शब्दांच्या कोलांट्या उड्या

संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय?. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल? पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का?’ तर त्यावर ती म्हणाली ‘मी फटाके फोडते आणि पतंग उडवते’. यावर सगळेच हसू लागले. पण या वाक्यावरून तीने माझी उडवली होती. पण छान कोटी केली होती.

मध्यंतरी वर्तमानपत्रात ‘एक निधनाची’ बातमी आली होती. बातमीच्या सुरवातीला ‘… यांचे दुखद निधन झाले’. आता अशा बातम्या नेहमी येतात. पण मला सांगा निधन हे नेहमी दुखद असते. अस कधी होत नाही की निधन झाल्यावर सगळ्यांनी आनंदात फटाके उडवले…फोडले. मग जर निधन दुखदच असते तर हे महान पत्रकार लोक ‘दुखद निधन’ असा शब्द प्रयोग का वापरतात कुणास ठाऊक? बर ते सोडा, विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यात अनेक मोठे मोठे नेते भाषणाला आले होते. त्यात काहींनी आपल्या प्रचाराच्या पत्रकात ‘जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या दलित समाजाच्या नेतृत्वाला भरगोस मतांनी विजयी करा’. आता मला सांगा दलित हा एका विशिष्ट समाज आहे ना. बर जर तुम्ही हा दलित, हा मराठा – ब्राम्हण करणार आणि दुसऱ्यांना जातीयवादी म्हणणार. आता इथे देखील जातीयवादी शब्द चुकीचाच वाटतो ना?

मी लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या पुण्यातील मावशीकडे आलो होतो. संध्याकाळच्या वेळी मी आणि माझा मावस भाऊ तीच्या घराच्या गच्चीतून, उडणारे पतंग बघत होतो. एक पतंग खूपच छान वाटला म्हणून त्याला म्हटले ‘तो बघ पतंग किती मस्त आहे न?’ त्यावर तो म्हटला ‘हो, ती पतंग खरच खूप सुंदर आहे’. आता पुणेकरच तो, मराठी व्याकरण फारच शुद्ध असणारच. व्याकरणात ‘तो पतंग’ नव्हे ‘ती पतंग’ असते हे तेव्हा समजले. संगणकाच्या कोर्सच्या पहिल्या दिवशी आमच्या मेडम आम्हाला काही वाक्य पूर्ण झाल की ‘इझंट इट’ अस म्हणायच्या. आता त्यांची ती बोलताना म्हणायची सवय. बर त्यावेळी आमच्या सगळ्या मित्रांची इंग्लिश फारच सुमार. त्यावेळी आम्ही ‘इझंट इट’ मधील ‘इट’ अर्थ ‘इएटी’ म्हणजे खाणे असा घ्यायचो. मग पहिलाच तास म्हणजे मेडमची ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ झाली.

आता पुण्यातली सवय झाली म्हणून काही वाटत नाही. पण सुरवातीला माझा काका बोलताना त्याला आपण जस कोणाच ऐकताना मान हलवून आणि ‘बरोबर आहे’ अस म्हणून प्रतिसाद द्यायची सवय असते ना तसं बहुतेक सगळ्याच पुणेकरांना कोणाला प्रतिसाद देताना ‘हो का’ अस म्हणायची सवय असते. आता सुरवातीच्या काळात मी त्याच्या ‘हो का’ चा अर्थ ‘हो, का?’ असा घ्यायचो आणि त्याने हो का अस म्हटलं की बोलणाऱ्या विषयाची कारण द्यायचो. मी नववीत असताना प्रथम सत्रांत परीक्षेत माझ्या एका मित्राने हिंदी विषयाच्या परीक्षेत ‘खेल के मैदान पर एक घंटा’ ह्या निबंधाची सुरवात ‘मेरे खेल के मैदान पर एक बहुत बडी घंटा है | बजने के बाद पुरे गाव मे सुनी देती है |’ अशी केली होती. काहीही म्हणा पण शब्दांच्या अदला बदलाने वाक्याचा आणि एकूणच विषयाचा रंगच बदलतो. कलमाडी भाई’नी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत विलासरावांचा उल्लेख ‘आपले लाडके मुख्यमंत्री’ असा केला होता. आता या शब्दांच्या कोलांट्या उड्याने महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोठा बदल आणला आहे. ते नाही का, धरावे या शब्दच ‘मारावे’ केल होत. तेव्हा चुगल्या खोरांना किंवा अफरातफरी करणाऱ्याला ‘ध चा मा करणारे’ म्हणून म्हणच पडून गेली.

Advertisements

One thought on “शब्दांच्या कोलांट्या उड्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s