मन कल्लोळ

काय कराव. इथ एवढी काम पडली आहेत. आणि माझ मन कुठेही कधीही भटकते. काल परवापर्यंत तिच्या लहान बहिणीबद्दल कधी विचार येत नव्हता. आज तीच लग्नाबद्दल विचार ऐकले. वा! काही सेकंदासाठी मी स्वप्न पाहतो आहे की काय असं वाटत होत. कोणीही माझ्याशी थोड जरी गोड बोललं की मी पार पाघळून जातो अस मला वाटत आहे. ती जे काही सांगत होती. सगळ माझ्या मनातल. मग आज डोक आणखीनच जड झाल. बर हेच दोन दिवसापर्यंत आमच्या कंपनीत नवीन आलेल्या एका मुलीबद्दल वाटत होत. आणि आज तिच्या लहान बहिणीबद्दल. तीन महिने आधी तीच लग्न झाल म्हणून मी दुखी झालो होतो. जगण्यात काही अर्थच नाही अस वाटायला लागल होत.

म्हणजे अस व्हाव की आपण वेळेत लोकलसाठी जाव. तरी सुद्धा लोकल आपल्या समोर निघून जावी. आणि लोकल चुकली म्हणून आपण दिवसभर का चुकली याचा विचार करत बसावं. तीच लग्न झाल आहे अस अजूनही खर वाटत नाही. पण कधी ‘ती’ तिच्या लहान बहिणीत वाटते. तर कधी ‘ती’ आमच्या कंपनीत आलेल्या नवीन माझ्या मैत्रीणीत वाटते. यार हे मन ना खूपच गोंधळी आहे. सेकंदा सेकंदाला बदलत राहते. काम करत असताना किंवा कोणाशी काही बोलत असताना मधेच हे विचार यायला सुरवात होते. आज देखील असाच. दुपारी मित्राबरोबर शनिवारवाड्यात जाव म्हणून शनिवारच्या आवारात येत होतो तर एक खूपच छान मुलगी फोनवर ‘तू कुठे आहेस?’ अस विचारात होती. मी तिला बघून तिच्यावरून नजर हटवावी अशी इच्छा होत नव्हती. थोड्या वेळाने बघितलं ती कोणत्या मुलाशी वाद घालत होती. तो तिला म्हणत होता ‘मला वेळ नाही आहे. मला खूप काम असत’.

ते बघून वाटल ‘बिचारी, एवढी छान असून देखील अस. वाटल की त्या गाढवाच्या कानाखाली आवाज काढावा’. पण काही म्हणा तो नशीबवान आहे. आणि खर तर त्याचं दोघांचा वाद बघून मलाच वाईट वाटत होत. ज्यांना प्रेम मिळत त्यांना त्याची कदर नसते. आणि ज्यांना हव असत त्यांना मात्र देव असा गोंधळ घालतो. देवाची पण काय चूक म्हणा. हे मन कुठेही कधीही काहीही विचार करत. पण आज या मनानी माझा पुरता फालुदा केला आहे. काय सुचतच नाही आहे. कधी वाटत आई वडील जी पाहतील तिच्याशी आणि तिचाच विचार यावा. कधी वाटत ती मिळाली असती तर. कधी तिच्या लहान बहिणीबद्दल आकर्षण वाटायला लागत. तर कधी आमच्या कंपनीतील माझी मैत्रीण. काय कराव पुरता गोंधळ. बर यातली कोणतीच माझी होईल किंवा तिला काही माझ्याबद्दल वाटत याचीही खात्री नाही. बहिणाबाईंचा एक अभंग आहे ना ‘मन वढाय वढाय’. अगदी खर आहे.

Advertisements

3 thoughts on “मन कल्लोळ

  1. kark rashichi lok chanchal asali tari khari asatat!!!!!!!!!!!mi swataha n maze kahi mitra kark rashiche aahet…..tyamule chagalech mahitiye ki kark raas kashi aahe te!!!!!!!
    aani kark rashichya lokanche vichar secandala badalat asatat………pan ekhadya nirnayawar thaam zale ki zale mag konich te mat badalu shakat nahi!!!!!!!he nakki!!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s