लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो.

काकूंना म्हणालो की ‘मी आधी घराच्या कर्जासाठी एचडीएफसी बँकेत चौकशी केली होती. आणि त्यांनी मला सहा लाखच कर्ज देखील मंजूर केल होत. त्यांनी सगळा हिशेब करून मला वीस वर्षांसाठी ६३०० रुपयांचा हप्त्याने फेडण्याचे सांगितले होते. मलाही खूप आनंद झाला होता. पण घरी येऊन मी जेव्हा हप्ता आणि महिने याचं गणित केल त्यावेळी लक्षात आल की बँक मला सहा लाखच कर्ज देणार आणि माझ्याकडून हप्त्याने पंधरा लाख बारा हजार रुपये घेणार. एकूणच व्यवहार तोट्यात असल्याने मी कर्ज घेण्याचा निर्णय स्थगित केला.’ त्या म्हणाल्या ‘बरोबर आहे. म्हणजे ती च्या भावाकडून देखील दुप्पटीपेक्षा अधिक घेणार.’ काकुनी मला विचारलं ‘मग तू घरासाठी पैसे कसे जमा केले?’

मी त्यांना सांगितले की आई – वडिलांनी मदत केली. आणि बाकी उरलेल्या रकमेसाठी मी कर्ज घेतलं. खर सांगायचं झाल तर कर्ज घेण टाळावं. म्हणजे मी तरी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा संगणक घेताना आणि माझा मोबाईल घेण्यासाठी मी प्रथम पैसे जमा केले होते. आणि नंतर वस्तू घेतली. कारण एकदा का कर्ज घेतलं की आपण बंधनात अडकून पडतो. एक तर रुपयाची वस्तू अडीच रुपयाला विकत घेतो. आणि हप्त्याच्या चिंतेपायी नवीन काही खरेदी करण्याचे टाळतो. म्हणजे सद्याला माझ अस झाल आहे की मोठी काही खरेदी म्हटलं की माझ्या डोकेदुखीचा विषय बनून जातो. त्यात माझ्या घराचे माझ्या लग्नाचा घाट घालून बसले आहेत. बहुतेक पुढच्या वर्षीच्या मे महिन्यानंतर मला एखादी मुलगी पसंत करावीच लागेल. माझी सद्याची मिळकत बघता, दोघांचा खर्च आणि कर्जाचा हप्ता सहजपणे निघेल. पण बचत नावाचा काही प्रकार घडण्याची शक्यता फारच कमी वाटते. कारण मी ‘ती’च्या बहिणीला सोडून इतर जेवढ्या मुली बघितल्या आहेत त्यांच्या बद्दल एकाच शब्द वापरावा वाटतो ‘उधळ्या’. आता मला एखादी अशी भेटली की माझ सगळ दिवाळ निघायला फार काही वेळ लागणार नाही. काकू म्हणाल्या ‘आता घर खर्च कसा भागवतो?’ काकूंना सांगितलं ‘आई आहे. पण ती खर्च फ़क़्त खाण्या पिण्यावर करते. बाकी फालतू खर्च नाहीत. उलट ती असल्याने माझा बाहेरचा जेवणाचा खर्च वाचतो.’ एकूण काय काकूंना एवढ तर कळलं की माझ सध्याला सोसो चालू आहे. माझ्या मित्राने मध्यंतरी सांगितलेला किस्सा. त्याच्या एका मित्राने दोन वर्षात पन्नास एक हजारांचा बँक ब्यालंस करून ठेवला होता. पण लग्नानंतर एका वर्षातच तो संपला. जाऊ द्या, नाही तरी खर्च कोणत्या न कोणत्या मार्गाने जाताच असतो. मध्यंतरी मी दोन बुटाचे जोड घेतले. तीन चार महिन्यांपूर्वी नवीन गैस कनेक्शन घेतले. नाही म्हणता म्हणता महिन्यात किमान पाच एक हजार रुपयांचा असा खर्च होतोच.

आता उद्या कर्जाचा हप्ता भरावा लागेल. ह्या बँक पण न काहीना काही निमित्त काढून सुट्ट्या घेतात. आणि इथ माझी गोची होऊन बसते. आता ह्यांच्या सुट्ट्या आणि माझ पेमेंट एकाच वेळेस का होत हेच कळत नाही. मागील महिन्यात सुट्ट्या नव्हत्या पण काहीतरी बँकने घोळ घातला मग पेमेंट जमा व्हायला उशीर झाला. मग काय माझ्या लहान भावाकडून उसने पैसे घ्यावे लागले. आता ताबडतोप दोन दिवसात परत केले ती वेगळी गोष्ट पण अशी वेळ नेहमी येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो. पण काही खर्चाच गणित काही बसत नाही. यावेळी सुट्ट्यांचे नवे नाटक. कर्ज काढल्यापासून हे दर महिन्याच्या सुरवातीला चिंता सुरु आहे.

Advertisements

6 thoughts on “लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

 1. Hello,
  Tumcha Lekh khup awadala…
  Ajun tumche kahi exp. astil…Like ghar ghetana ghyachi kalji,bankeche wywar te sudha share kara….

  Khara ahe …Loan ghya ani ayushyabhar feda…
  Amhihi ghar baghat hoto punyat…
  Builder lok pan asa sangatat na ki atach ghar ghya… parat rate khup wadhatil..Amhi tumhala loan deu…
  Ani wyajach wicharal tar tech ghara chya kimati awadha hota.Tyapeksh thide siwas thambun paise jamawalele parwadtat…
  Ani kharach loan ghetal tar te kayamchi dokyawar tangati talwar… sukha sukhi jagu pan shakat nahi apan,

 2. कर्ज घेउन घर घेणे ही अलिखित सक्ती आहे.

  तीस लाख जमवायला दहा वर्ष लागली तर तेव्हा घराची किमत 60 लाख असेन

 3. घरासाठी कर्ज घेवु नये हे तर खरच. आणि घर पाहिजे तर दरमहा आपण जी बचत करू ती चांगल्या प्रकारे safe invest करत गेलो तर पैसे सहज जमा होवु शकतात. आधीक स्प्ष्ट करुन सांगायचे म्हणजे – आपण कर्जाच्या हप्त्यापोटी १५ वर्षात जर अडीच पट पैसे देत असलो तर हप्ता बचतीकडे वळवुन तीच कर्जाची रक्कम ६ वर्षात आपल्या खात्यात जमा होते. ती सुद्धा तणाव रहित ६ वर्षे!

  हा माझा स्वानुभव आहे.

  आजकाल घरासाठीच काय पण वाट्टेल त्या चैनीच्या / गरजेच्या (उदा. मोबाइल, साऊंड सिस्टीम वगैरे ) गोष्टी साठी कर्ज घेण्याची अथवा ती वस्तू हप्त्याने घेण्याची प्रवृत्ती असते. व त्यात लागोलाग फायदा दिसत असला तरी एकुणात तोटाच असतो हे बर्‍याच लोकांना समजत नाही.

  रवि करंदीकर

 4. Mi pan mahatma fule karja ghetla hota pan karja gheynyat Adkunach gelo kaaran Ajentni 10000 hazar manaalaa mazekadun thode thode barech paise ghetle nanter karjache kahi kaam hoinaa Ajent nanter bolaa ki Ofiseche lok pan paise magtayet mag mala kahich suchaynaa kaay karavaa 2000 hazar sahebala dile nanter saheb mhani ki sabsedi shilak Aahey pan bizz bhandval shillak nahiye te 10000 tumalach bharave lagtin kaay karave tech kalenase zale mag Usne paise gheyun bharle mag te 2 cheque gheyun banket gelo ter manejer bolle ki tumche swatache 5000 hazar banket jamaa karave lagtin mag parat usne gheun 5000 hazar bharle mag parat bankmanejer bolle 2400 bankecha kharcha bharavalagel mi te bharle mag karja hota 100000 Ak lakh rupayache sabsedi 10000 daha hazar bizzbhandval ter te mazech 5000 mich bharlele total 27400 mazech sabsedi dharun tyani dile 55000 hazar he pahile feda mag 25000 hazar bhetin total 80000 hazaar mag he karja Ase kase sagle totyatach mag mi kahi fedle kahi fedlech nai Fedachi Aipatach Nahi rahili karan 55000 hazar magche usne paise dilyavarti mala paisech urle nai lihayla faar kahi he Ajun sagla bhastaachaar chala Teri mala karja mafi hova yevdech mhane Aahey. dhanyavaad

 5. नमस्कार,
  मी आपला त्रास समजू शकतो. आपल्या प्रतिक्रियेत आपण मोबाईल क्रमांक देखील
  दिलेला. तेवढा मी हटवला आहे. गैरवापर होऊ नये यासाठी. धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s