माझा राग

शनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार उठून उभा राहिला. त्यावेळी माझा राग आणखीन अनावर झाला होता. तो काही तरी बोलला पण मला काही न समजल्याने मी त्याला रागात ‘काय?’ अस विचारलं. त्याच तोंड बघण्यासारखे होते. गपचूप उभा होता. याआधी कधीच मी कोणाशी हातापायी केलेली नाही. पण यावेळी झाली.

शिवाजीनगरला लोकलची वाट पाहत असताना आमच्या बाजूला एक मुलगी आणि तिचा मोठा भाऊ असेल बहुतेक. ती मुलगी खेड्यातली होती. म्हणजे दिसायला छान होती. पण कपड्यावरून सांगतो आहे. लोकलला गर्दी पाहून तीची गाळण उडाली होती.  तिला बघून आमच्या गावाची आठवण झाली. लोकलमध्ये आल्यावर तिला मुद्दामहून नाही पण मुलांचे धक्के बसत होते. आणि त्याच्यामुळे तिला काय कराव आणि काय नाही अस झाल होत. आणि मुलांना काय तेच हव असत. तिचा तो भाऊ कुठे गायब झाला होता कुणास ठाऊक. ते बघून आणखीनच माझ डोक फिरत होत. काय करणार तो मुलगा तिला मुद्दामहून नव्हता करत. पण त्याला त्यात मजा वाटत होती. दापोडीला थोडी गर्दी कमी झाली. आई जिथ उभी होती तिच्या बाजूला थोडी जागा होती. वाटल होत तिथ जाव पण तिला जागा करून दिली. आणि मी तिच्या मागे असा उभा राहिलो की कोणी तिला धक्का लावू नये. मग काय कोणी अंगावर आले की त्याला मी तेवढ्याच ताकदीने मागे रेटायचो. मुंबईच्या लोकलचे अनुभव आहेत ना त्याचा फायदा. एकाला आतमध्ये जायला जागा दिली तर तो सुद्धा तसलेच चाळे करायला लागला. बघून खूपच सज्जन वाटत होता. नाही तरी स्वताला चांगले दाखवणारेच असले मुलींच्या अंगाला अधिक स्पर्श मिळावा यासाठी झगडत असतात. वाटल होत त्याच्या कानाखाली द्यावी. पण रागावर कसा बसा ताबा ठेवला.

रविवारी माझ्या रेशनकार्डच्या चौकशीसाठी अकराच्या सुमारास गेलो. तिथल्या एका मेडमला माझ्याकडील पावती दाखवून विचारलं ‘रेशनकार्ड झाल का ते एकदा बघता का?’ तीच उत्तर ‘बाहेर बोर्डावर यादी लावली आहे. तिथ जाऊन नाव बघा’. आता हे मी मागील सात महिन्यापासून हेच करत आलेलो आहे. तीच ते उत्तर एकूण पित्त पुन्हा खवळलं. तरी देखील मी तिला पुन्हा नम्रपणे विचारलं ‘नाव नसेल तर?’. तीच पुन्हा उत्तर ‘पुढच्या मंगळवारी या’. तिला म्हंटल ‘म्हणजे अजून काही अर्ज करायचे असतील तर सांगा’. तिने एकूण न ऐकल्यासारखे केले. माझ्या मागच्यांना सुद्धा हीच उत्तर ती देत होती. ते म्हणतात ना ‘नॉन कोओपरेटीव नेचर’. कोणाशीच तिथल्या कर्मचार्यांचं नीट वागण नव्हत. जणू माहिती देत आहेत म्हणजे उपकारच करत आहे. कोणाचाच काम होत नव्हत. अस दहा एक मिनिट बघितलं. आणि पित्त खवळलं. तिला मग रागात विचारलं ‘सात महिन्यांपासून हेच करतो आहे. मला रेशनकार्ड कधी मिळणार ते सांगा’. ती माझ्यापेक्षा मोठ्या आवाजात ‘मग मी काय करू त्याला?. अजून अर्ज नाही आहे तुमचा. जेव्हा सापडेल त्यावेळी आमच्या मुख्य मेडमच्या सही झाल्यावर मिळेल.’ त्यांना म्हटलं ‘रेशनकार्डमुळे सगळंच अडून बसलंय, मला कंपनीत घराचा प्रुफ म्हणून रेशन कार्ड हव आहे. रेशन कार्ड नाही म्हणून भारत ग्यास मिळत नाही आहे. फोन घ्यायला बीएसएनएल वाले रेशनकार्ड मागतात.’ परत तिने एकूण न ऐकल्यासारखे केले. आता माझा राग अनावर झाला. मग काय सगळ्यांसमोर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना धमकी वजा राग दाखवला. खूप काय काय ते बोललो. त्यांना म्हटलं ‘मला जॉबला अडचण झाली तर तुम्हा सगळ्यांना अडचण करेल. इथ बरंच फर्निचर आणि कागद आहेत जाळायला’. शिवीगाळ केली नाही. मी चीडलेलो पाहून रेशनकार्डसाठी आलेले इतरही चिडले.

एक म्हातारा म्हणाला की ‘मी माझ आजचे कामाचे शंभर रुपये सोडून आलो आहे. तरी येऊन काय फायदा नाही’.  एक जण तर मागील दोन वर्षापासून रेशनकार्ड असून त्यावर रेशन का मिळत नाही म्हणून चकरा मारतो आहे. एक आजोबा रोज त्या सिनिअर मेडमची सहीसाठी सकाळी साडे दहा ते दुपारी दीड पर्यंत बसून असतात. एक आपल्या मुलाच्या नावावर वेगळे रेशन कार्ड काढण्यासाठी चकरा मारतो आहे. अजूनही बरेच बघितले. पण सगळ्यांना उडवा उडवीची उत्तरे. मी चिडलो तर लगेचच माझा अर्ज त्यांनी काढला. मी गोडीत विचारले तेव्हा मला मंगळवारी या अस म्हटले. चिडल्यावर फार लाडीगोडी लावायला लागले. मला म्हणाले फ़क़्त सिनिअर मेडमची सही बाकी आहे. ती मेडम कुठ आहे अस विचारल्यावर. माहित नाही अस उत्तर. तिचा मोबाईल ते द्यायला तयार नव्हते. थोडा आणखीन दम भरल्यावर त्यांनी तिला फोन लावला. पण ती फोन उचलायला तयार नाही. जेवण कराव म्हणून मी निघालो तर एका कर्मचारीने तिचा स्वतःचा मोबाईल नंबर दिला आणि मी सही घेऊन ठेवते अस म्हणाली. दोनच्या आसपास तिथून निघून घरी आलो. चार वाजता फोन केला तर त्या मेडम ने माझ्या अर्जावर ‘लाईट बिल दाखवणे’ असा शेरा मारला अस समजले. मी त्या निगडीच्या रेशन कार्ड च्या ऑफिस मध्ये पोहचतो तेवढ्या वेळात ती सिनिअर मेडम परत गुल. असो राग अजून शांत झालेला नाही आहे. घराचे साठेखत जोडून देखील तिला आता लाईट बिल हव आहे अस म्हणती आहे. आणि लाईट बिल असत तर मला रेशनकार्डसाठी एवढा आता पिटा करायची गरज काय होती? तिला आता २९ ला समजेलच मी काय चीज आजे ते. पुढच्या रविवारी मी गावाकडे जाणार आहे. पण त्याच्या पुढच्या रविवारी जर मला ते नडले तर विधानसभेत जे घडले ते मी रेशनकार्डच्या ऑफिसमध्ये करेल. आणि हो मुख्य सांगायचं राहूनच गेल निगडीच्या रेशनकार्ड ऑफिस मधून दोन महिन्यापूर्वी ‘विलासराव देशमुखांचं’  बोगस रेशन कार्ड बनल होत.

Advertisements

2 thoughts on “माझा राग

  1. खरं आहे हे. पण आश्चर्य वाटले, सरकारी कारकुन तुमच आवसान पाहुन कामाला तयार झाले ते. एरवी ते कुणाच्याही कसल्याही धमक्यांना जुमानत नाही ते. आणि विधानसभेसारखं काही करु नका, तेल गेलं तुप गेलं, हाती आलं धोपटण असं नको व्हायला. त्यापेक्षा माहिती अधिकाराचा वापर करा. हा.. थोडा वेळ लागेल पण उपाय रामबाण आहे.

    आणि लोकलबद्दल बोलायचं झालं तर, महिलांनी लेडिज डब्यातुनच प्रवास करावा. बरोबर जेन्ट्स असला तरी गर्दी पाहुन वेग-वेगळा प्रवास करावा. नविन जरी असल्या तरी सहप्रवासी महिला कुठे कसे उतरायचं याची मदत करु शकतात. मुंबईत नाही का, महिला चुकुनही जनरल मधे चढत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s