लग्न पहावे ठरवून

माझ्या आई वडिलांचे माझ्या लग्नासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. पण अजून काही त्यांना यश आलेल नाही. आता माझा काही त्यांच्या या मोहिमेला विरोध वगैरे नाही आहे. मध्यंतरी वडिलांना ‘आपण माझ्या लग्नाच दोन वर्षांनी बघितलं तर चालेल का?’ अस विचारलं होत. त्यांना पटेल अशी कारण देखील सांगितली होती. पण ते नाही म्हणाले. मागील दोन महिन्यात अनेक स्थळ त्यांना मिळाली. पहिल्या स्थळात सत्तावीस गुण येत होते. पण आमच्या दोघांची ग्रहमैत्री होत नव्हती. मग त्यामुळे ते आई वडिलांनी ते स्थळ नको म्हणाले. दुसऱ्या स्थळात बावीस गुण जमले. आणि आई वडिलांना ते स्थळ पटले देखील. रीतसर पाहण्याचा कार्यक्रम देखील झाला.

ती खरच खूप छान होती. तिच्याशी मी मन मोकळेपणाने बोललो. असो, आम्हाला दोघांचा होकार होता. पण त्यांनी कुठे तरी पत्रिका बघितली. आणि म्हातारपणी आम्हाला दोघांना त्रास होईल अस त्या ज्योतिषबुवांनी सांगितलं. मग त्यामुळे त्याच आधी हो आणि नंतर नाही झाल. आणि कालच आणखीन स्थळ आल होत. छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळत होते. पण त्यांच्या घरच्यांना आमच्या दोघातील अंतर फारच कमी वाटले. ती माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान आहे. असो, याआधी अनेक स्थळ आली. पण अनेकांची पत्रिका जुळत नव्हती. ते दुसरे स्थळाच नाही झाल्यावर मी थोडा नाराज झालो होतो. पण माझ्या बहिणाबाईनी मला समजावल. ठरवून ‘लग्न’ प्रकार मला काही फार आवडतो अस नाही. पण त्यांची यात कुठेही जबरदस्ती वगैरे नाही आहे. माझा निर्णय अंतिम आहे. दुसरी गोष्ट अशी की मला खूप मुली आवडल्या. पण त्यातील एकालाही मी आवडलो नाही. तशी कोणी भेटली तर नक्की आई वडिलांना तिची भेट घालून देईल. आणि खर सांगायचं झाल तर

आजकाल प्रत्येक मुलगी छान वाटत आहे. त्या मुली खरच छान आहेत का मी वेडा झालो आहे हेच कळत नाही आहे. सकाळी मी कंपनीही बस पकडण्यासाठी जिथे उभा राहतो. तिथे त्याच थांब्यावर एक छानशी मुलगी येते. पण माझी काय तिच्याशी बोलण्याची हिम्मत होत नाही. असो, आता मी मुळात मुलींकडे बघायचं पण टाळतो. मागील कंपनीच्या माझ्या मैत्रिणीचा इतका भला मोठा अनुभव पाठीशी असताना मी ते धाडस करू शकत नाही. तस म्हटलं तर काल सकाळी मी असल्या छान मुलीला बघितले. तस मी तिला आमच्या ‘क्लायंट कम्युनिकेशन स्कील’ च्या सेशनमध्ये भेटलो होतो. खुपच छान आहे. कालचा दिवस त्यामुळे खूप छान गेला. दिवसभर टवटवीत वाटल. ती त्यादिवशीही माझ्याशी बोलण्याच्या मूडमध्ये होती आणि कालही माझ्याकडे बघत होती. ती छान आहे. त्या क्लायंट कम्युनिकेशन स्कीलच्या क्लासमध्ये सुरवातीलाच आम्हाला त्या ट्रेनरने कोणत्याही तीन अनोळखी व्यक्तींशी ओळख करून या. अस सांगितलं. माझी तिसरी व्यक्ती ती होती. असो, इथेच तीच पुराण थांबवतो. बोलू तीच्या विषयी नंतर कधी तरी..

Advertisements

9 thoughts on “लग्न पहावे ठरवून

 1. अस वाटतंय माझा मन माझ्याशी बोलताय..
  तंतोतंत..

  घराचे मुलाच्या मागे लग्नासाठी लागणे हा हल्ली common प्रकार झालाय..
  जो पूर्वी मुलींच्या बाबतीत व्हायचा..आणि मुलींकडून नकार मिळणे हि न पचणारी
  तरीही वास्तव गोष्ट घडतेय… पूर्वी याच्या उलट घडायचं नाही का?

  मनातील कल्लोळ सुंदरपणे सदर केला आहे..

 2. नमस्कार हेमंत आठल्ये साहेब मराठी बाणा आणि मित्रांना नाही थारा काय तुमच्या जीवनात एवढ्या गमती जमती होतात हे आम्हाला आताच कळतंय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s