हिंदी राष्ट्रभाषा नाही

आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन‘ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच अभ्यासपूर्ण लेख असतात. कधी वेळ मिळाला तर नक्की वाचा. हिंदी भाषा ह्या बद्दल आपल्या देशाच्या संविधानात ‘राष्ट्रभाषा’ नव्हे तर कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली आहे. आता संविधान देखील इंग्लिश मध्ये लिहिले आहे. आणि त्यात १७ वा भाग आणि अनुच्छेद ३४३ व ३५१ मध्ये ‘The Official Language of the Union shall be Hindi in Deonagari Script.’ म्हणजे ‘संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल’ अस स्पष्टपणे लिहील आहे. राजभाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आणि अर्थही वेगवेगळा.

मला हिंदी भाषेविषयी अनादर नाही. परप्रांतीय लोकांविरुद्ध आहे. आणि त्याची कारण त्यांनीच निर्माण केलेली आहेत. आज तो विषय नको. उगाचच माझा दोस्त मला नवीन नवीन नामकरण विधी करेल. तसं मला त्याचा आणि त्याचे मुद्दे या दोघांबद्दल काहीच वाटत नाही. कारण कोणीही मराठी असाच विचार करत असतो. मी देखील आधी असाच विचार करत होतो. सोडा तो विषय. डॉ. वि. भि. कोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी ज्या अर्थाने आणि ज्या अभ्यासाने हे मांडलं आहे त्यावरून विश्वास न ठेवण्या इतपत मी मूर्ख नाही. हिंदी हि एक चांगली भाषा आहे. ती राजभाषा असून देखील आमचे पंतप्रधानच काय पण आमचे भूतपूर्व राष्ट्रपती त्यात भाषण ठोकत नाहीत. मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आपले केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम साहेब पुण्यात आले होते. त्यांनीही भाषण इंग्लिशमध्ये केले. नाही तरी हिंदी भाषिक लोकांचे इंग्लिश प्रेम सर्वश्रुत आहेच.

जाऊ द्या तात्पर्य हिंदी एक संपर्क भाषा आहे. राष्ट्राने ती भाषा आपल्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी म्हणून स्वीकारली आहे. पण आमचे सगळे प्रशासकीय कागदपत्र इंग्लिशमध्ये का असतात कुणास ठाऊक. एवढंच काय पण मुंबईत ज्या राजीव गांधी की स्वातंत्रवीर सावरकर असा वाद घडला तो पूल देखील ‘सी लिंक’ अस नामकरण केल गेल. अस का ते अजूनही समजत नाही. त्यालाच जर ‘समुद्र सेतू’ एवढ सोप साध नाव का नाही कुणास ठाऊक. माझा सिनिअर पश्चीम बंगालला ‘वेष्ट बेंगॉल’ अस म्हणतो. कोलकात्याला क्यालाकाटा अस म्हणतो. अस का तेच काळात नाही.

Advertisements

2 thoughts on “हिंदी राष्ट्रभाषा नाही

  1. Dear sir excellent and free talk.May i know that if presiendent and prime minister not knowing Hindi then is it correct.Why it is only applicable to Marathi people.Let other people go to Tamil Naidu and force ””””””’ sea and watch.Let me say because of hindi movie my marathi is down and we all responsible for .If i am in Maharashtra then i must speak Marathi that does not mean i hate others

  2. आपण च जबाबदार आहोत या सार्‍या गोष्टीला. मराठी बाबत आता राजकारण होत आहे. त्यानं आणखिन च नुकसान होईल. विद्यापीठाची कोण्तीहि पदवी १प्रबंध मराठीत सादर केल्याशिवाय आणि त्याविषयी १ तासाचे जाहिर भाषण केल्याशिवाय देता कामा नये.असे केले तरच दिवस चांगले येतील .अशा पदवीधारकाना महाराष्ट्र शासनाच्या सर्व खात्यात विशेष वेतन वाढीसह वेग्वेगळ्या स्तरावर -पदावर- प्रवेश दिला पाहिजे. बरेच काही साध्य हओऊ शकेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s