चंपी जयंती

काल रात्री जेवताना माझ्या लहान भावाला मी उद्या सुट्टी आहे का म्हणून विचारलं तर तो नाही म्हणाला. मग त्याने मागील वर्षीचा घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी रिक्षावाले काका एका मुलाला न्यायला गेले तर त्याचे वडील त्यांना म्हणाले ‘आज चंपी जयंतीची तुम्हाला सुट्टी नाही का?’ असं लहान बंधूराजांनी सांगितल्यावर घरातील सगळेच हसू लागले. काल माझा मित्र म्हणाला उद्या ‘पापा डे’ ला काय करणार? त्याला म्हणालो ‘काय?’ तो म्हणाला की ‘उद्या दोन ऑक्टोबर आहे, आता महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत ना. म्हणून उद्या पापा डे असं म्हणालो’. मला ऐकून हसू फुटले.

मी शाळेत असताना मराठीत एक धडा होता. धडा ‘भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर’ यांच्यावर होता. त्यात लेखकाने असं म्हटलं होत की, नेता मोठा की लहान हे ह्यावरून ठरवलं जात की त्याचे अनुयायी त्याच्या निर्वाणानंतर देखील त्याने दाखवलेला मार्गावर किती निष्ठेने चालतात. त्याच्या म्हणण्यानुसार अनुयायी जर मार्ग सोडून वागले तर नेत्याचे विचारानांचा पराभव असतो. आता चंपी जयंती काय किंवा पापा डे काय दोनही ठिकाणी गांधींच्या विचारांचा प्रभाव कमी झाल्याचा हा संकेत आहे. आता गांधीवादी म्हणणारे आणि त्यावर चालणारे खूप कमी झाले आहे. त्यामुळे गांधीजी कितीही चांगले असले तरी गांधी जयंतीचा दिवस हॉलिडे म्हणून साजरा होतो.

कदाचित गांधीजींचे अनेक निर्णय चुकलेले असतील. पण गांधीजी खरच महात्मा होते. उद्या आपण एखाद्या विषयावर चिडलो आणि काही करायचे ठरवले तर नातेवाईक आणि घरातील सोडून किती जण आपल्या मदतीला येतील? मग गांधीजी महात्मा का होते ह्याची प्रचीती येईल. आता ती गोष्ट वेगळी त्यांनी महात्मा झाल्यावर महान आणि खूपच मोठ्या चुका केल्या. पण त्यांच्या एका हाके सरशी मोठ्या प्रमाणात जनता त्यांचा आदेश मानून ती गोष्ट करायची. आता महात्मा गांधींना भारत ही सत्याचे प्रयोग करण्याची प्रयोगशाळा वाटली. आणि येथील जनता माकडे आणि उंदीर वाटले. त्यात त्यांचा काय दोष? त्यांनी त्यांचा सत्याचा पहिला प्रयोग दक्षिण आफ्रिकेतील काळ्या माकडांवर केला. तिथं तो यशस्वी झाला. मग त्यांनी भारतात येऊन मोठ्या प्रमाणात केला. आता प्रयोग सुरु असताना काही उंदीर आणि माकडे दगावले तर त्याला हत्या म्हणत नाहीत. माझा एक संगमनेरचा मित्र आहे. त्याने सांगितलेली त्याच्या आजोबांची गोष्ट. गांधीजीनी पुकारलेल्या चळवळीत (सत्याच्या प्रयोगात) मित्राचे आजोबा देखील होते. एकदा गांधीजी ह्याच्या आजोबांच्या दलाला भेट देण्यासाठी आले. ह्याचे आजोबा आणि त्यांचे सहकारी चळवळीच्या धकाधकीत अनेक दिवसांपासून उपाशी होते. गांधीजी आले. दुपारच्या वेळेस गांधीजीनी साजूक तुपातील पोळ्यांचे जेवण. दोन्ही बाजूनी दोन बायका. असा प्रकार बघताच ह्याच्या आजोबांनी ती चळवळ सोडून घरी आहे. आता तेव्हा पासून कट्टर गांधीवादी म्हणून ओळखले जाणारे गांधीवादी कुटुंब कट्टर गांधीविरोधी झाले. काय करणार त्याच्या आजोबांना हे समजले नसावे की महात्मा जी प्रयोग करत आहेत.

आता या प्रयोगात अहिंसा नावाचे द्रव्य जास्त प्रमाणात वापर केला जायचा. आता हे प्रयोग कधी यशस्वी तर कधी अपयशी. पण काय करणार आपले मूर्ख क्रांतिकारक लोक या गोष्टी समजत नव्हते. आता हे प्रयोग करू नका म्हणून जरी स्वातंत्र्यवीर सावरकांनी सांगितले होते. पण प्रयोग गांधीजींचे मग तेच ठरवणार. या सगळ्या गोंधळात आपल्या राष्ट्रापितांनी एका ‘पाक’ बाळाला जन्म दिला. आता ते ‘पाक’ उनाड निघाले त्याला महात्मांचा काय दोष? आपले लोक पण ना एवढी गोष्ट समजत नाहीत. खर तर गांधीजींना ‘वन म्यान आर्मी’ असं म्हणण्यापेक्षा ‘वन म्यान सायंटीष्ट’ असं म्हणायला हव होत. जाऊ द्या, मी तर आज घर साफ करून आणि कपडे धुवून गांधी जयंती साजरी करणार आहे. म्हणजे माझ्या कपड्यातील आणि घरातील असलेला मळ दूर होऊन जाईल.

Advertisements

2 thoughts on “चंपी जयंती

  1. खरेय… गांधी भारतात जन्मले, अन महात्मा झाले ह्याला गांधी तरी काय करणार?? तुम्ही लिहिलेल्या अनुभवाशी साधर्म्य असलेले वर्णन महानायक मधे पण आलेय..

  2. तुमचा ब्लॉग नेहेमीच वाचतो. पण आपले कांही बाबतित विचार अगदी वेगळे आहेत म्हणुन इथे कॉमेंट्स टाकायचं टाळत होतो. छान लिहिता, लिहित रहा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s