जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं.

ते पाहून मुंगी आपली बिचारी खूप दुखी व्हायची. मुंगीला काम करून देखील मग सिंहाचे बोलणे खावे लागायचे. झुरळाच्या ह्या वागण्याने कंपनीतील इतरही ‘झुरळ सर्’ म्हणायला लागले. मुंगीच्या डोक्यात मग कंपनी सोडायचा विचार बळावू लागला. आणि जवळपास दीड वर्षानंतर त्याला आहे त्या कंपनीपेक्षा खूप मोठ्या कंपनीत जाण्याची संधी मिळाली. नवीन कंपनीत आल्यावर मुंगी खूप खुश झाली. कारण आता झुरळाचा त्रास तिला पुन्हा होणार नव्हता. नवीन कंपनी डायनासोरप्रमाणे अवाढव्य होती. आणि हजारो मुंग्या, उंदीर, खेकडे, माश्या, हत्ती, जिराफ, घोडे, हरणे, ढेकणे कामाला असलेल पाहून मुंगी अजूनच खुश झाली.

नवीन कंपनीत मुंगीवर लक्ष ठेवायची जबाबदारी एका खेकड्याची होती. दोन मोठ्या ढेकणांच्या हाताखाली काम करायचं अस मुंगीला सांगण्यात आल. पण दोन आठवडे मुंगीला त्या कंपनीत नुसतंच बसून ठेवलं. नंतर मुंगीला कामाची हत्यारे न देता काम कर अस सांगण्यात आल. काम एका हरिणीचे होते. आणि त्या कामातील प्रत्येक गोष्टीची परवानगी देण्याची जबाबदारी उंदीरमामाकडे होती. रोज झालेल्या कामाचा इमेल उंदीरमामाला पाठव अशी ताकीद दिली होती. हत्यारे नसतांना देखील मुंगीने आपले काम सुरु केले. पण हत्यारानिशी लवकर होणारे काम हत्यारविना मुंगीला जड जावू लागले. कामाला होणारा विलंब हत्यारामुळे नसून मुंगीमुळे होतो असा निष्कर्ष उंदीरमामा आणि हरिणीने काढला. हत्यारे पुरवण्याची जबाबदारी खेकड्याची होती. हत्यारे नाहीत ही माहिती त्याने हरिणीला दिलेली नव्हती. चूक लपवण्यासाठी मग खेकडा कोणतेही कारण काढून मुंगीला त्रास द्यायला लागला.

सुरवातीला मुंगीचा ‘इमेल’ नंतर तिची ‘इंग्लिश’ असे कोणतेही कारण काढून त्रास दिला जायचा. मुंगी आपली न झालेली चूक देखील मान्य करायची. आणि सारखी दुखी देखील राहायची. त्यामुळे तिच्यात ‘न्यूनगंड’ निर्माण झाला. झालेल्या कामाचे इमेल पाठवण. आलेल्या इमेलचा रिप्लाय देण्. छोट्याशा कामासाठी उंदराची परवानगी आणि त्यासाठी सतत इमेल, फोन करून मुंगी आणखीनच वैतागली. उंदीरमामा परवानगी देतो म्हणायचा. पण देत नसायचा. कामापेक्षा इमेल आणि फोन जास्त होत असल्याने कामावर त्याचा परिणाम जाणवू लागला. आणि सतत मीटिंग मधून कामाबद्दल मुंगीला ढेकणे रागवायचे. शेवटी मग मुंगीने देखील ठरवलं की जशास तसे प्रत्युतर द्यायचे.

मग कामात होणाऱ्या उशिराबद्दल मीटिंग बोलावली गेली. ज्या हरिणीचे ते काम होते. त्या कामाचा लक्ष देणारा उंदीरमामा, एक मांजर, खेकडा, ढेकणे आणि मुंगी असे जवळपास पाच सहा लोकांची मीटिंग बोलावली. मिटींगच्या सुरवातीपासून सगळेच कामात उशीर होण्याबद्दल मुंगीलाच दोषी ठरवू लागले. पण मुंगीने चूक नसतांना माफी मागायला नकार दिला. आणि मुंगी पेटली. बोलायला सुरवात केल्यावर तिने परवानगीसाठी केलेल्या विलंबाला, हत्यारे न पुरवल्याबद्दल उंदीरमामा आणि खेकड्याची सोलायला सुरवात केली. ढेकणाचा देखील समाचार घेतला. आणि आश्चर्य लहान मुंगी समोर उंदीर आणि खेकड्याने मान टाकली. मुंगीला ‘हल्याच्या उत्तरासाठी प्रतिहल्ला’ हे सूत्र ध्यानी आले. तेव्हापासून मुंगीची जहाल मुंगी झाली. आणि त्यानंतर असा त्रास तिला पुन्हा झाला नाही.

Advertisements

10 thoughts on “जहाल मुंगीची गोष्ट

  1. खुप च छान,,
    अन्याय सहन करण्याची ही एक रेश्या असते .
    पण त्या नंतर ही अन्याय सहन करने हा गुन्हा आहे ..
    आणि आपली हार ही निश्चित असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s