प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वेबसाईटवर जात होतो. त्यांच्या लेखांवर मी माझी प्रतिक्रिया पाठवायचो. पण मोजून दोन तीन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या. ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ताचे’ ही हेच. लोकसत्ताच संपादक नेहमी नवीन नवीन अग्रलेखात ‘चमत्कार’ घडत असतात. सुरवातीला मी ताबडतोप प्रतिक्रिया पाठवायचो पण ते प्रतिक्रिया प्रकाशितच करत नाहीत.

मी मुंबईला असताना रोज कंपनीत सकाळी सकाळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘मुंबई मिरर’, ‘डी एन ए’ वाचायचो. त्यावेळी राज ठाकरेंनी परप्रांतिय लोकांविरुद्ध आंदोलन छेडले होते. मी मुंबईत होतो. मुंबईत होणाऱ्या घटना डोळ्याने पाहत होतो. पण या वर्तमानपत्रात अनेक न घडलेल्या गोष्टी देखील असायच्या. त्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये तर जणू काही रोज परप्रांतीयांची मुंबईत कत्तल होते आहे अशा बातम्या. कधी कधी वाटायचं हे मुद्दामहून करतात का? ते खरच त्यावेळी पटायचं नाही. ते मनाला वाटेल तस जणू काही इथ मराठी माणूस एखादा राक्षस आहे आणि ते परप्रांतिय त्याच्या ताब्यात सापडलेली नाजुकशी राजकन्या. आणि मराठी राक्षस तिला छळत आहे, अस वर्णन. आणि अजूनही ते तसच लिहितात. असो, प्रत्येकाची इच्छा. माझ्या प्रतिक्रिया मला मांडता याव्यात. म्हणून मी हा ब्लॉग बनवला.

आता मी काही देव वगैरे नाही. त्यामुळे माझ्या सगळ्याच गोष्टी अचूक आणि बरोबर असतील असही नाही. मी तरी अस मानतो की प्रत्येकाच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. माझ्या नोंदीवर प्रतिक्रिया येणे हे माझ भाग्य आहे. आणि मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य आहेत. कुठे तरी मी वाचल होत की ‘चुकीची मत प्रकाशित करणार नाही’. आता ‘चूक’ आणि ‘बरोबर’ या दोन्हीही गोष्टी प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असू शकते. आणि विचार वेगळे असण यात काहीच गैर नाही आहे.  म्हणजे ते जेवताना आवडीची भाजी आणि न आवडणारी भाजी अस आहे. काहींना एखादी भाजी खूप आवडते तर काहींना तिचा वास देखील आवडत नाही. मुळात भाजी आवडणार किंवा नाही हे त्या त्या माणसावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजी चांगली किंवा वाईट यात विभागली जाऊ शकत नाही. तसाच प्रतिक्रियेच आहे. तिला चूक किंवा बरोबर यात विभागात येणार नाही. पण खूप छान वाटत माझ्या मतावर कोणी तरी विचार केला. प्रतिक्रिया येण म्हणजे कोणी तरी भेटून गेल्यासारख वाटत. मी मुळात माझ्या नोंदीवर आलेल्या प्रतिक्रियेला आणखीन प्रतिक्रिया देण् टाळतो. कारण एक तर मला ती प्रतिक्रिया मान्य असते आणि दुसर म्हणजे मी पानाचा वरच्या भागात मला जे बोलायचं आहे ते आधीच बोलून टाकले असते आणि परत तेच प्रत्येकाला सारख सारख का उगाळायच? मग ते चर्चेपेक्षा अधिक वाद होण्यासारखेच वाटते.

Advertisements

8 thoughts on “प्रतिक्रिया

 1. प्रतिक्रिया मन्झे काय कही पण फालतू लिहिता काय मेडिअला नावठेवता तुम्ही काय करता?अणि मन्हे प्रतिक्रिया 😦
  नाही तर ब्लॉग बंद करा ……………….
  तुमचा हितचिन्तक …………….असो ?

 2. येवढा राग येत असेल तर ब्लॉग खराच बंद करा जे आहे ते सत्य आहे अणि ते तुम्ही स्विकाराव तुमचा हित्चिन्तक
  नाही तर पोस्ट कोमेंट फॉर्म काढून टाका अणि एक महत्वाच माजा सुद्धा ब्लॉग आहे ……….(चावटभुंगा ) वाच माजा ब्लॉग
  अणि परत रिप्लाय देवू नकोस ?…………हितचिंतक.. चल एतो परत भेटू ……. .

 3. नमस्कार योगेश मला माहित नाही तू कोण आहेस पण मी तुला सहमत आहे .
  हेमंत राव योगेश च म्हननखर आहे प्रत्येकाला आपले मत संगंयाची मुभा आहे.

 4. Hemant, tumhi kharach changala lihilay “Pratikriyevishayee”…aankhi Mr. Yogesh ni dilela comment pan chukicha nahiye….Karan pratekala mat mandnyacha hakk aahe….!!
  Majha anubhav aahe…Jar tumhala yashaswi vayache asel tar aadhi parabhav pachavnyachi taakad angi thevayala hawi….Samaja, tumhi ekhadya mothya ganyachya spardhet antim pherit pochlaat ani tumachaya pratispardhyapekshahi sunder gaane gayilaat; pan shewati number dila gela tumachya pratispardhyala…tyaweli kay?
  Aapan jase jagabarobar vagto, agadi tasech jag aaplyabarobar vagel ase nahi….

  Mi khupada tumchya posts vachato…Chaan astaat vishay!

  Tumacha ajunahi na zalela mitra…:)
  Ashish Deshpande.

 5. हा विशय फार गहन आहे आणी हा विचार वरवरचा आहे.कीतिही म्हटल तरि हे सर्व tax paying आणि non taxpaying PEOPLE असा होतो.फार मोथ्या बदलाची गरज आहे नाहीतर आपण सर्वच एक दिवशी खड्ड्य़ात जाणार.
  माझीहि एक प्रतीक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s