राज इज बुलशेट

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’.

खर तर मला हे कळत नव्हत की ह्या मराठीच्या द्वेषाच्या शिळ्या कढीचा उत आता का येतो आहे. बर हा माझा सहकारी मराठी. पण हा असा का बोलतोय हेच कळायला मार्ग नव्हता. त्याला म्हणालो मला जे अनुभव आले त्यावरून मला तरी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतो ते योग्य वाटत. कारण मी मुंबईत असताना मला असे अनेक अनुभव आले आहेत.’ त्याचे आपले तुणतुणे चालूच ‘हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे. आणि तुम्ही त्याचा विरोध करता’. त्याला म्हटलं ‘काही महिन्यांपूर्वी मला वाडिया कॉलेजच्या पुलापाशी एक माणूस भेटला. त्याने मला काही तरी विचारलं, पण मला समजेच न की हा काय बोलत आहे. मी त्याला ‘काय?’ असा प्रश्न केला. त्याने परत काही तरी सांगितले. पण तरीही समजेना. थोड्या वेळाने लक्षात आले. की तो मला इंग्लिश मध्ये ‘व्हेअर इज आयनॉक्स?’ अस विचारात होता. त्याच्या बोलीवरून तो चेन्नईकर वाटला. त्या लोकांची बोलण्याची पद्धत खूप वेगळी असते त्यामुळे मला समजायला वेळ लागला. आता बघ तो चेन्नई म्हणजे दक्षिण भारतीय त्याला मराठी येत नाही. आणि मला त्याची भाषा. त्याला आणि मला दोघांनाही माहिती आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. पण त्याने इंग्लिशचा वापर केला. मग तो जर हिंदीचा वापर करत नसेल तर तो देखील चुकीचा म्हणावा लागेल. आणि तोच काय दक्षिणेतील लोक इंग्लिश किंवा त्यांची भाषा याचाच वापर करतात’. माझा सहकारी पुन्हा सुरु झाला ‘भाषा हे काय आहे एक माध्यम आहे. मग कोणतीही वापरली तर काय बिघडत?’. मग त्याला मी म्हणालो ‘बरोबर आहे’. अगदी खर सांगायचं झाल तर मी न या मराठी आणि नॉन मराठीच्या विषयाला खूप कंटाळलो आहे. मी विषय संपण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो काही विषय संपवण्याच्या रंगात वाटत नव्हता. मी मुंबईत असताना राज ठाकरेंच्या आंदोलन आणि माझ्या तिथल्या अनुभवाविषयी सांगितले. पण त्याचे काही समाधान झाले नाही.

मग मी म्हणालो ‘माझा मुंबईचा पहिला दिवस होता. मी सीएसटी बाहेर उभा होतो. रात्रीचे साडे अकरा वाजले होते. आता मला पुण्याची सवय मोबाईलमध्ये कधीच पैसे न ठेवण्याची. तिथले सगळे क्वाईन बॉक्स बंद झालेले. आणि मलाही मुंबईतमधील काही माहित नव्हत. मला माझ्या मावशीकडे जायचे होते आणि तिच्याकडे माझा मोबाईल नंबर नव्हता. पाऊस पण जोरात सुरु झालेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कंपनीत हजर व्हायचे होते. आणि बस पण येत नव्हती. तिथल्या एका ट्याक्सी वाल्याला विचारलं की ठाकूरद्वार चालणार का?. बर मराठीत विचारलं तर त्याला समजेना म्हणून हिंदीत विचारलं. तर त्याने पन्नास रुपये होतील म्हणून सांगितलं. मागच्या ट्याक्सी विचारायला सुरवात करताच पहिला त्याला पंजा दाखवायला लागला. मग काय तो पण पन्नास रुपये होतील म्हणाला. आता ते ग्रुपिंग करून फसवायला सुरवात करत होते. आता ज्या ठिकाणी बसने चार रुपये तिकीट आहे अशा ठिकाणासाठी पन्नास, मला तरी जास्ती वाटत होते. शेवटी शेअर ट्याक्सी करून गेलो. दहा रुपये लागले.’ आता अस म्हटल्यावर सहकाऱ्याने पुन्हा त्याचे हिंदी प्रेम सुरु केले. की ‘मला देखील मराठी ट्याक्सीवाल्याने माझ्या बायकोकडे बघून मनपा ते पुणे स्टेशनला यायला शंभर रुपये सांगितले होते. म्हणजे काय सगळेच मराठी वाईट?’ मी त्याला त्या लोकांच्या पद्धती आणि वागण आपल्यासारख नाही अस देखील सांगितलं. पण तो काही एकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

शेवटी त्याच्या मनातल सगळ त्याने ओकल ‘राज ठाकरे जे बोलतो ते सगळ बुलशेट आहे. तो फ़क़्त मतासाठी सगळ करतो आहे. त्याला काही मराठीसाठी देणे घेणे नाही. राज इज बुलशेट’. त्याच अस बोलून समाधान झाल. त्याचा चेहरासुद्धा खुलला होता. त्याच्या दृष्टीने हा विषय संपला होता. खर तर मला त्याचा बिलकुल राग येत नव्हता. कारण आपले मराठी लोक खरच खूप प्रेमळ असतात. कोणाला देखील ते आपण त्या जागी असतो तर अस समजून त्याला मदत करतात. मुंबई लोकलमध्ये धक्के खाणारा, कोणीही बुटावर बूट ठेऊन उभे राहिले तरीही न चिडणारा. एकटा असेल तर रडका चेहरा करून आणि आपली दुख पिऊन उदास असणारा मराठी असतो. हे माझ्या एका वर्षाचा मुंबईतील अनुभवावरून पक्क माहित झाल आहे. त्यामुळेच माझा सहकाऱ्याच्या बोलण्याने मला काही नवीन किंवा चुकीचे अस काहीच वाटत नव्हते. प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. अस माझ मत आहे.

Advertisements

4 thoughts on “राज इज बुलशेट

  1. चार चौघात राज ला सपोर्ट करतो म्हणणं अवघड झालंय. पण तू बिनधास बोल्तोस माझ्या सारखं आवडलं आपल्याला. आपणच का शेपट्या घालायच्या.? माझा रुम मेट म्हणाला मला “तुम सब शिवाजी के बच्चे है ना” । असा झाडला त्याला? सांगितलं आज इथे पाय ठेवतोय्स ना तो महाराष्ट्र वाचला तो शिवरायांमुळे. नाही तर अफगाणिस्तानासारखा एखादा प्रदेश झाला असता.
    आपण स्टँड घेतला पाहिजे. त्यांना काही वाटो.

  2. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य नक्कीच आहे. मात्र मला वाटतं, एखादी स्थानिक बोलता भाषा न येणं ही त्रुटी असते पण स्थानिक भाषा समजत असूनही ती न समजत असल्याचा आव आणून, समोरच्याला आपण बोलू शकत असलेल्या भाषेतच बोलायला लावणं ही शुद्ध अरेरावी आहे. उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य लोकही महाराष्ट्रात येऊन हेच करतात. उत्तर भारतीय टॅक्सीवाले, रिक्षावाले यांच्याशी मराठीत बोलल्यास मराठी माणसाला जी ’वागणूक’ मिळते, ती पाहिली की राज जे करतो तेच बरोबर आहे असं वाटतं.

    वडाळा, मुंबई, एम. टी. एन. एल. मध्ये मी काही कामासाठी गेले असता, एकही मराठी माणूस दिसला नाही, हे एक दुर्दैव! त्याहूनही वाईट वाटलं, जेव्हा ’मे आय हेल्प यू’ चा डेस्क सांभाळणा-या दाक्षिणात्य बाईंनी, मी मराठीतून प्रश्‍न विचारल्यावर माझ्याकडे जो त्रासिक कटाक्ष टाकला, त्याने! संभाषणाची सुरूवात करताना मला त्यांचा चेहेरा पाहून माहित नव्हतं की त्या दाक्षिणात्य आहेत पण महाराष्ट्रात रहाणा-या मराठी माणसाने, मराठीतून प्रश्‍न विचारणं ही चूक कशी असू शकते? यानंतर सुद्धा जी तडजोड केली जाते ती मराठी माणसाकडूनच. त्या बाईंना मराठी बोलता येत नाही म्हटल्यावर नेहमीप्रमाणे त्यांना मराठी येतंही नसणार अशी समजूत करून घेऊन, मी इंग्रजी आणि हिंदीतून संवाद साधला. मग जाताना बाई गोड हसल्या.

    तुमचा ’राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी’ हा लेखही वाचला. सुंदर आहे. त्याखाली असलेली नरेंद्र प्रभूंची प्रतिक्रिया सर्वात बोलकी आहे – “मराठी बोललचं पाहीजे. त्या साठी आंदोलनं करावी लागतात हिच शरमेची गोष्ट.” तुमच्या मित्राला ही प्रतिक्रियाही जरूर दाखवा.

    प्रतिक्रिया लांबतेय पण रहावत नाही म्हणून सांगते. आज महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांत परप्रांतीय आघाडीच्या जागा पटकावून बसले आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे किंवा त्यांचे सहकारी मराठी भाषिक जर मराठीचे पुरस्कर्ते नसतील तर त्यांचा राग येण्याऐवजी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी कारण त्यांनाही त्यांची रोजी-रोटी आहे. असं खुलेआम राजला प्रोत्साहन देऊन त्यांना ’पंगा’ घ्यायचा नसेल पण आत त्यांनाही कुठेतरी मराठी आंदोलनाची गरज वाटतच असणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s