म्हणे मी अकौंट चेक करतो

सहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो की काय देव जाणे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. बर माझी पायलीची पन्नास अकौंट आहेत. बर तीच चेक करायला मला जमत नाही. आणि ही सांगते मी तीच चेक करत बसलो होतो.

ह्या बाईसाहेब मी कंपनीत माझ्या सुरवातीच्या दिवसापासून आहेत. आधी इंटरशिप म्हणून दोन महिने होत्या. त्यातच त्यांनी आपली लायकी दाखवली. नंतर तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा बोलावण्यात आले. बर मागील महिन्यात तीची तिच्यासारखीच असलेली मैत्रिणीला आमच्या कंपनीतील न सांगता सतत सुट्ट्या आणि चुकीच्या वर्तणुकीमुळे काढण्यात आले. आता तीला काढले म्हणून मित्र प्रेमाखातर हिने नवीन नोकरी न शोधताच इथ राजीनामा दिला. आता नोटीस पिरेड एका महिन्याचा होता. मागील महिन्याच्या २३ तारखेपासून बाई गायब. कंपनीला न सुट्टीचा इमेल न एसएमएस. अगदी लादेन प्रमाणे. आज बहुतेक माझ्या सिनिअरच्या फोनवरून धावत आली होती. आता तिने कंपनीच्या संगणकावर जीटौक आणि ब्राउझरमध्ये पासवर्ड आणि युझरनेम रिमेंबर करून ठेवलं. आता माझा सिनिअर त्या संगणकावर अनेकवेळा बसला. पण माझ्या मनात अस कधी आल नाही.

आता तीला साधं एवढपण नाही कळल कुठूनही जीमेलचा पासवर्ड बदलला तर कोणाही अकौंट बघू शकत नाही. आमच्या कंपनीने असले युनिक पीस भरले आहेत ना, काय बोलाव. संगणकातील ‘स’ कळत नाही. एखादा व्हायरस रिमूव्हचा संगणकात मेसेज आला की ह्यांना काय घडल आहे हेच कळत नाही. सगळ्या फाइल्स डेस्कटॉपवर सेव्ह करतात. एखादा चांगला गुण म्हणावा तर नाही. खर कधी बोलणार नाही. चूक झाली तर माफी मागणार नाही. हे तर खर तर माझ्या सिनिअरचे फ़िचर आहेत. सिनिअरचा विषय तर काही वेगळाच. वय सोडलं तर बाकी तो कामाच्या दृष्टीने माझा ज्युनिअरच म्हणावा लागेल. मला कधी कधी अस वाटत ही कंपनी नसून एखाद् इंस्टीट्युट आहे. आणि मी एक कंपनीतील कामगार नसून शिक्षक आहे. आणि माझा सिनिअर माझा सिनिअर नसून माझा विद्यार्थी आहे. हे कस करायचं आणि ते कस. आता हा माझा सिनिअर की मी ह्याचा. बर त्याला एकदा सांगून त्याला कळत नाही. आणि चुका केल्याशिवाय त्याच पोट भरत नाही. आणि हो दुसऱ्याच्या कामात नाक खूपसण हा त्याचा आवडता छंद. माझा बॉस कधी माझ्या कामाबद्दल मला कधी, किंवा चुकी झाली तर बोलत नाही. काम झाल की क्रेडीट घेण्यात हा पुढ. त्याला एकदा साधा फोन्ट मागितला तर दिला नाही. बाकीच तर सोडून द्या. ह्याच्याकडून मला काही शिकायला मिळेल अशी वेडी आशा करणं मी आता सोडून दिल आहे. वागण तर सोडूनच द्या.

माझ्या पाठीत चापट मारून गुड मोर्निंग करतो. बहुतेक बंगाल मधील सगळे पाठीत चापट मारूनच गुड मोर्निंग करत असावेत. मूळ मुद्धा राहूनच गेला. आता त्याने फोन करून हिला सांगितलं की मी तिचे अकौंट चेक करत असतो म्हणून. ही आली उधळत मग सकाळी. चांगलाच झापलं. मग रडका चेहरा करून मला सिनिअरने सांगितलं अस म्हटली. आता तो पुढील आठवड्यात येईल सुट्टीवरून. मग त्याचा पण नंबर आहे. काही बोलायचं, पण निदान आधी विचार करायचा. बहुतेक आधी विचार की आधी काम अस गोंधळ होत असावा त्याचा. बर ह्या बाई साहेबांना कंपनीचा संगणक म्हणजे आपल्याला बॉसने वाढदिवसाला दिलेली गिफ्ट, किंवा लग्नाला दिलेला हुंडा अस समजत होती की काय याची शंका येते. म्हणजे त्यावरची आणि त्याच्या आतील कचरा बघून वाटावा इतकी स्वच्छता. जाऊ द्या, बरच झापलं आहे. असल काही वाटेल ते बोलू नको. मग काय ठरल्याप्रमाणे रडका चेहरा करून ‘हो’. पण ‘सॉरी’ किंवा ‘माफी’ नावाची गोष्ट काही घडली नाही.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s