आवडता आणि नावडता

एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ‘मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम कर’ म्हटले की तो काही न बोलता निमुटपणे करी. आवडता सेवक कायम मालकाच्या कामाचा हेतू काय, ते कशासाठी करायचं? याची विचारणा करी. नावडता कारण न विचारता काम करी. न येणाऱ्या कामात नावडता लक्ष घालत नसे. मालकाला ‘मला जमणार नाही’ अस स्पष्ट सांगे. आवडता कायम काम नाही येत असेल तरी ‘मी करतो’ असे छातीठोकपणे मालकासमोर सांगे. आणि नाही जमले की, नावडत्याच्या मागे लागे. काम नावडत्याने केले तरी ‘मी केले’  अस मालकाला सांगे. त्यामुळे मालक त्या आवडत्या सेवकाची वाहवा करे.

खर तर याच गोष्टींमुळे तो आवडता सेवक बनला होता. पुढे पुढे अस व्हायला लागल की आवडता स्वतःची काम सोडून नावडत्याच्या कामात नाक खुपसू लागला. नावडता कधीच उलट सुलट बोलण्याची सवय नसल्याने तो निमुटपणे आवडत्याचे एकूण घेई. त्याला ते पटत नसायचे. या सवयीमुळे आवडता आणखीनच मालकाचा आवडता बनत गेला, आणि नावडता आणखीनच नावडता. नावडता काम वेळच्या वेळी काम करून देखील कधीच मालकाचा आवडता बनला नाही. कधी कधी मालकाला एखादे काम रात्री अपरात्री करून हवे असे, किंवा सुट्टीच्या दिवशी हवे असे. त्यावेळी आवडता गोड गोड बोलून काम नावडत्याच्या गळ्यात मारे. मालक म्हणतो आहे म्हणून कधीही नावडता रात्र आणि सुट्टी बघत नसे. पण नेहमीच झाल्याने मालकाला त्या केलेल्या कामाचे कधीच काही वाटत नसे. हळू हळू मालक कोणत्याही कामाची विचारणा करायची ठरल्यास ती नावडत्याला न विचारता डायरेक्ट आवडत्याला विचारायला सुरवात केली. नावडता नाराज होत गेला. पण त्याची कुणकुण कोणालाच लागली नाही. मालकाची भूमिका आवडता करायला लागला. नावडता कायम विचार करायचा की, मालकासाठी आम्ही दोघे सेवक असून देखील मालक असा भेदभाव का करतो आहे. पण त्याने कधी सुरवातीपासून असा कधीच विचार केला नाही. नावडता कधीही सुट्टी घेत नसायचा. त्या उलट आवडता. खूप सुट्ट्या घ्यायचा. पण अस असून देखील मालकाचा आवडता कायम आवडता आवडताच राहिला.

नावडता या सगळ्या गोष्टींना कंटाळून नवीन नोकरीची शोधाशोध करू लागला. आणि त्याला एका मोठ्या कंपनीने या कंपनीने देत असलेल्या पगाराच्यापेक्षा अधिक पगार देण्याची ऑफर दिली. नावडत्याने मालकाला सेवक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मालक थोडा दुखी झाला. पण त्या उलट आवडता आणखीन आनंदी झाला. कारण आता तो नवीन येणाऱ्या सेवकाचा हेड सेवक असणार आहे. काम करून देखील नावडता कायम नावडताच राहिला. अस का? याचा पूर्ण विचार केल्यावर त्याला त्याच्या चुका कळल्या. काम कारण जेवढ महत्वाच आहे तेवढंच ते आपण केल आहे हे देखील दाखवण. नाही तर मालकाचे असे अनेक आवडते असतात. अशा प्रकारे ‘आवडता आणि नावडता’ या दोघांची कहाणी संपूर्ण.

Advertisements

10 thoughts on “आवडता आणि नावडता

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s