इंग्लिश

या नवीन कंपनीत आल्यापासून या दोन भाषेचा वापर होतो आहे. इंग्लिश माझ फारच खराब आहे. पण सध्याला बोलतोच. आतापर्यंत मी माझ्या कामाचा वेग आणि कामाचा दर्जा कसा सुधारला जाईल एवढंच बघत होतो. आता त्यापेक्षा अधिक माझ इंग्लिश बोलण कस सुधारेल याकडे लक्ष देत आहे. मुळात इंग्लिशची भीती वाटत नाही आहे. आणि इंग्लिश फ़क़्त कंपनीच्या कामापुरती वापरणार. मराठी भाषा ही कधीही सर्वोच्य आहे. मी हिंदी भाषा आता वापरण जवळपास बंदच केल आहे. जानेवारी महिन्यात मी मोजून दोन वेळेस हिंदीत बोललो. आजकाल त्याच देखील हिशेब ठेवतो. या महिन्यात दोनदा हिंदीचा वापर केला आहे. मुळात भाषा हे एक माध्यम आहे. इंग्लिश या वर्षात पक्क करून टाकील. मध्यंतरी ते रिलायन्स कंपनीचे डेटाकार्ड घेतलं तर त्यांचे आजकाल खूप फोन येतात. मग त्याचाही मी माझ्या ‘इंग्लिश’ सुधारण्यासाठी उपयोग करून घेतो.

कुठल्याही कस्टमर केअर मध्ये फोन केला की, मराठी बोलणारा त्यांच्याकडे त्यावेळी तिथे उपलब्ध नसेल तर ‘इंग्लिश’ चा वापर करतो. नाही तरी बोलल्या शिवाय कस येणार? पण बाकी इतर ठिकाणी म्हणजे माझा संगणक, माझे इमेलची सगळी खाती, सोशल नेटवर्किंग वेबसाईटमधील माझी माहिती मी मराठीत ठेवण्यात यशस्वी झालो आहे. या कंपनीतील माझा पहिला इमेल कोणालाच कळला नाही. मग त्यावेळी ठरवून टाकल. इंग्लिश चांगल आल पाहिजे. दोन महिन्यात ‘इमेल’ मध्ये सुधारणा केली आहे. आता मी पाठवलेले मेल चुकत नाहीत. तसचं ‘इंग्लिश’ देखील बिनचूक येईल.

Advertisements

8 thoughts on “इंग्लिश

 1. Hemantji, If every Marathi Manus will show this kind of commitment towards his goals, then there will not be a single day which would bring a harrasment to say that “I am MARATHI”!
  English khup mahatwacha aahe! Baki, tumacha Marathi kinwa English..2ch bhashana dilela ‘MAHATWA’ khup bhaavala 🙂 This is what the other Indians are doing; so why we don’t? JAI MAHARASHTRA!!

 2. नमस्कार हेमंत राव तुमचा हितचिंतक
  तुम्ही नेहमी मराठी मराठी करता ठीक आहे .पण इंग्लिश अणि हिंदी
  कशाला बोलता अणि म्हणे मी मराठी……..तुमचा हितचिंतक.

 3. हेमंत महोदय, आपला हा प्रयोग स्तुत्य आहे. शुद्ध लेखनाचा विचार मनातून काढून टाकला तर जसं जमतं तसं लिहायलाही काहीच हरकत नाही.मनाचे श्लोकातील शब्द पहा कसे आहेत ते? दुसरी गोष्ट म्हणजे आपण कंपनीमध्ये मराठीत बोलत जा हो, काही फरक पडत नाही.मला इलेक्ट्रिकल रेगुलेशनवर यशदा मध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलावलं जातं,तेव्हा समोर सगळे विद्युत अभियंते असतात वेगवेगळ्या राज्यातून आलेले आणि वेगवेगळ्या पदावर काम करणारे. मी माझा व्याख्यानाची सुरुवातच मुळी मराठीतून करणार आहे आणि गरज असेल तर हिंदी /इंग्रजीतून ही विश्लेषण करणार आहे असं सांगतॊ.गंमतची गोष्ट अशी की बहूतेकांना मराठी व्यवस्थित समजते आणि फार क्वचित प्रसंगी काही किचकट बाबी साठी मला हिंदी /इंग्रजीतून बोलावे लागते असे दिसून आले आहे. आप्ण लोकच मराठी बोलण्याचं टाळतो न्युनगंडामुळे !
  http://savadhan.wordpress.com/2010/02/18/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2/ हा लेख अवश्य वाचा
  धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s