झोप

आई गावी गेल्यापासून सगळाच गोंधळ चालू आहे. रात्री झोपायला उशीर. आणि मग उठायला सुद्धा उशीर. आणि त्याचा परिणाम सगळीकडे होत आहे. काल कहर झाला. उठलो नऊ वाजता. दहाच्या कंपनीच्या बससाठी गेलो. बस आली, आणि मग लक्षात आल की माझ ओळखपत्र, बसपास आणि कंपनीच एक्सेस कार्ड विसरलं म्हणून. मग परत मागे फिरव तर बस जाईल. आणि कंपनीत जायला आणखीन उशीर होईल. शेवटी बसमध्ये बसलो. आजकाल रोज काही ना काही नवीन घडते. त्या माझ्या थांब्यावर माझ्यासोबत आणखीन एक जण बस मध्ये चढला. आणि नंतर माझ्या.. चुकून त्याच्याकडे बघून ओळख दाखवली आणि काय तो सुरूच झाला. कुठून त्याला ओळख दाखवली अस झाल. माझा बसमध्ये बसल्यावर ‘झोप’ हा एक कलमी कार्यक्रम चालू असतो.

आज त्याला हसून सांगितलं की माझा बसपास विसरला. मग काय त्याने त्याच पुराण सुरूच केल. मला एक पुस्तक दाखवलं आणि म्हणाला ‘वाच’. शाळेत असताना पुस्तक वाचली तेवढीच. त्यानंतर मी कधी कोणत्याच पुस्तकांकडे ढुंकून बघितलं नाही. दोन तीन पाने चाळली आणि चांगल आहे म्हटलं. तर साहेब नाराज झाले. मला म्हणाला ‘पुस्तक न वाचताच चांगल कस म्हणतो?’. त्याला म्हटलं ‘तुला वाचायला हव असेल ना?’ तो ‘नाही’ म्हटल्यावर मग नाईलाजाने वाचव लागल. बर ते पुस्तकं( व्हाय नीड टेंपल?) अध्यात्मिक. मग आणखीनच झोप वाढली. थोड्या वेळाने तो झोपला की काय म्हणून बघितलं तर हा जप करत बसलेला. यार या माझ्या आयटी क्षेत्रातला पहिला संगणक अभियंता पहिला. जो माळ जपतो. आणि ते सुद्धा बसमध्ये. मग परत पुस्तकात डोक घातलं. याआधी माझ्या डोळ्या आणि डोक्यावर असा ताण कधीच दिला नव्हता. त्यात ती गार हवा, आणि रस्त्यांचा पाळणा मला त्रास देत होता. कस बस कंपनी येण्यापर्यंत त्या पुस्तकात डोक घातलं. बस थांबल्यावर ताबडतोप ते पुस्तकं त्याच्या हातात दिल. मग काय त्याने परत ‘पुस्तकं पूर्ण वाचून झाल्यावर दिल तरी चालेल’. मी हसून ‘नको’ म्हटलं. त्यापुढे त्याने प्रवचनच दिल. एक कार्ड दिल आणि त्यातला एक मंत्र रोज म्हणत जा अस सांगितलं. त्याच ते ‘इस्कॉन’ मंदिरात ये असाही बोलला. मी आपल ‘हो’ ला ‘हो’ करून टाळत होतो. आणि साहेब आपल प्रवचन आटोपत घेतच नव्हते. बर माझा एम्पोयी आयडी नंबर घेतला. आणि माझ्या फ्लोरवर बसतो हे देखील कळलं.

बसमधून उतरल्यावर त्या बस रजिस्टरमध्ये बसपास विसरल्याची नोंद करावी लागली. कंपनीत प्रवेश केल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्वागत केल. मग काय मित्राच्या मदतीमुळे एक दिवसाचा पासच काम ताबडतोप झाल. एक तर एवढ काम आहे. ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करून द्यायचं आहे. काल संध्याकाळ पर्यंत बसून झाल नाही. काल सकाळी काकूचा फोन आला होता ‘जेवायला का येत नाही म्हणून?’. एक तर काकाकडे रात्रीचा जेवण्याची वेळ नसते. रात्री दहाच्या पुढे जेवायला बसतात. आणि मग जेवताना टीव्ही लावतात. सगळ्यांच लक्ष त्या टीव्हीत. जेवण झाल्यावर खूप गप्पा मारतात. आणि मग माझ्या घरी यायला मला उशीर होतो. कधी अकरा आणि कधी कधी बारा. आणि मग जरा वेळ संगणकावर बसूयात म्हटलं तर रात्रीचे दोन कधी वाजतात ते कळत नाही. आणि मग झोपायला रात्रीचे तीन वाजतात. म्हणून मी आजकाल काकाकडे जेवायला जायचं टाळतो. काकाला खोट सांगितलं की कंपनीत काम जास्त असत. आणि घरी यायला अकरा वाजतात. आता ते खोट वाचवण्यासाठी काल सकाळी काकुशी पुन्हा खोट बोलाव लागल. परवा ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन आला होता. ती विचारात होती की आज तू येणार आहेस ना म्हणून. मग तिच्याशी सुद्धा खोट बोलाव लागल. आता अजून किती खोट बोलाव लागेल देव जाणे.

काल संध्याकाळी घरी येण्यासाठी बसमध्ये बसलो तर तो सकाळचा हीरो पुन्हा भेटला. आणि ते पुस्तकं घेऊन वाचव लागल. आणि मग माझी रात्रीची बस झोपेवर पाणी. त्याच्याशी गप्पा मारल्यावर समजलं की साहेब ‘आंध्रा’ चे आहेत. खूप ‘हैद्राबाद’वर प्रेम हो. उतरल्यावर ‘पुस्तकं वाचून परत दिल तरी चालेल’. मी नको म्हटल्यावर ‘विकत घे’ म्हणून मागे लागला. ‘नाही’ म्हणून कस बस त्याच्या तावडीतून सुटलो. आजकाल झोपेमुळे खूप काही घडतं आहे. पण झोप आवश्यक आणि महत्वाची का ते कळतं आहे.

Advertisements

6 thoughts on “झोप

  1. अरेरे ! एक चांगली संधी घालवलीत तुम्ही ! इस्कान मंदिरात एकदा जाऊन याच.हो.! डोळ्याचं पारणं फिटेल. पावश्यांना RSS chyaa लोकांचा जसा अनुभव येतो तसाच इतरांना पण येतो. अहो असं केलं नाही तर मग संघटना चालणार कशी? सगळ्या संघट्नांच हे एक तंत्र आहे.त्याचप्रमाणे आपण काय करायचं हे ठरवायला मोकळे अस्तोच ना?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s