विंडोजच्या आईचा घो

आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन.

आई ‘वेब’ नावच्या कंपनीत एमडी आहे. तिचा दरारा एवढा आहे की, वेब कंपनीतील सगळे डिझायनर लोक कामातील निम्मा वेळ आईपुढे हाजी हाजी करण्यात घालतात. आणि त्याच कंपनीतील डेव्हलपमेंट मधील कर्मचारी वर्ग आईसाठी हजारो ओळींचा स्पेशल कोड बनवून आपापल्या कामात टाकतात. पण एवढ करून देखील आईला केलेली काम पटत नाही. त्यामुळे सगळा वेबसाईट वर्ग संतापलेला असतो. ‘मायक्रोसॉफ्ट’ च्या बिलंदरने मागील दोन एक वर्षापूर्वी ‘व्हिस्टा’ होम प्रकल्पात या कुटुंबाला एक बिझनेस आणि एक होम असे दोन प्रीमियर फ्लाट दिले. त्यातही त्यांचा ‘बग’ चांगलंच दाणगाई करीत असतो.

आईने परवा चीनी खाऊन गुगलला म्हणजे वेब कंपनीच्या दुसऱ्या एमडी ला आपला पाय काढता घ्यायला लावला. हे सगळे विंडोज आणि आईच्या ‘सेव्हन’ हनिमून चा परिणाम आहे. अस कंपनीतील कर्मचारी बोलतात. पण काहीही असो. आई काही सुधरत नाही. नवीन नवीन कपडे घालून आई आता किती दिवस लोकांना ‘वेलकम’ करणार. तिकडे तो ‘बग’ बाबांच्या बिझनेसमध्ये नित्यनियमाने लक्ष घालू सोफ्टवेअर नावाच्या नोकराला त्रास देत असतो. आणि त्यामुळे कंपनीच्या सर्विसेस घेणारा ग्राहक वैतागतो. बग बद्दल सांगायचं राहूनच गेल. त्याची एक गर्लफ्रेंड आहे ना. तीच नाव ‘फायरवाल’. दोघे आजकाल ऑफिसच्या बागेत फिरत असतात.

तिकडे मैक नावाचा दुसरा बिझनेसमन आपल्या सफारी सोबत फार वेगाने पुढे जातो आहे. आणि गुगल देखील आईचा बदला म्हणून क्रोम बाळाला वेब कंपनीत जॉईन करून घेतलंच आहे. बाळ क्रोम देखील दुडूदुडू धावते आहे. बाकी सर्वात वेगाने वेब कंपनीत प्रोग्रेस म्हणजे ‘मोझिला’. सगळे कामात आणि वेगात विकास करत आहे. पण आपली आई वयोमानाने थकत आहे. खर तर आता आईची आजी झाली आहे. आणि बाबा विंडोज चे आजोबा विंडोज झाले आहेत. पण आपला बिलबिला त्याचा हट्ट सोडतच नाही. या मार्चच्या सुरवातीला गुगल एमडी ने आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्स आईला दाखवायच्या बंद केल्या आहेत. तरी देखील आई आपल्या सिक्युरिटी आणि अथोरटीच्या बेलगाम गप्पा ठोकत आहे. शेवटी एक दिवस असा येईल की सगळेच ‘विंडोजच्या आईचा घो’ म्हणतील.

Advertisements

3 thoughts on “विंडोजच्या आईचा घो

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s