ते विकत असत. रोजचे निदान ३००-५०० रुपये सुटत असत.

पुण्यात आजकाल जिथे बघा तिथ हीच मंडळी आहे. कुठून येतात आणि कधी येतात ते देखील कळत नाही. पहिल्या पावसानंतर कुत्राच्या छत्र्या उगवतात ना तशा इथ रोज नव नवीन झोपडपट्ट्या निर्माण होतात. मग फुटपाथ काय आणि मोकळ्या सरकारी जागा काय सगळी ह्यांच्याच बापजाद्याची मालमत्ता. कोणी विचारात नाही. आणि कोणी हाकलत नाही. कोणी काही करायचं ठरवलं तर लगेच मानव अधिकारवाले आहेतच की. बर शाळा यांच्या बापानी पण नाही पाहिलेली. मग टाक सिड्याची आणि गुटका, पान सुपारीची हातगाडी. कुठेही सुरु करा. कोण हटकणार नाही. कुठेही आणि कसेही राहणार. पण सरकार त्यांची काळजी घेणार. हे चोऱ्या करणार आणि पोलीस यांना पकडणारच नाहीत. आपल्या करांच्या पैश्यातून रस्ते, फुटपाथ बांधणार. आणि मग हे परप्रांतीय झोपड्या बांधणार. मग एवढ्यावर याचं भागणार नाही. मग भेसळी करणार. सगळीकडे हेच. विषात पण भेसळ करतील. पण यांना कोणी काही बोलणार नाही. काही वर्षांपूर्वी सिंहगडला एक रेव्ह पार्टी प्रकरण फारच गाजलं होत. त्यात पण हे परप्रांतीयच. एका पोलिसाला मध्यंतरी पुण्यात गाडीने चिरडण्याचा प्रयत्न करणारा म्हातारा पण परप्रांतीयच. मध्यंतरी पुण्यात काही हत्या झाल्या त्या देखील करणारे परप्रांतीयच. काय करायचं आता या पराप्रांतीयाचं?

Advertisements

2 thoughts on “काय करायचं या परप्रांतीयाचं?

  1. ho. kharech aahe.hya lokanee sagleekade bajbajpuri majavlelee aahe. jaga milel tithe rahatat, aani sagleekade ghan karun taktat. kuthlyahee margane paise milvayla tyana kaheech vatat nahee. shivay rahane fukat. veej fukat. he sarva tyana karayla kaaheech vatat naahee aani aaplyala tyanchyakaede durlaksha karayla. hya goshteena veleech atkav ghatla gela naahee. tyanee kaaheehee kele tari tyana koni vicharat naahee he tyana purnapane maheet aahe.hya sarvala mahanagarpalika, sarkar tasech aapanhee jababdar aahot.

  2. हेमंत जी खर आहे तुमच.
    पण आज महागाई आकाशाला भिडली आहे. आज समाजात दरी निर्माण होतांना दिसत आहे. एकी कडे गलेलठ्ठ पगारावाली माणस व दुसरी कडे दिवसाला 1००-3०० रुपये कमावणारी माणस. गलेलठ्ठ पगारावाल्याकडे बघून महागाई वाढते. तेव्हा त्या गरिबांनी कस जगायचं. मागील काही वर्षात आय. टी. मुले भरमसाठ पगार वाढ झाली, आणि महागाई ने जोर धरला.मला वाईट वाटत कोणीच त्यांचा विचार करीत नाही. मी फक्त गरिबी बद्दल बोलत आहे बर का? कृपया माझ्या http://mazyamana.wordpress.com ह्या ब्लोग वरील “स्थलांतर” हा लेख अवश्य वाचावा.

    My other blog: http://manachyakavita.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s