गाव

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. गाव लहान असेल तरी तीस हजाराची लोकवस्ती आहे. घरी पुन्हा येताना शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नवीन पाट्या बघितल्या. गावात आजकाल राजकारण जोरात आहे. दरवर्षीप्रमाणे ‘रामायण’ या विषयावर सप्ताह चालू झालेला आहे. गाव जरा जास्तच धार्मिक आहे. माझे वडील आई आणि जवळपास संपूर्ण गावच संध्याकाळी सप्ताहात असते. रात्री वीज राहिल्याने मुळा प्रवरा वीज मंडळाचे उपकार मानले.

रोज पहाटे जुनी मराठी गाण्यांचे रेकोर्ड ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून लागते. त्यामुळे पहाटे पहाटे खुपच प्रसन्न वाटते. रविवारी सकाळी रोज प्रमाणे वीज गायब. मित्रांकडून गावातील अनेक वार्ता समजल्या. माझ्या काही मित्रांची नवी प्रेमप्रकरणे देखील समजली. आणि गल्लीतील सध्याचा सगळ्यांचा आवडता विषय ‘माझ लग्न’ देखील ऐकायला मिळाला. मला माझे मित्र विचारात होते की ‘कोणी आयटम पटवली का नाही?’. तस आमच गावाचा इतिहास खूप मोठा आहे. गावात वाम आणि बोरीच्या खूप झाडे होती म्हणून आमच्या गावाच्या नाव ‘वांबोरी’ पडलं. वाल्ह्या कोळी इथेच बसून तपस्या केली होती अस म्हणतात. नवनाथांच्या अनेक पुरावे असलेल ठिकाण आहे. गोरक्षनाथांनी केलेला सोन्याचा डोंगर इथेच आहे. त्या डोंगरावरती सध्याला एक शंकराचे मंदिर आहे. एक ग्रामपंचायत आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत ग्रामपंचायत आहे. दोन आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या शाखा इथे आहेत. एक रेल्वे आणि बस स्थानक, एक मोठ धान्य मार्केट आहे.

माझ शालेय शिक्षण याच गावात झाल. इथ आमची थोडी शेतीही आहे. हा भाग दुष्काळी आहे. वीस वर्षांपासून इथे तीन दिवसाआड पाणी येते. आणि ते ही पाऊण तास. शेतीत चाळीस चिंचेची, वीस आवळ्याची झाडे आहेत. जर मी संगणक क्षेत्रात नसतो तर ‘शेतकरी’ नक्की झालो असतो. पण मी ठरवलं आहे. मी जेव्हा साठ वर्षांचा म्हातारा होईल त्यावेळी गावी जाऊन राहील. आणि शेती करील. नेहमी मला गावी गेल्यावर तिथून पुण्यात येण्याची इच्छाच होत नाही. अस वाटत सगळ सोडून तिथेच रहाव. सगळे किती चांगले आहेत. दुखाची गोष्ट अशी की खूप मोठ्या प्रमाणात इथ बेरोजगारी आहे. आणि अस नाही की ते प्रयत्न करत नाहीत. पण अजून अनेकांना नोकऱ्या नाहीत. गावातील एक चांगली गोष्ट आहे की इथ डांबरी रस्ते आणि विजेचे खांब आहेत. आणि त्या विजेच्या खांबावर ट्युब. दर सोमवारी गावाचा आठवड्याचा बाजार भरतो. शाळेत असताना दर सोमवारी आईने बाजारातून खरेदी केलेल्या फळभाज्यांनी भरलेली पिशवी मला उचलून घरी आणण्याचे जबाबदारी माझ्यावर असे. मी दहावीत असताना आमच्याकडे एक गावरान गाय होती.

एकदा गायीचे दुध देखील मी काढले होते. पण दुध काढून झाल्यावर गायीने त्या दुधाच्या भांड्याला लाथ मारली. सगळ दुध सांडून गेल. मग काय आठवडाभर आई वडील आणि माझा लहान भाऊ या विषयावरून मला हसत होते. एक छान कालवड म्हणजे वासरू देखील होत. पण नंतर चाऱ्याचा प्रश्न खूप वाढला. आणि गाईकडे लक्ष देण्याला कोणालाच वेळ मिळत नव्हता. मग गाय एका शेतकऱ्याला दान करून टाकली. गावात गेल अस सगळ जून आठवत आणि मग तिथच रहाव अस खूप वाटत. आणि इथ पुण्यात आल तरी दोन-तीन दिवस करमत नाही. खूप आठवण येते. पुण्यात पुन्हा येताना सारख परत जाव असंच वाटत होत. पण एक गोष्ट आहे की तिथ जाऊन आल की समाधान मिळत.

Advertisements

7 thoughts on “गाव

 1. आठल्ये साहेब,
  कसलाही शब्द वापरत नाही पण प्लीज तुम्ही ब्लॊग लिहिणं बंद करा. कायच्या काय लिहित असता राव तुम्ही, तुम्हाला घरी येताना रस्त्यावर किती खड्डे लागले हे आम्ही का वाचायचं? गावी जा नाहीतर कुठेही जा. इंग्लिश येत नाही, नवीन नोकरी लागली, पगार बरा मिळाला, मुलगी बघायला आली, माझे मित्र मलाच फोन का करतात या काय ब्लॊग लिहायच्या गोष्टी आहेत का? प्लीज बंद करा नाहीतर मराठीब्लॊग्स साईट वरुन काढुन टाका.
  राग आला असेल तर क्षमस्व पण खरंच बोअर करता तुम्ही.

  -हितचिंतक

 2. @kantalela manushya(hitachintak?):- tumhi vachu naka na mag????ithe yeun pratikriya deta mhanaje tumhala vachayala aawadat…………tumachyawar koni jabardasti keliye ka wacha ashi?????
  aani dusari goshta mhanaje samorachyawar tika kartay tar ninavi ka na???naav taka ki swatach…….aahe ka tevadhe guts???

  @ hemant:- vishay changla aahe.pan rataal zalay……..thod eksuri zalay……..non-fiction madhe rangala asata…..try karun bagh……..

 3. @ kantalalela manushya (hitchintak): tumhi vachan band kara.. koni jabardasti keleli naiye tumhala vachanachi…. ani marathi blogs site varun kadhun takayla sangnare tumhi kon? mind your own buisiness and get lost…

 4. तूच्यरूप श्रीमान कंटाळलेला मनुष्य,
  आपण आयुष्याला खरच कंटाळलेला आहात, ए हेमंत एकदा यांना वांबोरीला गेऊन जा, जरा उत्साह येईल, अक्कल नाही तर निदान अशी चार चौघात पाजलायची नाही राव, एक तर नगरकर राजकारणात एकदम पुढे असतात अस म्हणा ना की तुमची इजजत काढायला आम्हाला वेळ नाही लागणार ना, पण आमची सौजन्याशीलता नडते हो, हेमंत राव अशा छोट्या माणसांकडे लक्ष नाही द्यायाच, छान लिहालेय, मझझ गॉ पण नगरमधेच आहे श्रीगोंदा-आढलगाव तुम्ही जे लिहालेय अगदी सेम आमच पण तसाच आहे, लिहीत जा, चांगल वाटत, मला वेल नाही भेटत पण आपण लिहिता छान आहे, आणि हो वो कंटाळलेला साहेब, जमत नसेल तर वाचू नका नाहीतर तिथे येऊन तुमचा संगणक फोडील…..

 5. तूच्यरूप श्रीमान कंटाळलेला मनुष्य,तुम्ही बराबर बोलत आहात मी तुमच्या पाठीशी आहे. हेमंत रावांचा हितचिंतक
  तुम्ही वेडे आहत. हेमंत राव ब्लॉग बंद करा ………..हितचिंतक:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s