पाल

एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे.

आम्हाला आधीच माहिती कळली होती. पण म्हणून काय झालं. मी प्रत्येक वारुळाच्या जवळ किंवा प्रत्येक बिळाबाहेर पाली उभी करू शकत नाही. आणि नाहीतरी आम्हाला काय दुसरी तिसरी आणि चौथी कामे नसतात काय? आणि मी माझ्या पाली तिथ उभ्या केल्या होत्या. आता तिथ सगळ्या परदेशी मुंग्या. कोणाकडूनच चहा पाण्याची सोय होतंच नव्हती. आणि त्यात आमच्या ‘मराठी’ पाली. चहा पाण्याशिवाय काय होत नाही. निदान ‘किडे’ तरी हवेच ना. पण तेही नाही. मग माझ्या पाली लक्ष कस देतील तुम्हीच सांगा. बर मी त्यावेळी आपल्या लाल मुंगळ्याच्या आदेशावरून ‘माय नेम इज घाण’ पाहायला गेले होते. आता त्या डासाचा चित्रपट आणि तो पण फुकट. मग मी इतकी ‘चान्स पे डान्स’ संधी का सोडू. मग मी सगळ्या पालींना बरोबर घेऊन गेले होते तिथे. सगळी ती ‘मुंबईच्या वाघाची’ कृपा. आणि मग ती झुरळे आली आणि जर्मन वारुळात बॉम्बस्फोट केला. आता यात माझी काय चूक. आणि मुंग्या मला उगाचंच दोषी ठरवतात. बर आता ती झुरळ कुठ पळाली. हे मी कस शोधू?

पण मुंग्यांनो तुम्ही त्या जर्मन बिळात होतात ना. मग तुम्ही का लक्ष दिल नाही? बघा, मी ‘सगळ्या लाल आणि जाडजूड मुंगळ्याची’ सेवा करेन अशी शपथ घेतली होती. आणि त्या बिळात दोन तास तो बॉम्ब पडून होता. त्या काउंटर बसलेल्या मुंगीला लक्ष देता येऊ नये? चूक सर्वस्वी तुमची आहे. आणि त्यात आता माझे वय झाले आहे. माझ्याकडून आधीही काही झाले नाही आणि पुढेही काही होणार नाही. अजून त्या ९३ सालच्या बॉम्बस्फोटाची झुरळ सापडली नाही. तर ही झुरळं महिन्याभरात कशी काय सापडतील? आणि पकडली तर तुमच्याच अन्नाच्या कणांचा अपव्यय होईल. मुंबईचा सुनामी रॉय गप्पा सोडून कुठे काय करतो आहे. नाही तरी आपल्या देशाची आजी, आजोबांनी आणि बडी बेगम घोषणा करून मोकळ्या झाल्या आहेत. बर मुंबईवरून  ती ‘एटी केटी’ एस आली आहे ना. ती तरी काय करती आहे. रोज ‘तुम्हाला काही माहिती असेल तर कळवा’ हेच बरळती ना नुसते? त्यामुळे पुणेकर मुंग्यांनो तुम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच घ्या. तुम्ही मेले किंवा अजून काय झालं त्यात आमच काय जातंय? आमचा पगार चालू आहे. अजूनही बॉम्बस्फोट होणार पुण्यात हे माझ्याकडून ‘पाली’ लिपीत लिहून घ्या. चला आता माझी ‘किडे’ खायची वेळ झाली आहे. मला जावेच लागेल. बघू लवकरच बॉम्बस्फोट होईल. मग मी येतेच पुन्हा.

Advertisements

2 thoughts on “पाल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s