थंडी

रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात थंडीत व्यायाम केलेला शरीराला अधिक पोषक असतो. आणि थंडीच्या वातावरणामुळे व्यायामसुद्धा अधिक होतो. गावी असताना थंडीत गल्लीत शेकोटी असायची. तिच्या बाजूला बसून शेकायला खूप मजा यायची. थंडीचा आणि उबेचा अनुभव एकाच वेळी यायचा. मजा यायची.

असो आत्ता सुद्धा करता येईल पण सकाळी लवकर उठण होण मुश्कील आणि  संध्याकाळी मोकळा वेळ मिळत नाही. पण पुण्यात थंडीची जाणीव होते हे नक्की. मुंबईला सगळे ऋतू सारखेच. म्हणून तर राष्ट्रपतीबाई तीन दिवसासाठी पुण्याला आलेल्या आहेत. थंडीची मजा काही वेगळीच. अंगात बर्फ टाकला की काय शंका येते. किंवा चारही बाजूंनी एसी चालू आहे अस वाटत. आत्तासुद्धा घरात आईने पंखा लावला आहे. सकाळी माझ्या बॉसला एसी आणि रात्री आईला पंखा हवा असतो. असो ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. त्यामुळे मला सगळे महिने थंडीचे असतात. आणि त्यामुळेच कधी कधी सक्तीचे भारनियमन देखील सुखकारक वाटत. कारण निदान त्यावेळेत पंखा आणि एसी बंद असतो. पण सध्याला थंडी एवढी पण नाहीये. शाळेत असताना थंडीच्या दिवसात केसाला लावायला तेल बघितले की घट्ट झालेले. बोट आखडून जायची. करंगळी उरलेल्या बोटांना चिकटत नसायची. पेन देखील अशा वेळी बंद पडायचा. लिहिण देखील अवघड बनून जायचं. खर तर आत्तासुद्धा खूप थंडी वाजत आहे. आपण नंतर बोलू.

Advertisements

2 thoughts on “थंडी

  1. थंडी जाणवली, उगाच शेकोटी आणि काय काय छान वर्णन केले. मस्कत ला थंडी सुरु होतेय पण शेतातल्या शेकोटी करता आपला मायदेश आठवून दिलात. एन्जोय करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s