धावता प्रवास

सकाळी सव्वादहाची लोकल पकडून शिवाजीनगरला आलो. पण नगरच्या गाड्यांना गर्दी फार. मग काय थोड्या वेळ थांबव लागल. सव्वा अकरा वाजता एक बस मिळाली. ती नगरमध्ये पोचायला सव्वा दोन वाजता आली. पण तिथून आमच्या गावी जाणारी सव्वा दोनची गाडी ‘इलेक्शन ड्युटीला’. तीन वाजता पुढची गाडी होती. मित्रासोबत गप्पा मारताना एका जणाचा मोबाईल चोरून एक चोर पळाला. लोकांनी आणि त्याने पाठलाख केला, पण तो काही सापडला नाही. बस स्थानकातील पोलीस चौकीत नेहमीप्रमाणे गायब. तीन वाजताची बस आली, साडेतीन वाजता. बर गावात जायला पुढे एक तास. मतदान चुकू नये म्हणून आटापिटा. शेवटी मतदान झाल माझ. गावात अंदाजे नव्वदीच्या घरात यावेळी मतदान झाल. बर ह्या सगळ्या मधल्या काळात वडिलांचे दोन, लहान भावाचा एकदा, आईचा एकदा आणि मित्रांचे दोनदा फोन येऊन गेले. माझ्या मतदानाला गल्ली सेना हजर होती.

घरी येत असताना माझा एक मित्र गेल्याची बातमी माझ्या एका मित्राने सांगितली. दसऱ्याला भेटलो होतो. तो आजारी होता. पण अस काही घडल अस वाटल नव्हत. तो टी.वाय होता. त्याला रक्ताचा कर्करोग झाला होता. असो, खरंच खूप वाईट वाटले. कुठल्याच गोष्टीची ग्यारंटी नसते. काहीही घडू शकते. गल्लीत संध्याकाळी निवडणुकीचा विषय रंगलेला कोण येईल निवडून? म्हणजे तसं नगरला होतो त्याच वेळी मला दोन जण विचारात होते की ‘तुला काय वाटत की कोण येईल ह्यावेळी?’ त्यांना दोघांनाही सांगितलं म्हटलं ‘मी तर काही इथ नसतो, उलट तुम्ही इथे असतात. मग तुम्हीच मला सांगायला हव’. गल्लीतील माझे मित्र मतदानाला गेले एकत्र आणि आले वेगवेगळ्या पक्षाला मतदान करून. संध्याकाळी गप्पात एकएकाने कोण येईल असे आपापली मते मांडली. एवढाच काय तर ह्यावेळी आमच्या घरातील सगळ्यांनी वेगवेगळ्या पक्षांना मतदान केले. राहुरी मतदारसंघात यावेळी फार काही वेगळा निकाल लागणार नाही. पण कोणीच छातीठोक पणे सांगू शकत नाही की कोण येईल.

अरे हो यावेळी आमच्या गल्लीतील दोन जण मतदानाला आलेच नाहीत. तेरा मतदारांनी पैसे घेऊन मतदान केले. अडीचशे रुपये एका मतासाठी असा भाव होता तिथे. आणि काल म्हटल्याप्रमाणे माझे नगराचे मित्र आणि त्यांचे घरचे मिळून अठरापैकी दहा जणांनी मतदान केले. रात्रीच्या दहाच्या ‘राहुरी मुंबई’ गाडीने रात्री अडीच वाजता चिंचवडला उतरलो. घरात पोचायला तीन वाजले. एकूणच हा धावता प्रवास छान झाला.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s