परत चूक

यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. पण एवढी मोठी कंपनी. आणि पैसे लागतात म्हटलं की नाही म्हणाले. बर कसे बसे दोन सोफ्टवेअर दिलेत. बर ते इन्स्टाल करायला किती वेळ लागतो. दहा मिनिटांच काम. दोन आठवड्यांनी एक सोफ्टवेअर टाकल. आणि अजून दुसऱ्या सॉफ्टवेअरला बहुतेक मुहूर्त पाहून टाकणार असतील. मला माझ झालेलं काम सगळ्या ब्राउझरच्यामध्ये बघण्यासाठी आधी एक ‘अडोब’चे सोफ्टवेअर मिळते. ते मागितले. पण दिले नाही. आणि आता त्या चुकलेलं काम परत करा. असल् डोक दुखत आहे ना. सोफ्टवेअर देणार नाहीत. आणि चुका का झाल्या असा उलट प्रश्न विचारणार. आता आज मी माझ्या सिनिअराला झापणार आहे.

काल मला म्हणत होती की सोफ्टवेअर असून देखील चुका कशा होतात. म्हणजे गाडीत पेट्रोल नाही. आणि म्हणणार की गाडी का पळत नाही. पेट्रोल भर म्हटलं तर त्याला पैसे लागतात अस उलट उत्तर देणार. बर जे मोफत सोफ्टवेअर मिळतात ते द्या म्हटलं तर तेही नाही. आता ही चूक माझीच धरणार ना. माझ्या मागील प्रोजेक्टमध्ये देखील असंच. जुन्या कंपनीत असताना तर काही विचारूच नका. तो माझा ‘हीरो’ सिनिअर. वय सोडून कुठल्याही गोष्टीने सिनिअर नव्हता. ‘वेब’मधील काय कळत नव्हत. पण ऑर्डर सोडणार. बर ते अस व्हायचं की कधीही पाण्यात न  उतरलेला, पाण्यात सूर कसा मारायचा आणि कसा असायला हवा यावर पोहाणार्याच्या मागे लागून वेळखाऊ ‘लेक्चर’ देणार. त्याची काम बाजूला आणि माझ्या कामात नाक खुपसायचा. जाऊ द्या. आता ते केलेलं काम कस सुधारायचं याचा विचार करीत आहे. आत्तापर्यंत बाकीच्या सगळ्या ब्राउझरमध्ये बरोबर यायचं आणि इंटरनेट एक्सप्लोररमध्ये काही ना काही अडचण यायची. आणि ते सोडवताना खूप डोक दुखायचं. पण यावेळी उलट झाल आहे.

मायक्रोसॉफ्टने इतके सोफ्टवेअर बनवले आहे. त्यांची ओएस देखील आहे. पण सगळ्यात एक समानता आहे, की सगळ्यांत काही ना काही मोठी चूक आहे. आणि त्यामुळे वापरणाऱ्याला डोकेदुखी होते. ते आत्ताचच उदाहरण आहे ना गुगल किती वैतागले. शेवटी इंटरनेट एक्सप्लोरर ६ मध्ये त्यांच्या जीमेलच्या डॉक्स वगैरे बंद करण्याचा निर्णय घेतला. परवा पासून त्यांनी बंद केल आहे. कालपर्यंत बरचसं काम पूर्ण केल होत. आता ते पुन्हा करायचं आहे. या चुका परत करणार नाही. आणि त्या इंटरनेट एक्सप्लोररवर विश्वास ठेवणार नाही. आणि सोफ्टवेअर द्या नाही तर पर्यायी काही तरी सोय करा अस त्या माझ्या प्रोजेक्ट मेनेजरला मेल टाकतो.

Advertisements

4 thoughts on “परत चूक

 1. इंटरनेट एक्सप्लोरर 6 हा वेब डेवलपर्स चा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हणलं तरी ते चूक ठरणार नाही. केवळ इंटरनेट एक्सप्लोररवर चालत नाही म्हणून कित्येकदा गोष्टी नीट करण्यात वेळ फुकट घालवावा लागला आहे. आपली वेबसाईट वापरणारे लोक जर फार संगणकपारंगत नसतील किंवा तुमच्यासारखेच ऑफिसच्या सॉफ्टवेअर निगडित नियमांनी हतबल झाले असतील तर इंटरनेट एक्सप्लोररशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. अशा वापरकर्त्यांची संख्याही प्रचंड आहे त्यामुळे कितीही झालं तरी या आदिम ब्राउजरची काळजी घ्यावीच लागते. इंटरनेट एक्सप्लोररच्या 7 आणि 8 या आवृत्त्या त्या मानाने बऱ्याच सुसह्य आहेत.
  गूगलच्या पावलाने या चित्रात कदाचित काही फरक पडेल अशी आशा आहे.
  HTML5 समोर उभं असताना इंटरनेट एक्सप्लोरर केवळ इंटरनेटच्या प्रगतीला एक अडथळाच आहे.

 2. हेमंत,
  तुमचा ब्लॉग नेहमी वाचला जातो. जेव्हा आपण आपल्या कामावर खुष असतो तेव्हाच जर वरिष्ठांनी चूक म्हणून सांगितले तर राग येणे साहजिकच आहे. ह्या क्षेत्रात काही जास्तं दिवस काढले आहेत म्हणून एक छोटीशी सूचना. जर आपल्याला माहित असेल की आपले काम फक्त Internet explorer वर चालणार नसून बाकीचे browser पण तपासले पाहिजेत, आणि आपल्याला हवे असलेले software उपलब्ध नसेल तर शक्यतो आपलं काम झाले असे सांगू नये. वरिष्ठांनी आगदी मागितलेच तर त्यांना आपल्या कामाची मर्यादितता समजावून सांगावी (म्हणजे, फक्त internet explorer वरच चालेल, softwarechya अनुपलब्धते मुळे बाकीच्या browser ची guarantee नाही वगैरे वगैरे). हे जर स्पष्ट केले नाही तर आपण अपूर्ण काम दिले असे समजणे अयोग्य नाही.

  – एक अनाहूत सल्ला 🙂

 3. agree agree agree
  इंटरनेट एक्सप्लोरर ६ च्या विरुद्ध petition फिल करायची
  प्रोसेस कोणी सांगू शकेल का please
  मी थकलोय IE 6 चे changes करून

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s