मुलगी पाहिजे

याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते.

माझा जुना इमेल आयडी वापरून मी इथे लॉगीन करतो. म्हणजे माझा पहिला इमेल आयडी. आयडी बघून मुलगी आहे की काय अशी शंका यावी.त्यावेळी माझ्या नावाने इमेल आयडीच बनत नव्हता. मग माझ्या आडनावाच आद्याक्षर आणि त्याच नाव असा आयडी बनवला होता. प्रत्येकाला तेच ते ‘मी मुलगी नाही रे’ अस म्हणावं लागत. मग काय ताबडतोप ‘बाय’ येत. आत्ताच एक ‘गे’ भेटला. आता कुठून मी मुलगा आहे अस सांगितलं अस झालं. बर सगळी चांगल्या प्रोफेशनची कोणी इंजिनिअर कोणी मोठ्या हुद्द्यावर. काल एक सिव्हील इंजिनिअर भेटला. मुलगी नाही म्हटल्यावर शिविगाळीवर उतरला. पण मग थोड्या वेळाने आला लाईनवर. आणि हो इथ बऱ्याचशा खोट्या मुली देखील असतात. म्हणजे मुलगा असून देखील मुलगी आहे अस सांगतो. खर बोलायाच झालं. अगदी सुरवातीला मी एका मुंबईच्या प्रोग्रामरला उल्लू बनवलं होत. पण नंतर त्याला सांगितलं खर. त्या गोष्टीला आता दोन वर्ष झाली.

एकाला विचारलं की मुलगी हवी असेल तर इथ काय शोधतो? पुण्यात काय कमी मुली आहेत का? तर तो बोलला ‘तिथ मुलीशी बोलायला अवघड जात. इथ मिळाली की डायरेक्ट तुला कोण बॉयफ्रेंड आहे का? अस विचारता येते. आणि जमल तर चान्स मिळतो’ पुढे म्हणाला ‘दुसऱ्या रूममध्ये देखील मुली भेटतात पण त्या परदेशी. त्यांचा काय उपयोग’. परवा त्या ‘गेम इंडिया’ मध्ये देखील असंच. तिथेही चाटींग रूम आहे. तिथेही हेच चालल होत. एकाशी गप्पा मारतांना सहज त्या आरक्षणाचा विषय निघाला. त्यावर तो म्हणाला ‘सगळ्या खासदारांची आता मज्जा होणार.’ का म्हटल्यावर ‘खासदार मुली म्हणजे मज्जा नाही का?, आता कोणी गैर हजर राहाणार नाही.’ ते बघून जाम हसू आल. या याहू रूममध्ये अनेक शेवटी वैतागून कोणी लग्न झालेली किंवा विधवा असेल तरी चालेल असे मोठ मोठ्या अक्षरात मेसेज पाठवत असतात. बाकी जाम फस्टट्रेट मध्ये असतात. आधी मी सर्वात जास्त आहे अस वाटायचं. पण हे चाटींग वर हे असले हीरो पहिल्यापासून नेमक फस्टट्रेट कोणाला म्हणायचं हे कळत आहे. सगळेच टाईमपास. मला ‘तुझ्याकडे एखादया सेक्सी मुलीचा सेल नंबर आहे का?’ अशी एकाने विनवणी केली होती. त्याला म्हटलं ‘मिळाला की देईन’.

बापरे, कसलं जग आहे. मुलींसाठी मुल काय सुद्धा करायला तयार. एकवेळ पाणी नको पण एक मुलगी हवी ह्यांना. बिचारे ‘अतृप्त आत्मे’. एकाने तर मेसेजमध्ये त्याचा मोबाईल नंबर टाकला होता. आणि गप्पा मारण्यासाठी कॉल करा अस म्हणत होता. एक मुलगी भेटली होती रूममध्ये, आता खर काय ते तिलाच / त्यालाच  माहिती. मी म्हटलं ‘पुण्यात कोणी तरी मुलगी चाटींग करती म्हणायची’. आणि काय ती पळून गेली. का पळाली समजलं नाही. कधी फार कंटाळा आला तर चाटींग करून बघा. जाम मज्जा येते. ह्या चित्र विचित्र प्रकारांनी..

Advertisements

6 thoughts on “मुलगी पाहिजे

  1. बर्‍याच वर्षांपूर्वी माझा मित्र आणि मी नेटकॅफेत बसलो होतो, तेंव्हा त्याने मला चॅटिंग म्हणजे काय ते सांगितलं… तो त्याच्या खर्‍या नावाने जोपर्यंत चॅटिंग करत होता, तोपर्यंत कोणीही त्याच्याशी बोलायला तयार नव्हतं, पण जसं त्याच्या नावानं मुलीचा अवतार धारण केला, की लगेच त्याची स्क्रिन चॅटिंगच्या विंडोजने भरुन गेली! ते पाहून मला त्यावेळी फार गंमत वाटली होती. पण आता तो सारा प्रकार बघून पार वॆताग येतो, त्यापेक्षा आपली रिअल लाईफ हजार पटीने चांगली!

  2. जेंडर न विचारता चाटींग करावी… मुलगा किवा मुलगी कोणीही असो.. चाटींग ची मजा येतेच… फक्त पार्टनर छान असावा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s