प्रजासत्ताक दिन नवीन काय?

नेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको? अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ‘हक्काची सुट्टी’ म्हणून पाळतो.  आणि मुळात आपला देश प्रजासत्ताक कधी होता? म्हणजे मला तरी वाटत नाही.  Continue reading

Advertisements

विचार का करायचा?

या वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे. Continue reading

स्वार्थी

काही खर नसत. आज जे आहे आणि जस वाटत ते कधी बदलेल याचा नेम नाही. नवीन कंपनीचे काम आणि येथील लोक फारच वेगळे आहेत. त्यांना ‘ब्लेमगेम’ मधेच आनंद असतो. पण एका अर्थाने ते बर आहे. निदान आशा अपेक्षा वाटत नाहीत. काही या कंपनीत जॉईन होऊन अजून महिना झाला नाही. माझ्या जुन्या कंपनीतील माझे मित्र मैत्रीण असे वागत आहेत की जणू काही मी कंपनी सोडून काही शतक उलटली आहेत.

Continue reading