लग्न का करावे?

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला.

क्लायंट च्या म्हणण्यानुसार मी काम करत असताना काही कामानिमित्त मला माझ्या सहकारणीचा संगणक सुरु करावा लागला. तिचा संगणक सुरु केल्या केल्या तिचे जीटौकचे ऑटोमेटिक साईन इन झाले. बहुतेक तसं तीन सेट करून ठेवले असावे. बर मी ते जीटौक बंद करणार तेवढ्यात तीच्या मित्राचा ‘हाय’ चा मेसेज आला. मी तीचे जीटौक बंद केले. घरी येताना बस पकडली. येताना बरेच दुचाकीवाले त्याच्या गर्लफ्रेंडला मागे बसवून फिरायला चाललेले. आता तीच्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ती त्या दुचाकीवाल्याची गर्लफ्रेंड आहे अस म्हटलं आहे. खर तर हे पुण्यात काही नवीन नाही. आणि मी कधीही न पहिली अशीही गोष्ट नाही. पण तरी देखील अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. खर तर येताना मी विचार करत होतो की माझ्या सहकाराणीचा पीसी सुरु आणि तीच्या मित्राचा ‘हाय’, ही काही नवीन गोष्ट नाही. परवा तिचा आणखीन एक मित्र तिला आपण रविवारी दुपारी तीन वाजता भेटायचे का म्हणून चाट वर विचारात होता. बर तो काही तिचा ‘बॉयफ्रेंड ‘ वगैरे नाही. खर तर तिचा बॉयफ्रेंड मुंबईचा पण हिला पुण्यात फिरवणारे काही कमी नाही. तसं म्हणायचं झाल तर त्यांनी हिला फिरावाण्यापेक्षा हीच त्यांना फिरवते अशी शंका येते.

आमच्या शेजारी तर काही विचारू नका. दोघा नवरा बायकोची खूप भांडण होतात. पण जय शेजारच्या बायकोचाच होतो. मी अनेक जण बघितली आहेत. पण लग्न करून सुखी अस कोणीच नाही. माझा बॉस नेहमी कंपनीतून निघताना त्याच्या बायकोचा फोन येतो. की ताबडतोप या म्हणून. आज सुद्धा क्लायंट मध्ये एक लेडीज होती. ती काही म्हणाली की तिचा कलीग ताबडतोप ‘राईट’ म्हणायचा. माझा एक मित्र आहे त्याचे लग्न होऊन साधारणत एक वर्ष झाल असेल त्याला एकदा मी विचारलं होत की ‘कस वाटत लग्न आधी आणि आता?’ त्यावेळी तो म्हणाला होता ‘आपल्याला वाटत की खूप मजा असते म्हणून पण खर तर खूप जबाबदारी असते. एका जीवाचा सांभाळ आणि संरक्षण’. त्याच्याशी चर्चा केल्यावर तो पहिल्यापेक्षा अधिक चिंतेत वाटला होता. माझ्या काका काकूला बघून, मित्र आणि त्याच्या बायकोला बघून, मावशी आणि तिचे मिस्टर बघून, माझ्या बॉस ला बघून अस वाटल नाही की लग्न करून कोणी सुखी झाल आहे. उलट अनेक बंधन आली अस वाटल. बॉसला कंपनीतून निघताना बायकोला मी कंपनीतून निघून घरी येतो आहे अस सांगावं लागत. सहकार्णीच काही विचारू नका. तिचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो. पण मी अस कधी बघितलं नाही की ने स्वताच्या मोबाईल वरून त्याला फोन केला. जाऊ द्या हा विषय वेगळा आहे. तात्पर्य फ़क़्त एकाच लग्न करून मला तरी काही आपण सुखी आनंदी राहू अस वाटत नाही.

म्हणजे विकेंड असला की तीच्या इच्छे खातर कधी मॉल मध्ये जाऊन हजार- दोन हजाराचा चुराडा करायचा. बर ती घेणार काय तर चप्पल किंवा ड्रेस. आणि तो देखील फार फार तर सहा महिने वापरणार. तिथून मग तिची इच्छा हॉटेलमध्ये जेवण करण्याची. झाल ते होऊन देखील कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी जगतो हेच कळत नाही. कंपनीतील नोकरी झाली की बायकोची चाकरी. आता मला याचा काही अनुभव नाही पण मी ज्या ज्या जणांचे लग्न झालेले आहे त्यांना बघून तरी लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?

Advertisements

126 thoughts on “लग्न का करावे?

 1. लग्न का करावे? Good Question… आयुष्यात एकदा तरी जुगार खेळावाच लागतो… त्यासाठी लग्न करावे…

  माझे लग्न झालेले नाही आणि सध्या तरी मी आयुष्यातल्या सर्वात सुखी कालखंडातून जात आहे याची मला खात्री आहे…

  लग्नासंदर्भात एक विनोद –
  मला लग्न करायचे आहे; या विचारापासून परावृत्त करण्याचा कवी अशोक नायगावकरयांचा सल्ला –
  जवळच्या शाळेत जाऊन मुलांच्या प्रवेशासाठी किती पैसे घेतले जातात याची चौकशी करा.

 2. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?? samaj kaay mhnel ase so called ? padt nasteel tar nako karus lagn bign! live in aahech 🙂 shevtee vishwaas hava lagna! ghrkamala ‘baaimaanus’ lagt mhnun lagn karu naye!

 3. lagna kroon jala pashtap na jhala
  asa kon kay konach bap na jhala
  lagna karnaryani bashing gudghylach bandhave
  karan lagna karnaryala dok naste
  lagnaparyant thik aahe sare
  pan lagnanantar sop naste
  lagnachya eka ladvacha footoon jeva
  chivda jhala
  robab tyancha kevdha hota
  ata jeev tyancha kevdha jhala
  lagna ya eka shabdane jyacha tharkap na jhala
  asa kon kay konach bap na jhala
  jyachavar prem kele tyachashi lagna karne
  ha premacha apman jhala
  jyachavar lagna kele tyachashi prem karne
  ha lagnacha apman jhala
  he niyam jya premvirani todle
  he niyam jya premvirani todle
  tya viranch fadsha apo aap na jhala
  asa kon kay konach bap na jhala

 4. lagna kroon jala pashtap na jhala
  asa kon kay konach bap na jhala
  lagna karnaryani bashing gudghylach bandhave
  karan lagna karnaryala dok naste
  lagnaparyant thik aahe sare
  pan lagnanantar sop naste
  lagnachya eka ladvacha footoon jeva
  chivda jhala
  robab tyancha kevdha hota
  ata jeev tyancha kevdha jhala
  lagna ya eka shabdane jyacha tharkap na jhala
  asa kon kay konacha bap na jhala
  jyachavar prem kele tyachashi lagna karne
  ha premacha apman jhala
  jyachavar lagna kele tyachashi prem karne
  ha lagnacha apman jhala
  he niyam jya premvirani todle
  he niyam jya premvirani todle
  tya viranch fadsha apo aap na jhala
  asa kon kay konacha bap na jhala

 5. लग्न का करावे?हे आपल आयूषाचा कारभार योग्यारितिने चालावा भरकटलेल्या आयूषाला योग्य दिशा मीळावी आपल अस हक्काच आपल्या सूख:दूखात साथ देणार असाव म्हणून लग्न

  1. lagn ha sukhad anubhav ahe. pratekala lagn he karavech lagte pan te mana pasun karave asa mazha mat ahe . lagn zhalyavar aplya sukh dukhat samil honara ek vekti asto.jyacha shi apn sarv kahi share karu shakto . tyachya khandyavar doke thevun radu/hasu shakto. aplyala yogya to salla denara/marg dakhavnra.

  1. Mangesh Lok nave thevtata mhanun lagnn karaych asat as nahi ‘re. Mala ek samjat nahi Lok nehami vait gostincha vichar ka kartat Kay mahiti lagnn kelyavar tras asto manus sukhi hot nahi. Jyachya-tyajya nature var hya gosti avlambun astat. Life madhye sukhi rahaych ka tras karun gheicha. But ek sangto lagnn kelache khup kahi changla fayde astat.

   1.) Aaplyala Aaplya hakkacha manus bhetato, hakkacha manus mhanje aapli molkarin
   Have mhanje aapn je sangyachy ani tine takaych. Bt tich vekti aaplya sukh-dukhat barobar aste.
   2) Aaplya life is koni partner asto year to manus tr kharch khup god asto.
   Mhanjech pratek gosti samjaun ghene. Kahi anrth ghadt asel tr tya pasun thambvne he sagli kam to vekti karat aste.
   3) Mangesh kahi Lok aasa vichar karat astat ki lagnn kelyane manus financial prob. Madhge yeto I understand bt lol aasa vichar ka kart nahi Kay mahiti jo koni aapla life partner asel tr tyane aaplyala business madhye sath tila ani aapla business 10% wadu on shakto barobar and na.
   4)mhanun lagnn kelyane kharch kahi vait not nahi tr sath milate.
   5) Konitari aapli love sukhi karnar astat .
   6) Kinva aaplya mule tyachi life ani tyachya mule aapli life madhye star yenar asti ani aapla jivan khup sukhi honar asel .

   Jar saglya lokani asa changla vichar kela tr aaplyala life madhye manasarkh life partner bhetun life sukhi hoila vel lagnar nHi
   Ani ase prashn Nirman honar nahit.

   Fuel thanks

 6. जीवन ही एक मोठ्ठी लढाई आहे हे कुंकु चित्रपटातील जुने गाणे कधिमधी येळ मिळाल्यास अवश्य ऐकावे…

  त्यावरून थोडाफार अर्थबोध होईल असे वाटते. त्या नदीच्या काठावर बसून पाण्याच्या तापमानाची कल्पना करणे खूप सोपे आहे. अधून मधून हातपाय बुचकळून पाहणे जरा वेगळे पण नदीत उडी मारून ती पार करणे किंवा बुडणे खूपच अवघड…

  पण नदीत एकदा उडी मारली की “सदैव सैनिका पुढेच जायचे” असेच वागावे…

  आणि हे सर्व का करायचे तर… नाहीतरी ते न करून फार काय ईषेश करणार आहात आपण? हा प्रश्न स्वतःसच इचारावा 🙂

 7. lagna ya eka shabdane jyacha tharkap na jhala
  asa kon kay konacha bap na jhala
  jyachavar prem kele tyachashi lagna karne
  ha premacha apman jhala
  jyachavar lagna kele tyachashi prem karne
  ha lagnacha apman jhala
  he niyam jya premvirani todle
  he niyam jya premvirani todle
  tya viranch fadsha apo aap na jhala
  asa kon kay konacha bap na jhala

 8. तसं लग्न करून कोणाच ही भल झालेलं नाहीये पण आपण पिंजर्यात असताना कोणी “आझाद पंछी” पहिला कि वाईट हे वाटणारच 🙂
  माझं लग्न झालेलं नाही आणि हे वाचून तर लग्न करायचं कारण काय हा प्रश्न पडलाय…

  1. लग्न हा जर पिंजरा असेल तर ब्रह्मचर्य हा अदृश्य पिंजरा ठरतो… जसा देव दिसत नाही म्हणून तो नाही असे लोक संबोधतात आणि मग स्वतःचे पुतळे त्यांचे अनुयायीच उभारतात… सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही म्हणून पाहूच नये असे नाही तर खरा खिलाडी पिंजऱ्यात बसून त्यातून पुन्हा सुटून बाहेर येतो… है हिंमत?

  2. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडतंच राहतात…

   आणि लग्न म्हटल्यावर घरात भांड्याला भांडं हे कधीतरी आपटायचंच असं म्हणतात

   …. म्हणून त्यापासून दूर पळणं हा पर्याय नाहीये..तसंही आजच्या live-in पेक्षा लग्न कितीतरी पटीने चांगलं आणि श्रेष्ठ आहे

   काही जोडप्यांची लग्नं अयशस्वी झालीत म्हणून लग्नं हा प्रकारच मोडकळीत काढावा का? परस्पर सामंजस्याचा उपयोग तिथेही करावा लागतोच

   असो…… लग्नासाठी खूप शुभेच्छा… 🙂

 9. Maza mate tari lagne faarch chan aste.. he me maze lagna zale mhenun nahi bolat. Aaushat fakta Aai-baba, bro-sis. cha hi palikadcha ek javalcha nate asava ase pratek janana vate. Tya natyat itki javalikta asete ki pratek sukh-dukh, bhandan, rusava-fugava hya goshti keva ghadun jatat te kalatach nahi…..
  Me evdhach sangate ki navrya(Husband) sarkha dusara best friend jagat kuthe hi milnar nahi,,,

 10. lagn karave jar if u feel you need that special sum1 with you always. But, as with all things, familiarity breeds contempt, and hence it is not some inevitable thing at all. Going after your heart is the best strategy. But, in Indian society, I doubt whether we get any chance to really ‘feel’ anything all by ourselves. So, it is largely a matter of going with the herd. Of course, I am not saying that all guys are like that, but in general, that is the case.

 11. lagn karave karan lagn keleyane manshach jivanat stirata yete lagn aghodar vaykti dor shivaycha patghi sharka varya barobar firat ashoto, lagn nantat vaykti var javobdari yeta to kahi tari milaviny shati jujant ahsto tayacha jivanat laksh milte, aani laksh milavinaya karta eak shabhighi aaplay shobat aste ki jicha var purn pane vishvas theu shakto,

  Vinay Zanje

 12. घरी असताना
  नवरा बायकोशी बोलत नाही.
  ऑफिसमध्ये पोहचल्यावर फोनवरून “हाय डार्लिंग”
  म्हंटल्याशिवाय त्याला राहवत नाही
  माझी गोष्ट माला सांगताना
  मी जास्त खोलत शिरत नाही,
  कारण नावालाही मग मी
  निर्दोष माझा उरत नाही.

  1. > pooja
   > नोव्हेंबर 21, 2011 11:59 सकाळी

   उत्तर एका सेकंदात आहे असे लिहावे म्हणून कीबोर्ड सरसावला आणि लक्षात आले की आपल्याला बाजले की बारा म्हणायला चक्क १ मिनीट आहे…

  1. आपल्यावर ही टीका नक्कीच नाही पण आमच्या मनातला वांड वात्रट टीकाकर स्वस्थ बैसू देत नाही म्हणून सांगतो, की आपल्या नांवात “minu” एक अंत्य S लिहीला की पुण्यातल्या लोकांच्या डोक्यावर थंड बर्फ ठेवता येईल असे उत्तर तयार होते,,,, पुणे तिथे काय सगळेच ???? अशा अर्थी, किंवा अर्थाअर्थी… 🙂

   1. खरं तर ह्या विषंवादात पडायची इच्छा नाही तरी पण आज एक कॅट मारले गेले, तरी काहीतरी विचारून कर्तव्य पार पाडतो…
    तर ते मनगट म्हणजे हाताचा पंजा आणि ज्याला इंग्रजीत फोर आर्म (फोर वॉर्न नव्हे) म्हणतात, तोच भाग ना? की अजून काहीतरी वेगळेच सांगू पहाताय तुम्ही, आपण वगैरे वगैरे…
    अगदीट चणे आहेत पण दात नाहीत अशी अवस्था होण्यापूर्वी कोणीही लग्न केलेले केव्हाही चांगलेच… आणि शुभ कार्याला काही मुहूर्त आवश्यक नसतो असेही काही विद्वानांचे मत आहे… असो, पुरे हा आमचा आजचा राजशिष्टा४, सर्वांना ह्या इष्टापत्ती कारण शुभेच्छा वगैरे काय म्हणतात ते….

 13. जीवन ही एक मोठ्ठी लढाई आहे,लग्न करा आणि त्यातली गोडी पहा,
  संसाराची गोडी काही वेगळीच असते म्हणूनच
  सुख काय असते ते समजण्यासाठी लग्न करून पाहावे …………..

  Anku-023

 14. माझे लग्न झालेले नाही आणि सध्या तरी मी आयुष्यातल्या सर्वात सुखी कालखंडातून जात आहे याची मला खात्री आहे…

 15. लग्न हि संस्था अशी आहे कि तिला ” toilet ” ची उपमा द्यावी वाटते ….कारण विचाराल तर ते असे कि जो आत असतो त्याला कधी एकदा बाहेर पडतो असे वाटत असते व जो बाहेर असतो त्याला कधी एकदा आत जातो असे झालेले असते ……….. बघा पटते का …….?

  1. Nakaratpak Abhipryay avashya asava ……
   parantoo lagna sarakhya pavitra bandhanala… Toilet… chi Upma…
   Mhanje pashutulya vicharsarani….asanaskrut vicharanchi.. galichhya mandani..
   Bharati Tai …Aai & Babanche palakatva ani Matechi mamata… lagna sarakhya bandhanatoonach Janmala yete……

 16. Lagna Mhanje Eka Sundar Ayushyachi Su-prabhat……Gajanan

  Ek-mekanna samjun ghetale tar, langna mhanje 100% sonyachi kharedi.
  Amhi doghe mhanje mazi patni ani mi eka chhotyashya mula madhye (Mulaga -Kaustubh) ekroop-ekjiv zalo….. Jagatil sarvat sukhi Jodape mhanun kadachit amcha namber lagu shakel. Mala lahan pana pasun kichan madhe kam karayala avadate……lagna zale tari special test mhanun kadhi madhi mi bayakochya ichhenusar jevan kararto…NonVeg specialist..

  Gajanan Parab. Dombivli…9405226167

 17. Lagna ka karave ? mula muline lagna kele nahi tar ? kutumb vyavsta kashi chalnar? samaj kasa vadhanar? aapan phakt apalach vichar karayacha ? samaja prati aapale kahich kartavya nahi.aai babana natwache sukh dene aapli jababdari nahi ka? aankhi barech ???? aahet. vichar soda lagna kara .aayushyatali sarvat sundar kalpana Lagna aahe. yachyakade chukichya arthane pahu naka.;Lagna nantar jodidaras vishwasat ghya. tyachya swatal paha. aapale kan tyala deun taka (aiknyasathi)sagale kahi thik hoil. jai maharastra

 18. लंग्न मन्जे एक जुगार आहे ??/
  ह्या जुगार मध्ये एखदायाल संसार सुखी होतो तर| एखदा बरबाद होतो ???

  खूप समस्या असतात ??
  माझे लग्न झाले आहे पण खूप परेशान आहे ?? त्यामुळे तुम्ही १०० वेळा विचार करा

 19. lagna kara pan jyachya sobat aple patael jo aplayaya samjun kheu shakel.
  pan me tar mhante lagnach karu nae alpya swananlaa ka adwayche lagna kara pan purushala fakta apla adhikar gajwaaycha mhanun aplya sobat lagna karatat
  me tar trasale ahe ya jiwanala nako mala jiwan nako

 20. Hemant ji…..

  Saarya baaykaana ekach lathi ne haaku naka…….. Mee ashya hi baayka paahilyaat jyaanchya yenyaane gharacha kaayapaalat zaala…… Maazi aai working woman pan aahe aani uttam gruhini hi aahe…… Aani tila aani mala.. aamha doghinna shopping cha titkaara aahe…… dar weekend la aamhi ghari special swayampaak banavto…….. aani varshaatun hardly 2-3 vela hotelling karto…….. aata maaze hi lagna tharle aahe……. aani maazya aai che hech sanskar mee maazya saasri ghevun jaanaar aahe……..

  Hemant ji, aapan aaplya pratyek post madhye 90% Puneri lokaanbaddal ch ka lihita? kadhi tari 10% offbeat lokaanbaddal suddha vichaar kara……

  Vaat paahin aamchya saarkhya lokaanbaddalchya post chi….

  All the best 🙂

 21. pan aaushyat aase hatke prasanga aapan aplya gf. sobat kartoch na mang lagnantar keletar kahi bhigadat nahi

  aani jya lagnat aase hatke prasanga hot aastil tar dhogni te samjun ghyayala pahije

  aani jya don capal madhye aase hatke prasanga hotat tya capal madhye prem hi goshta khup uncha aaste premhi bharpur aaste

  aani he capal ekmekan pasun jast door rahu shakat naste karan tyana ekanmekach prem swsta basun detnahi

  aashya goshti mule capal madhle prem, vishwas, aani kharepana tikun rahato

  pan jya capal la ruthana – manana yatli maja kalali nahi tar te capal kadhi saxex nahi hou shakte

 22. lagn doghanch hote pan tyachya nantar tya doghanmadhye swatah naryachi aie v mothi bahin yanchyamule tyanchya sansaracha nash hoto ha experience mazya barobar zala ahe mhanun mi lagnachi mala far kilas yete jo aplyala avdto to bhetat nahi nako tyachyashi apan marriage howun jate khup sad ahe me mazi 6 months mulgi aie ghewun aleli tevapasun aj tagayat navryane tu kay khate mulila la kay bharvates tyachi vicharpus na karta fakt lagn karave ka purshani i heat my husband in my future life

 23. sarvancha abipray vachun anand jala , “LOVE IS LIFF, BUT LOVER IS NOT WAFE”
  bayako hi jevanatil dusari aai ahe, lagn he kartya ahe suki jivanatil mantra ahe, KARM TERE ACHE TO KISMT TERI DHASI, NIYAT TERE SAF TO GHARME HAI MATHURA KASI .lagnanatar ek maitrin betae , ti sakisobati sukat hi dukhat hi sobat aste. .

 24. (lagn mhanje Kay?) Mi fakt 10 th shikloy pan jevdha mi laga ya vishyavar 5 varsh ladat aahe (tumhala konala lagnacha khara arth mahit disat nahi )lagnacha kra arth….. “smajacya manytene v bandhnatun kelele “x” mhanje lagn hoy..ha aahe lagnacha arth (shanka asel tar 1 hushar lekhkala jaun vichara.

 25. लग्न कारण खूप सोपे आहे परंतु निभावणे खूप अवघड आहे .जो करतोआणि निभातो खरा माणूस
  भाऊसाहेब फुंदे

 26. लहानपणी आई वडिल नसलेतरी आपला सांभाळ कसाही होतो, तरुणपणी आपण स्वत:चे पालनपोषण करण्यास सक्षम असतो. नवी उमेद असते पुढे आपले आयुष्यात चांगले होइ्रल अशी आशा असते परंतू म्हातारपणी जर आपले कोणीही नसले तर मरणं फार अवघड असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने म्हातारपणी आपल्याला हक्काचा जोडीदार हवा. त्यामुळे कोणी लग्न न करण्याचा निर्णय घेत असेल तर त्यांनी निर्णय बदला. कोणावर अवलंबून राहू नका कोणीतरी आपल्यावर अवलंबून राहील असे बना. आधार घेण्यासाठी नाही आधार देणेसाठी लग्न करा. पटल तर घ्या.

 27. lagn kunasobat karaychey ha nirnay getana hajar velaa vichar kara mag nirnay ghyaa …………………………………..pan ekda ha nirnay ghetalyaawar hajar jari problem samor aalet tari tyanna face karnyachi takad tumchyaat asu dyaa……………………..!!!!!!

 28. फारच अभ्यासूपणान विचार मांडले आहेस . काहि शुल्लक माणस वगळता सरवाची स्थिती तीच आहे .घरचि अब्रू का सांगावी ? पण मनातून दुःखी असतात अस सूखी आहे अस कूणी भेटल नाहि हो .मूकपणे सहन करून कोरड उसन हसू आणायच एवढच ….

 29. lagn he don sharirach nahi tar don jivanch milan aahe.
  Maherchya mansansarkhi sasarchi manas dekhil samjutdar va premal asayala pahijel.
  Lagnasathi aapla aaplya jodidaravar vishvas aani prem asayla pahijel.

 30. माझ्या लग्ना ला तीन वर्ष झाली .. मी मुळची पुण्याचीच , लग्न होऊन तडक दुबई ला आले. नवरा दुबई चा असल्या मुळे लग्ना आधी फक्त एकदाच भेटले होते, आणि त्याच वेळेस पसंती झाली.
  लग्ना नंतर चा एक वर्ष जाम अवघड गेलं . त्याला समजून घेयला..त्याने मला समजून घेयला… पसंती नापसंती . जसे दिवस गेले आम्ही आमच्या नात्यात फुलत गेलो, कधी मी त्याची आई होते तर तो माझा बाबा.. कधी तो माझा मित्र होतो तर मी त्याची सलेगार .. आज कल तुम्ही एक मेकांना social media चे passwords दिलेकिच मानलं जातं की हो बाबा आपण आपल्या नात्यात पारदर्शक आहोत. पण ही वेळ येयू दिलीच नाही आम्ही. माझे जेवढे मित्र मंडळी होती किवा आहे , मी त्यांच्या बद्दल बोलत राहते तो त्यांना ओळखत नसला तरी. मग तो ही मला त्याच्या मित्र मंडळी च्या गमती जमती सांगतो… म्हणून तो मला आणि मी त्याला फेसबुक स्टेटस वरून judge नाही करत .
  मला वाटता की कुठल्या ही नात्यात शब्द कमी नाही पडले पाहिजेत, जेवढ होईन तेवढ बोला एका मेकांशी एक मेकां बद्दल बोला . किती ही फालतू असला तरी शेर करा… वीकेंड्स ला मी त्याला मॉल मध्ये बोर नाही करत पण त्याचे आवडते पदार्थ करते…भरपूर झोपते आणि तो त्याचे आवडते टी व्ही प्रोग्रॅम बगतो…
  एकदा तुम्हाला कळला ना की आई बाबांना नंतर आपल्यासाठी एकच व्यक्ती आहे मग तुम्ही त्या नात्याची गोडी घ्याला लागता.. मग comfortable होयला वेळ लागत नाही.

  all the best 🙂

 31. खर तर मी पण लग्न केले नाही यामुळे मला पण यातले फारसे काही माहीत नाही पण लग्न करणारा फसतो आणि नाही करणारा फसतो तो यासाठी की त्यांना वाटते आपण केल असत तर बरं झालं असतं मला असं वाटतं की सर्वच जण सारखे नसतात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.

 32. Apan jyachvr manpasun prem krto khr tr tyasobatach sagali life kadhli pahije….tyatch khari majj ahe ..tyatch khara anand ahe ….majh mate ……
  “””””तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…..
  .
  .मित्रानो पटल तर नककी शेअर करा

 33. अगदी बरोबर विचार करतोयस.लग्न म्हणजे फक्त तारेवरची कसरत उगीचच स्वतःच्या मनाला मुरड घालून इतर सगळ्याची मन जपत बसा आणि अशी खोटी नाती सांभाळत आयुष्यभर तडजोड करा.कोणी सांगितलाय हा व्याप वाढवायला.नाहीतरी भारत लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेच त्यात आपले अजून प्रयत्न कशाला नाही का.

 34. lagn tar kahi lok 1 samajik parmpara mhanun kartat , kahi lok aplya ghari kam karnyasathi koni asavi mhanun kartat , kahi lokana jivansathi mhanun lagn karave ase vatate , tar kahi jan sexial attraction mhanun lagn karta , majha mate tar lagn manje 4 din ki chandani fir andheri raat , aplya bavshat koni sambhal karava mhanunch lagn kartat he 90 % khar ahe

 35. अगदी बरोबर बोललात
  लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s